नमस्कार मित्रांनो,
भाजलेला लसूण खाण्याचे आश्चर्यचकित फायदे कोणते आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो आयुर्वेदात लसणाचे खूप सारे फायदे सांगितले गेले आहेत. कोणी लसूण कच्चाच खातात तर कोणी भाजून.
काही जण तर लसणाची चटणी करून पण खातात. पण फारच कमी जणांना माहित आहे कि लसणाचे सेवन भाजून केलेले जास्त फायदेशीर आहे. खासकरून पुरुषांनी असा लसूण खाल्लेलं फायदेशीर असत.
लसणामध्ये सल्फरचे प्रमाण जास्त असते, यात एलिसीन नावाचा घटक सुद्धा असतो. त्यामुळे लसणामध्ये अँटीबॅक्टरीयल, अँटीफंगल आणि अँटीऑक्सीडेंट वैशिष्ट्ये असतात.
लसणावर झालेल्या रिसर्च नुसार लसणात असलेल्या फायटोकेमिकल्स मुळे पुरुषांच्या आरोग्यासाठी फायदा होतो. म्हणून आयुर्वेदाचे डॉक्टर पुरुषांना रोज रात्री भाजलेला लसूण खाण्याचा सल्ला देतात.
सेक्स हार्मोन तयार करतो
लसणामध्ये एलिसीन नावाचा पदार्थ असतो त्यामुळे पुरुषांना मेल हार्मोन म्हणजेच सेक्स हार्मोन्सचे प्रमाण योग्य ठेवण्यास मदत होते. त्यामुळे पुरुषांचा इरेक्टाइल डिसफंकशन दूर होतो. भाजलेला लसूण खाल्ल्याने स्पर्म्सची क्वालिटी वाढण्यास मदत होते.
दातांचे दुखणे
भाजलेला लसूण खाल्ल्याने दातांच्या दुखण्यात आराम मिळतो. दात दुखत असेल तर लसूण वाटून तो दुखऱ्या दातावर ठेवावा. असे केल्याने त्वरित दुखणे बंद होते. लसणात अँटीबॅक्टरीयल घटक असल्याने दात दुखणे कमी करतो.
दातांच्या दुखण्यावर आराम मिळ्वण्यासाठी लसूण कच्चा वाटून देखील दुखणाऱ्या दातावर लावू शकता. त्यासाठीची लसूण भाजून घ्यायची गरज नाही.
हृदयासाठी फायदेशीर
भाजलेला लसूण ब्लडप्रेशन कंट्रोल करतो. याच नियमित सेवन हाय ब्लड प्रेशर असणाऱ्या व्यक्तींसाठी फायदेशीर आहे. लसूण खाल्ल्याने ब्लड प्रेशर देखील कमी होत.
कॅन्सर पासून बचाव
लसूण खाल्ल्याने शरीरात गर्मी निर्माण होते तसेच थंडी पासून रक्षण होते. लसूण कॅन्सर पासून सुद्धा बचाव करतो. लसूण विशेतः प्रोस्ट्रेट आणि ब्रे स्ट कॅन्सर पासून संरक्षण करतो.
पोटातील गडबड
तुमचं पोट खराब असेल किंवा तुम्ही लवकर पोटातील इन्फेक्शनचे बळी पडत असाल तर भाजलेला लसूण जरूर खावा. यामुळे छातीत जळजळ, उलटी, पोटात गडबड असेल तर ती दूर होते.
मित्रांनो यासाठी नित्यनियमाने भाजलेल्या लसणाच्या एक ते दोन पाकळ्या नियमित खाव्यात. माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत अवश्य शेयर करा. तसेच आमचे मराठी धिंगाणा फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.