नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ,
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मित्रांनो विघ्नहर्ता श्री गणेश. आपण जर विघ्नहर्ता श्री गणेशाला प्रसन्न केले तर आपले विघ्न लवकरात लवकर दूर होतात सोबतच आपल्या इच्छा देखील पूर्ण होतात.
मित्रानो आपल्या सर्वांनाच आपल्या गणपती बाप्पांवर विश्वास आहे. आपण मनोभावे बाप्पांची पूजा करत असतो. तर मित्रानो 31 मार्चला बाप्पांची सर्वात मोठी चतुर्थी येत आहे.
ही चतुर्थी मार्च महिन्यात आलेली दुसरी चतुर्थी आहे. त्यामुळे येणारी चतुर्थी खूप महत्वाची आणि मोठी मानली जाते. कारण संकष्टी चतुर्थीचा दिवस हा आपल्या बाप्पांचा दिवस मानला जातो.
तर मित्रांनो या दिवशी भरपूर लोक उपवास करतात. मंत्र जाप, पारायण किंवा स्तोत्र वाचन देखील काही लोक करतात. जेणेकरून गणपती बाप्पा प्रसन्न होतील. तर या दिवशी म्हणजेच 31 मार्चला तुम्हाला घरात एक नैवेद्य करायचा आहे. हा नैवेद्य गणपतीला तुम्हाला दाखवायचा आहे.
या नैवैद्याने तुमच्या घरातील सर्व विघ्न दूर होतील. आणि घरात खूप पैसा येईल. बरकत होईल, सुख समृद्धी नांदेल. आनंद, शांतता आणि समाधान नांदेल. घरातून नकारात्मकता, वाईट शक्ती किंवा चिडचिडपणा, वादविवाद कायमचे दूर होतील.
हा नैवैद्य म्हणजेच गणपती बाप्पांची आवडती वस्तू. गणपतीचा आवडता पदार्थ म्हणजे मोदकांचा नैवैद्य तुम्हाला करायचा आहे. बरेच लोक आपल्या घरात मोदकांचा नैवैद्य करतात पण हा वेगळा नैवेद्य करायचा आहे.
या मध्ये तुम्हाला 21 मोदक करायचे आहेत परंतु तुम्हाला मोदक करताना एक मोदक मिठाचा करायचा आहे. म्हणजेच एक मोदक खारट करायचा आहे. बरेच लोक उकळीचे मोदक करतात. बरेच लोक खोबर , साखर टाकून तळून मोदक बनवतात.
मोदक कोणतेही करा पण मोदक करताना जेव्हा तुम्ही त्यात सार भराल तेव्हा 20 मोदक गोड आणि 21 वा मोदक तुम्हाला मिठाचा बनवायचा आहे. सर्व मोदक एका ताटात ठेवून तुम्हाला बाप्पांसमोर संध्याकाळी तो नैवैद्य दाखवायचा आहे.
नैवैद्य दाखवल्यानंतर आरती करायची आहे, मंत्र जाप करायचा आहे आणि त्यानंतर सर्वानी तो मोदकाचा प्रसाद खायला घ्यायचा आहे. लक्षात घ्या घरातल्याच लोकांनी तो प्रसाद खायचा आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल कि खाऱ्या मोदकाच काय करायचं?
तर मित्रांनो जेव्हा तुम्ही मोदकाचा प्रसाद वाटाल तेव्हा तुम्हाला माहित नसेल कि कुठला मोदक खारट आहे पण तुम्ही तो प्रसाद घरात सर्वांना वाटायचा आहे. ज्याच्या नशिबात असेल त्याला तो खारट मोदक मिळेल.
ज्याला तो खारट मोदक येईल त्याने तो पूर्ण मोदक खायचा नाहीये. थोडासा खाऊन तो मोदक तुम्ही बाहेर मुंग्यांना किंवा पक्षांना द्यायचा आहे किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करू शकता.
मित्रांनो ज्याला तो खारट मोदक वाट्याला येईल समजून जा गणपती बाप्पा त्या व्यक्तीवर प्रसन्न राहणार आहेत. साक्षात बाप्पांचा आशीर्वाद त्या व्यक्तीवर राहणार आहे. तर मित्रांनो हा उपाय तुम्ही नक्की करा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणाचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.