1 कप पाण्यात टाका हा पदार्थ सांधेदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी बंद, पोटातील गॅस गायब पोट साफ…

0
731

नमस्कार मित्रांनो,

गुडघेदुखी, सांधेदुखी, पाठदुखी, गॅस सोबतच जर कॅल्शियमची कमतरता भासत असेल तर अशा वेळेस हा उपाय तुम्हाला नक्कीच प्रभावी ठरणार आहे. शरीरात कॅल्शियमच्या कमतरतेमुळे पाठदुखी, गुडघेदुखी या सारख्या समस्या उदभवत असतात.

त्याचबरोबर तुमचं वजन जरी जास्त असेल तरी सुद्धा या समस्या तुम्हाला उदभवू शकतात. मित्रांनो थोडस काम करून पण थकवा जाणवत असेल , पाठ दुखत असेल, मणक्या मध्ये गॅप असेल वृद्धपकाळामुळे या समस्या होत असतील तरी सुद्धा हा उपाय करू शकता.

चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊ कसा करायचा आहे हा उपाय.

सर्वात आधी आपल्याला एक कप पाणी घ्यायचं आहे. पुढे त्यात 15 ते 20 मेथीचे दाणे टाकायचे आहेत.

त्यानंतर त्यात हळकुंडाचा छोटा तुकडा टाकायचा आहे. हळदीमध्ये अँटिबायोटिक गुण असतात सोबतच वेदना शामक म्हणून सुद्धा हळदीला ओळखले जाते.

त्यानंतर पुढे आपल्याला आल्याचा छोटा तुकडा घ्यायचा आहे आणि तो किसून त्या मिश्रणात टाकायचा आहे.

आल्या मध्ये अँटिऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात. सोबतच आले हे वेदनाशामक आहे. कंबरदुखी, गुडघेदुखी वर त्वरित आराम मिळण्यासाठी आले उपयुक्त आहे.

तर आता आपण एक कप जे मिश्रण तयार केले आहे ते अर्धा कप होई पर्यंत उकळून घ्यायचं आहे. मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या व्यक्तींना अल्सरचा त्रास आहे त्यांनी या मिश्रणात आले टाकायचे नाहीये. आले न टाकता हा उपाय करायचा आहे.

मिश्रण उकळून अर्धा कप झाल्यावर ते गाळणीच्या साहाय्याने गाळून घ्यायचं आहे. गुडघेदुखी, सांधेदुखी, पाठदुखी त्याचबरोबर मणक्यांमध्ये गॅप असेल, वारंवार पित्ताचा त्रास असेल, अपचन, गॅस या सर्वांवर हा काढा अगदी गुणकारी ठरणार आहे.

मित्रांनो या काढ्याच आठवड्यातून फक्त तीन दिवस सेवन करायचं आहे. नक्कीच तुम्हाला फरक जाणवून येईल. पहिल्याच दिवशी सेवनानंतर तुम्हाला फरक दिसून येईल.

मित्रांनो रात्री जेवण केल्यानंतर अर्ध्या तासाने या काढ्याचे सेवन करायचे आहे. मित्रांनो उपाय जरी साधा वाटत असला तरी खूपच गुणकारी आहे. माहिती आवडली असेल तर मित्र मैत्रिणींसोबत शेयर करायला विसरू नका.

अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here