नमस्कार मित्रांनो
मित्रांनो गणपती बाप्पांचा फार मोठा दिवस म्हणजे गणेश जयंती. दरवषी माघ महिन्यात आपण श्री गणेश जयंती साजरी करतो. मित्रांनो यंदा 25 जानेवारी बुधवारच्या दिवशी श्री गणेश जयंती आली आहे. आपल्या सर्वांच्या देवघरात गणपती बाप्पांची मूर्ती असते , फोटो असतो.
आज या विशेष दिनी आपण गणपती बाप्पांची पूजा नक्की करा आणि सोबतच आज एक उपाय आम्ही तुम्हाला सांगत आहोत. हा उपाय इतका कारगर आहे कि आपल्या मनातील अनेक इच्छा या उपायामुळे आणि बाप्पांच्या आशीर्वादाने नक्की पूर्ण होतात.
विशेष करून जर तुमची मुले शिक्षणात मागे आहेत , त्यांची बुद्धी तेज नाही किंवा अभ्यास होत नाही. करियर मध्ये यश मिळत नाहीये. प्रॉपर्टी संबंधी काही वाद विवाद चालू आहेत. घरात पैसा येत नाही किंवा असलेला पैसा विनाकारण वायफळ खर्च होतो. अशा एक ना अनेक समस्या या उपायाने दूर होतात.
ज्या लोकांना संतान प्राप्ती होत नाहीये अशा लोकांनी आज या गणेश जयंती निमित्त थोडेसे मूग बाप्पांच्या चरणी नक्की अर्पण करावेत. मित्रानो हे उपाय ऐकायला फार साधे सोपे वाटतात. असं वाटत याने काय होईल ? मात्र या सोबत तुम्हाला एक मंत्र सांगत आहोत ओम गं गणपतेय नमः . हा गणपती बाप्पांचा महामंत्र आहे.
आज आपण बाप्पांची पूजा करताना हा मंत्र कमीत कमी 108 वेळा किंवा तुमच्याकडे जपमाळ नसेल तर 10 मिनिटे किंवा 15 मिनिटे सातत्याने या मंत्राचा जप करा. मनातल्या मनात करू शकता , मोठ्याने मंत्र जप केलात तरी काही हरकत नाही. हा मंत्र गणपती बाप्पांना प्रसन्न करवतो.
मित्रांनो बुधवारच्याच दिवशी माघ महिन्यातील श्री गणेश जयंती आलेली आहे. बुधवारी जी व्यक्ती गणपती बाप्पाना हिरवे मूग अर्पण करते त्या व्यक्तीला संतान सुखाची प्राप्ती अवश्य होते. त्यांची वंश वृद्धी होते , वंश वाढू लागतो. तुमच्या क्षमतेनुसार हिरवे मूग बाप्पांना नक्की अर्पण करा आणि सोबतच मंत्र जप करायला विसरू नका.
जर तुमची मुले बाळे अभ्यासात मागे आहेत किंवा वाचलेलं लक्षात राहत नाही आणि त्यांची बुद्धी तल्लख व्हावी असं तुम्हाला जर वाटत असेल तर आपल्या मुलाबाळांची आज 108 दुर्वा गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करा. सर्व दुर्वा एकदम अर्पण न करता एक एक दुर्वा मंत्र जप करत अर्पण करायची आहे. सोबतच प्रार्थना करा कि मुला बाळांना शिक्षणात यश मिळू देण्याची.
मित्रानो गणपती बाप्पा हे त्यांच्या वडिलांप्रमाणेच भोळे आहेत. ते महादेवांचे पुत्र आहेत. तुमच्या मनातील या इच्छा नक्की पूर्ण होतील. ज्यांच्या जीवनात प्रॉपर्टीशी संबंधित अडचणी आहेत जसे कि एखादा प्लॉट घ्यायचा आहे , विकायचा आहे मात्र त्यात यश मिळत नाहीये.
प्रॉपर्टी संबंधी जर तुमच्या जीवनात अडचणी असतील तर आजच्या दिवशी शमी पत्रांनी बाप्पांची पूजा करावी. म्हणजे बाप्पांची पूजा करताना शमी झाडाची पाने बाप्पांच्या चरणी अर्पण करावीत. ज्यांच्या घरात पैसा टिकत नाही किंवा जास्त खर्च होतो अशा वेळी सुद्धा बाप्पांच्या चरणी मूग अर्पण करत मंत्र जप करा. तुमची अडचण बाप्पा नक्कीच दूर करतील.
ज्यांच्या प्रत्येक कामात अडथळे निर्माण होतात , विवाह होण्याचं विलंब होत आहे किंवा विवाहासाठी योग्य स्थळ चालून येत नाही अशा वेळी तांब्याभर पाण्यात थोडस गंगाजल आणि हळद टाकावी आणि या पाण्याने बाप्पांचा अभिषेक करावा. तुमची समस्या बाप्पा दूर केल्याशिवाय राहणार नाही.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.