नमस्कार मित्रानो
मित्रानो गृहलक्ष्मीने सकाळी उठल्यानंतर स्नान झाल्यावर हा एक उपाय नक्की करावा. घरात पैशांची तंगी कधीच जाणवणार नाही. गृहलक्ष्मी म्हणजे आपल्या घरातील स्त्री महिला.
मित्रानो माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि सोबतच माता अन्नपूर्णेचा कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर आपल्या स्वयंपाक घरात जी शेगडी किंवा गॅस असतो , चूल , स्टोव्ह या वस्तुंना स्पर्श करून हा एक मंत्र गृहलक्ष्मीने नक्की बोलावा.
माता लक्ष्मी प्रसन्न होते. अन्नपूर्णेच्या कृपा आशीर्वादाने घराची भरभराट होऊ लागते. हा मंत्र नेमका कोणता आहे आणि तो बोलण्यापूर्वी नेमकी कोणती विधी आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत.
मित्रानो गृहलक्ष्मीने सकाळी लवकर उठल्यानंतर स्नान आणि इत्यादी कार्य आटोपून आपल्या किचन मध्ये जावं. एक दिवा प्रज्वलीत करावा तेलाचा किंवा तुपाचा. हा दिवा आपण गॅस , स्टोव्ह , चूल, शेगडी जे असेल त्याच्या बाजूला ठेवायचा आहे.
गॅसच्या शेगडीवर चिमूटभर हळद शिंपडायची आहे आणि त्यानंतर शेगडीवर आपले दोन्ही हात ठेवून आपण हा मंत्र बोलायचा आहे. देहि सौभाग्यमारोग्यं देहि मे परमं सुखम्। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि॥
मित्रानो हा मंत्र कमीत कमी तीन वेळा , सात वेळा किंवा तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर दररोज एक वेळा जरी हा मंत्र म्हटला तरी अत्यंत शुभ फळ प्राप्त होतात. माता अन्नपूर्णेचा कृपा आशीर्वाद मिळतो.
हा जो उपाय आम्ही सांगितला तो उपाय आपण कराच मात्र रात्री झोपण्यापूर्वी एक छोटीशी गोष्ट करा कि आपल्या किचन मध्ये खरकटी भांडी ठेवू नका. आपला गॅस , शेगडी , स्टोव्ह असेल ती व्यवस्थित पुसून ठेवा. त्यावर कुठंही घाण नसेल त्याची काळजी घ्या.
एकंदरीतच आपलं किचन साफ , सुदंर आणि स्वच्छ असायला हवं याची काळजी घ्या म्हणजे वास्तू दोष निर्माण होत नाहीत. झोपण्यापूर्वी गॅस , शेगडी वरती दुधाचे दोन चार थेंब शिंपडायला विसरू नका.
जे कच्च दूध असेल किंवा तापवलेले असेल शक्यतो कच्च गाईचं दूध असेल तर अति उत्तम. अशा या गाईच्या कच्च्या दुधाचे थेंब जर शेगडीवर शिंपडले गेले तर घरातून सर्व प्रकारचे दोष नाहीसे होतात. स्वयंपाक घरातील सर्व दोष नाहीसे होऊन घराची भरभराट होऊ लागते.
अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. जर तुमच्या घरात महिला नसतील तर पुरुष सुद्धा हा उपाय करू शकतात.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.