देवाला फुले वाहताना हि एक चूक करू नका, घर बरबाद होईल.

0
312

नमस्कार मित्रानो

देवपूजा करताना देवाला फुले वाहने हा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. फुले वाहिल्याने देवी देवता प्रसन्न होतात आणि देवपूजेचं संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होत. मात्र फुले वाहताना काही गोष्टींची काळजी हि घ्यायलाच हवी.

अन्यथा आपल्या माथी अनेक दोष लागू शकतात आणि मग आपल्या जीवनात अनेक संकटे आणि समस्या उभ्या राहतात. अनेकांचा या गोष्टीवर विश्वास बसणार नाही मात्र जाणून घेऊया कि हिंदू धर्म शास्त्र देवी देवतांना फुले वाहण्याच्या बाबतीत नक्की काय सांगत.

देवी देवतांना फुले वाहावीत मात्र कळ्या चुकूनही वाहू नयेत. मातीत पडलेली किंवा खराब झालेली फुले चुकूनही देवी देवतांना वाहू नयेत. सुकलेली , आधीच वास घेतलेली , कीड लागलेली फुले सुद्धा अपवित्र मानली जातात.

एखाद्या दारासमोरून किंवा चोरून आणलेली फुले , शिळी झालेली , आपल्या शरीराचा स्पर्श होऊन घाम लागलेली किंवा दुसऱ्याला न विचारताच आणलेली फुले सुद्धा देवी देवतांना वाहू नयेत. अशी फुले अपवित्र असतात.

एखाद्या झाडाला ओरबाडून तुम्ही फुले आणून देवी देवतांच्या चरणी वाहिलीत तर ती फुले देवी देवता स्वीकारत नाहीत. एखाद्या अपवित्र जागी उत्पन्न झालेली फुले सुद्धा आपण देवांना वाहू नयेत. फुले नेहमी उजव्या हातानेच तोडावीत आणि देवांना वाहताना उजव्याच हाताचा वापर करावा.

डाव्या हाताने आणलेली किंवा तोडलेली फुले देवाला रुचत नाहीत. फुले कधीही रुईच्या पानात किंवा एरंडाच्या पानात गुंडाळून आणू नयेत. ती वर्ज मानलेली आहेत. विशिष्ट देवी देवतांना विशिष्ट फुले वर्ज असतात ती त्यांना चुकूनही वाहू नयेत.

जसे कि भगवान श्री हरी श्री विष्णूंना तुळशीचं पान आणि कमळ अतिप्रिय आहेत. मात्र रुई , धोत्रा , गोकर्ण , कोरांटी , शिरीष , कण्हेर , कुडा , बेलाचे पान हे भगवान श्री हरी श्री विष्णूंना चुकूनही वाहू नयेत.

भगवान शिवशंकर महादेवांच्या बाबतीत रुई , कण्हेर , बेलाच पान , आघाडा , शमी ,बकुळ , कमळ , सुगंधित पांढरी फुले अतिशय प्रिय आहेत. मात्र शिवशंभूना काही फुले चालत नाहीत. पळसाच फुल, कुंद , मालती , बाण , तुळस ,माका , तमाल , तिरसंगी , जुई , तांबडी कण्हेर , लाल जास्वंद , गुलाब , केवडा हि फुले शिवशंभूना अर्पण करू नयेत.

जी कुंद पुष्प असतात हि शिवशंभूंना फक्त माघ महिन्यातच वाहिली जातात. जर तुम्ही एखाद्या देवीची पूजा करताय तर पूजा करताना तिला सोनचाफा , कमळ किंवा लाल फुले नक्की अर्पण करावीत. याने देवी प्रसन्न होते.

गणपती बाप्पांना मंदार , दुर्वा , शमीपत्र , जास्वंद , सिंदूर , रक्तचंदन या गोष्टी प्रिय आहेत. तुम्ही श्री गणेशांना तुळशीची पाने वाहू शकता मात्र फक्त गणेश चतुर्थीलाच. अन्य कोणत्याच दिवशी गणपती बाप्पांना तुळशी पत्र अर्पण करू नयेत ते वर्ज मानण्यात आलेले आहे.

मित्रानो देवाला फुले वाहताना ती नेहमी देवाकडे देठ करून वाहायची आहेत. जर तुम्ही बेलाच पण वाहत आहात तर बेलाच पान पालथं घालावं. दुर्वांच्या शेंड्या आपल्याकडे ठेवून देवाला वाहावे.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here