नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो सध्याच्या काळात आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेणे अत्यंत गरजेचे झालेले आहे. आणि त्यातल्या त्यात फुफ्फुसाची काळजी घेणे सध्या काळजी गरज झालेली आहे.कारण ज्यांचं फुफ्फुस चांगलं तोच निरोगी अशी व्याख्याच निर्माण झालेली आहे.
मित्रांनो फुफ्फुस 100 टक्के स्वच्छ ताकदवान राहण्यासाठी आम्ही जो उपाय तुम्हाला सांगणार आहोत तो अत्यंत महत्वाचा आहे. मित्रांनो आपल्या हृदयात अशुद्ध रक्त शुद्ध केले जाते. त्यात ऑक्सिजन हा महत्वाचा घटक मिक्स करण्याचं काम आपलं फुफ्फुस करत.
यात एक पातळ पदार्थ असतो तो म्हणजे कफ. मित्रांनो कफ प्रमाणात असेल तर कुठलाही त्रास होत नाही. मात्र वायरल इन्फेक्शन, अति थंड पदार्थ सेवन, निमोनिया या सारख्या रोगांत कफाचे प्रमाण वाढते.
परिणामी जर कफाचे प्रमाण वाढले कि फुफ्फुसाची ऑक्सिजन घेण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे शरीरातील ऑक्सिजनची लेव्हल आहे ती कमी होते. परिणामी बाहेरून ऑक्सिजन लावावा लागतो. आणि तो जर वेळीच मिळाला नाही तर प्राण जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मित्रांनो आज जो उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्यामुळे सर्दी, घशातील खव खव, खोकला या सारखे छोटे छोटे आजार देखील कमी होतात. विशेष म्हणजे या उपायाने शरीरात उष्णता वाढत नाही.
मित्रांनो सर्वात आधी आपल्याला एक ग्लास पाणी घ्यायचं आहे नंतर आले म्हणजेच अद्रक लागणार आहे. छातीतील कफ बाहेर काढण्यासाठी आले हे अत्यंत महत्वाचे कार्य करते. आल्याचा एक तुकडा बारीक किसून घ्यायचा आहे.
त्यानंतर आपल्याला त्या मिश्रणात एक चमचा जवस टाकायचे आहे. मित्रांनो जवस फुफ्फुसासाठी एक प्रकारचे टॉनिक आहे. किराणा दुकानात सहजचं तुम्हाला जवस मिळतील.
त्यानंतर आपल्याला या मिश्रणात टाकायचे आहे जेष्ठमध. मित्रांनो जेष्ठमध मेडिकल किंवा आयुर्वेदिक दुकानात सहज उपलब्ध होत. कोणत्याही प्रकारचा खोकला असुद्या जेष्ठमध त्यावर रामबाण उपाय आहे. हा दोन प्रकारात उपलब्ध होतो. एक म्हणजे काडी आणि दुसरं म्हणजे पावडर.
तुम्हाला ज्या स्वरूपात मिळेल तसा इथे वापर करायचा आहे. या मिश्रणात साधारण अर्धा चमचा जेष्ठमध टाकायचं आहे. जर काडी मिळाली तर एक काडी वाटून बारीक करून या मिश्रणात टाकायची आहे.
मित्रांनो आता हे सर्व मिश्रण उकळून घ्यायचं आहे. इतका वेळ उकळू द्यायचं आहे कि एक ग्लास पाण्याचा अर्धा ग्लास पाणी शिल्लक राहील तो पर्यंत उकळू द्यायचं आहे.
तयार झालेला काढा गाळून घ्यायचा आहे. हा कधी अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत कोणीही याचे सेवन करू शकतो. काढा कोमट झाल्यावर त्यात एक चमचा मध मिक्स करायचं आहे.
मित्रांनो मध सर्दी, कफ, खोकला या सर्वांवर खूप गुणकारी आहे. मध हे फुफ्फुसांना स्वच्छ करण्याचं काम करून आपली रोग प्रतिकार क्षमता वाढवत. मित्रांनो ज्यांना डायबेटिज किंवा शुगर आहे त्यांनी यात मध न टाकता असेच याचे सेवन करायचे आहे.
ज्यांना शुगर नाही त्यांनी मधाचा वापर नक्की करावा. मित्रांनो हा जो काढा हा तो आपल्याला सलग 7 दिवस सकाळी अनाशापोटी घ्यायचा आहे. पहिल्या दिवसापासूनच तुम्हाला फरक जाणवेल.
मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज मराठी धिंगाणा लाइक करा.
सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.