जर तुमच्या घरात असतील या वस्तू तर समजून जा गरिबी याच कारणामुळे आहे…

0
254

नमस्कार मित्रानो

मित्रांनो आपल्या घरात ही एक वस्तू आहे का हे प्रत्येकाने नक्की तपासले पाहिजे. कारण जर ही एक वस्तू आपल्या घरात असेल, तर ती आपल्या घरातील गरिबीचं मूळ कारण आहे हे समजून जा.

अनेक घरांमध्ये जुने, मळलेले किंवा वापरलेले कपडे हे दोन दिवस , तीन दिवस, आणि कधीकधी आठवडाभर तसेच साठवले जातात, आणि त्यानंतर ते धुतले जातात. थोडक्यात दररोज कपडे धुण्याचा कंटाळा केला जातो.

लक्षात घ्या की जे कपडे घालून आपण वावरतो, इकडे तिकडे फिरतो, त्या कपड्यामुळे मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा साठून राहते. बऱ्याच जणांना उशिरा अंघोळ करण्याची देखील सवय असते.

ज्या घरातील लोक सकाळी लवकर उठून, सकाळी लवकर आंघोळ करून, आपल्या घरातील थोरां-मोठ्यांचे आशीर्वाद घेतात, देवपूजा करतात, त्या घरात दरिद्रता कधीच राहत नाही. अशा घरात लक्ष्मी सातत्याने वाढत राहते आणि लक्ष्मीचे अखंड स्थान निर्माण होते.

मात्र अनेक जण उशीर आंघोळ करतात आणि अंघोळ केल्यानंतर कालचे, परवाचे, वापरलेले कपडे पुन्हा पुन्हा घालतात. शास्त्रात दररोज अंघोळ, स्नान करण्यासाठी सांगितले आहे. जेणेकरून जी काही नकारात्मक ऊर्जा आपल्या सोबत आलेली आहे, ती नकारात्मक ऊर्जा दूर व्हावी.

मात्र जेव्हा आपण आंघोळ करून कालचेच किंवा वापरलेले जुने कपडे परिधान करतो तेव्हा आपण दरिद्रेतेला आमंत्रित करतो. आणि अशी दरिद्रता अनेक घरांमध्ये गरिबीचं कारण बनलेली आहे.

काही काही घरांमध्ये कपडे वॉशिंग मशीन मध्ये धुतले जातात. पण त्या अगोदर भरपुर कपडे साठवून ठेवलेले असतात. लक्षात घ्या जेव्हा जुन्या कपड्यांचा थर वाढतो तेव्हा त्यातील नकारात्मकता प्रचंड वाढते.

म्हणून आपण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की, जुने झालेले कपडे आहेत, त्यांचा जर तुम्ही वापर करत असाल तर आता चुकूनही ते वापरू नका.
या सोबत अजून एक गोष्ट, म्हणजे ज्या बाथरूम मध्ये आपण स्नान करतो, त्या बाथरूमचा दरवाजा सतत बंद असावा.

तुम्ही कामापुरता तो दरवाजा उघडा ठेऊ शकता, मात्र काम झाल्यानंतर या बाथरूमचा दरवाजा नेहमी बंद करावा. बाथरूम सोबतच टॉयलेटचा दरवाजा देखील बंद असावा. कारण, या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात सर्वात जास्त नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असते.

मित्रानो आंघोळ करताना बकेट मध्ये थोडं फार पाणी शिल्लक राहत. एका व्यक्तीची आंघोळ झाल्या नंतर दुसरा व्यक्ती जेव्हा आंघोळ करायला जाईल तेव्हा त्याने हे आंघोळीचं पाणी चुकून देखील वापरू नये. हे शिल्लक राहिलेले पाणी टाकून द्यावं.

जेव्हा आपण दुसऱ्याच उललेल पाणी स्वतःच्या अंगावर घेतो किंवा त्याच पाण्यामध्ये आपण अजून पाणी मिक्स करून आंघोळ करतो तेव्हा त्या शिल्लक राहिलेल्या पाण्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा उतरलेली असते.

अशा प्रकारच्या उरलेल्या पाण्याचा वापर अनेक ठिकाणी तंत्र मंत्रासाठी केला जातो. या उरलेल्या पाण्यात अनेक प्रकारची नकारात्मकता असते. त्यामुळे अंघोळ करताना बादली स्वछ धुवून घ्या मगच आंघोळ करा.

मित्रानो या छोट्या छोट्या गोष्टींचा अनेक जणांना विश्वास बसत नाही मात्र आपण या गोष्टी करून पहा. तुम्हाला फरक पडलेला नक्कीच दिसून येईल.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here