नमस्कार मित्रानो
मित्रांनो आज आम्ही तुम्हाला सामुद्रिक शास्त्रानुसार मनुष्याच्या जीवनातील भविष्य आणि व्यक्तित्व यांच्या बद्दल माहिती देणार आहोत. भारतीय संस्कृतीमध्ये शुभ-अशुभ, शकुन अपशकुन अशा प्रकारच्या अनेक गोष्टींना खूप महत्व दिले जाते.
आपले ज्योतिष शास्त्र इतके समृद्ध आहे की त्यात प्रत्येक गोष्टीत लपलेल्या गुपितांना विस्तृतपणे सांगितले गेले आहे. आपल्या आजूबाजूला जेवढ्या पण गोष्टी घडत असतात त्यांचा संबंध आपल्या नजीकच्या भविष्यात अवश्य जोडलेला असतो.
आपल्या शरीरावरील तिळाचा तसेच आपल्या शरीराच्या बनावटी मध्ये देखील काही ना काही अर्थ लपलेला असतो. ईश्वराने प्रत्येक व्यक्तीच्या शरीराची रचना ही वेगवेगळ्या प्रकारे केली आहे. रंग ,रुप ,स्वभाव , विचार शैली , परिस्थिती इत्यादी गोष्टी एकमेकांपेक्षा भिन्न असतात.
सामुद्रिक शास्त्र आपल्या वैदिक काळातील शास्त्राचा एक अविभाज्य घटक आहे. ज्यामध्ये आपल्या शरीरावरील सर्व चिन्हांचा अंगावरील अवयवांचा बनावटीचा अध्ययन करून व्यक्तीचे भूतकाळ ,भविष्यकाळ आणि वर्तमान काळाबद्दल भाकीत केले जाते.
आपल्या शरीरावर कोणतेही निशाण किंवा वेगळ्या गोष्टी असतील तर त्यामुळे आपल्याला अनेक गोष्टी माहिती पडतात. यापैकी काही निशान आपल्याला लकी म्हणजेच सौभाग्य कारकाचे प्रतीक असतात. तर काही निशाण दुर्भाग्याचे कारक असतात.
सगळ्यात आधी जाणून घेउयात आपल्या चेहऱ्याची ठेवण आणि बनावटी विषयी. गोल चेहरा असणारे लोक निश्चितच भाग्य कारक असतात. चांगले आयुष्य, चांगले नोकरी आणि उत्कृष्ट दर्जाचा जीवनसाथी मिळणे यांच्या नशिबातच लिहिलेले असते.
मध्यम उंची असणे देखील चांगले समजले जाते. तेज नाक आणि त्यावर तिळाचे असणे चांगले मानले जाते. ज्या लोकांचे कान सर्वसामान्य लोकांपेक्षा मोठे असतात ते देखील अत्यंत भाग्यशाली असतात.
मित्रानो खरतर केस कमी असू नये किंवा टक्कल असणे सौंदर्याच्या दृष्टीने चांगले दिसत नाही. परंतु ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने पाहिले तर टकले लोक जास्त भाग्यशाली मानले गेले आहेत. महिलांचा भांग सरळ असणे जास्त चांगले मानले गेले आहे.
आता आपण आपल्या शरीरावर आणि अन्य भागावर जन्मापासूनच असणाऱ्या तीळा बद्दल माहिती घेऊयात. तीळ आपल्या कोणत्या भागावर आणि स्थितीत आहे त्यानुसार याचा अर्थ असतो. माथ्याच्या मध्यभागी असणारा तीळ आपल्यासाठी अत्यंत लकी असतो. त्याच प्रकारे तळहातावर, उजव्या गालावर, उजव्या डोळ्यावर जे तीळ असतात ते आपल्यासाठी अत्यंत खास असतात.
मित्रानो मोत्या प्रमाणे असलेले सफेद दात कोणाला आवडत नाहीत? आणि बिना फट असलेले दात तर सौंदर्यात भरच घालतात. परंतु सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या व्यक्तीच्या समोरील दोन दातांमध्ये फट असते, ते अत्यंत सौभाग्यशाली असतात.
आपल्या नोकरीत अतिशय उत्कृष्ट कामगिरी करून उच्चपद प्राप्त करतात. यांची आर्थिक स्थिती देखील भक्कम असते. याच पद्धतीने ज्यांचे दात थोडेसे बाहेर आलेले असतात. ते लोक थोडे जास्त बोलणारे आणि भाग्यशाली असतात.
व्यक्तीचे हात आणि हाताचे तळवे नेहमी मऊ आणि सफेद गुलाबी राहत असतील, मध्यभाग खोलगट आणि रेषा अत्यंत स्पष्ट असतील तर अशी व्यक्ती अत्यंत भाग्यशाली असते.
पायाच्या तळव्यावर सूर्य-चंद्र,नक्षत्र, शंख, चक्र गदा व ध्वज यांसारखे निशाण असल्यास असे लोक अत्यंत ऐश्वर्यदायी जीवन जगतात. ज्या स्त्री पुरुषांची नाभि खोल असते ते देखील अत्यंत भाग्यशाली असतात. खोल काळे आणि मोठे टपोरे डोळे असणारे लोक अत्यंत बुद्धिवान आणि धनवान असतात. दाट आणि जोडलेल्या भुवया चांगल्या भाग्याचे लक्षण आहे.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.