15 फेब्रुवारी गणेश जयंती हि चूक करू नका करावा लागेल पश्चाताप…

0
342

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या म्हणजेच ज्या दिवशी गणेश जन्म झाला तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी. आणि तेव्हापासूनच गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला.

माघ शुद्ध चतुर्थी हि श्री गणेश चतुर्थी म्हणून साजरी केली जाते. मित्रांनो या तिथीच वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशाचं तत्व हे नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्र पटीने कार्यरत असत. अशावेळी आपण गणपती रायांची पूजा केली तर गणपती बाप्पा आपल्यावर लवकरात लवकर प्रसन्न होतात.

आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती सुद्धा बाप्पा लवकरात लवकर पूर्ण करतात. गणराया हे सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहेत. त्यांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या जीवनातील सर्व दुःखांचा नाश होतो.

मित्रांनो या गणेश जयंतीला तिलकुंद चतुर्थी असेही म्हटले जाते. या दिवशी गणपतीचा प्रभाव एक हजार पट अधिक कार्यरत असतो. गणपतीचे स्पंदन आणि चतुर्थीला धरती स्पंदन समान असल्यामुळे धरती व गणपती एकमेकांसाठी अनुकूल मानले गेले आहेत.

म्हणजेच या दिवशी गणपती उपासना केल्याने निश्चितच आपल्याला लाभ होतो. अग्नी पुराणामध्ये मोक्ष प्राप्तिसाठी तिलकुंद चतुर्थी व्रताचं महत्व सांगितलं गेलं आहे.

त्याचप्रमाणे अनेक लोक हळद आणि शेंदुरी गणपतीची प्रतिमा तयार करून त्याची पूजा देखील करतात. तिळाने तयार केलेले पदार्थ गणपतीला प्रदान करतात. आपल्या जीवनात सुख, समाधान, शांती येण्यासाठी गणेश जयंतीला बाप्पाची मनोभावे पूजा अवश्य करा.

या दिवशी चौरंगावर गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला स्थापित करायची आहे आणि शुद्ध पाण्याने गणपती बाप्पांच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे. गणपतीसह गौरी, महादेव, नंदी, कार्तिकेय सह पूर्ण शिव कुटुंबाची पूजा करण्याचं विधान आहे.

गणपतीला प्रिया असणारी जास्वंदीची फुल अर्पण करावीत. नंतर गणपतीला तुप आणि गुळाचा नैवैद्य दाखवावा. गणपतींना 108 दूर्वांवर पिवळी हळद लावून अर्पण कराव्यात. सोबतच या दिवशी गणपती अथर्व शीर्षाच पठण अवश्य करावं.

मित्रांनो हे झालं गणेश जयंतीला काय करावं याबद्दल परंतु अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण गणेश जयंतीच्या दिवशी आपण आवर्जून टाळल्या पाहिजेत. चला तर मग जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या गणेश जयंतीला आपण टाळल्या पाहिजेत.

मित्रांनो पूजा करताना गणपतीला तुळस अर्पण करून नये. तसेच गणेश जयंतीला चंद्र दर्शन चुकूनही करू नये. चंद्र दर्शन या दिवशी निषिद्ध मानलं गेलं आहे. आणि जर या दिवशी चंद्र दर्शन केलं तर मानसिक विकार सुद्धा उत्पन्न होऊ शकतात.

मित्रांनो माघ महिन्यातील माघी गणेश जयंतीला गणपतीची आराधना केल्याने सर्व संकट दूर होतात, मानसिक विकार दूर होतात. या जन्मीच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊन मोक्षाचा मार्ग मोकळा होतो.

तुम्ही सुद्धा या गणेश जयंतीला गणपती बाप्पांची मनोभावे पूजा अर्चा करून त्याचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या. तुम्हा सर्वांना गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.ओम गं गणपतये नमो नमः

अशाच मनोरंजक आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.

मराठी धिंगाणा कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here