नमस्कार मित्रानो,
शुक्रवारी जन्म घेणाऱ्या व्यक्ती कशा असतात? यांच्या अंगी कोणते गुण असतात? हे आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रानो शुक्रवारी जन्म घेणाऱ्या व्यक्ती ह्या शुक्रप्रधान असतात. म्हणजे या व्यक्तींवर शुक्र या कलात्मक ग्रहाचा अधिक प्रमाणात प्रभाव असल्याचे दिसून येत असते. ज्यांचा जन्म शुक्रवारी झालेला असतो अशा व्यक्तींना स्वछता आणि टापटीप राहणे याची प्रचंड आवड असते.
थोडक्यात काय तर यांना नीटनेटके राहायला आवडत. गलिच्छपणे, गबाळेपणे राहणे यांना आवडत नाही. या व्यक्ती रसिक स्वभावाच्या असतात. ज्या व्यक्तींचा जन्म शुक्रवारी झालेला असतो अशा व्यक्ती ह्या नाते जपणाऱ्या व्यक्ती असतात. नात्यामध्ये समतोलत्व टिकवून ठेवणाऱ्या असतात. कोणीही नातेवाईक कितीही वाईट वागला तरी त्याच्याशी नाते न तोडता संबंध जोडून ठेवणाऱ्या अशा या व्यक्ती असतात.
या व्यक्ती सौंदर्यात्मक दृष्टिकोन ठेवणाऱ्या असतात. या व्यक्ती एकदम हँ डसम दिसणाऱ्या असतात. यांच्या अंगी अ ट्रॅ क्शन पॉ वर खूप जास्त प्रमाणात असते. यांच्या दिसण्यामुळेच यांच्याकडे बऱ्याच व्यक्ती आकर्षिल्या जातात. मित्रांनो या दिवशी जन्म घेणाऱ्या व्यक्तींनी व्यस नांवर कं ट्रो ल ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरून शारीरिक आजार भरपूर प्रमाणात कमी होतील.
या व्यक्ती दिसण्यात सुंदर असतात आणि राहणीमान एकदम टापटीप स्वच्छ असत. या व्यक्ती कलाकार वृत्तीच्या असतात. म्हणजे यांना अभिनयाची खूप आवड असते. छोट्या मोठ्या नाटकांत भाग घेणे, सि री यल मध्ये काम करणे असे शुक्रवारी जन्म घेणाऱ्या व्यक्तींमध्ये आढळून आले आहे. या व्यक्तींची मनोवृत्ती एकदम हलकीफुलकी असते. सोबतच या व्यक्ती लोकप्रिय असतात.
या व्यक्तींना अफाट लोकप्रियता मिळालेली दिसून येते. या व्यक्तींना फॅ श ने बल कपड्यांची आवड असते. म्हणजे महागडे कपडे खरेदी करणे, ते परिधान करणे अशी प्रचंड प्रमाणात आवड असते. त्यातच या व्यक्ती खूप खर्चिक स्वभावाच्या असतात. म्हणजे एखादी गोष्ट आवडली कि मागचा पुढचा विचार न करता ती घेतात. मग त्याची किंमत कितीही असो. परिणामी यांना अधून मधून आर्थिक समस्या जाणवतात.
स्वस्त वस्तू वापरणं यांच्या तत्वात बसत नाही. ज्या कुठल्या वस्तू वापरणार त्या महागड्याच असतात. या व्यक्ती उत्तम अशा इंटि रि यर डे कोरे टर देखील असतात. वास्तूचे नीट डे को रेशन करणे, रंग संगती निवडणं अशा प्रकारची यांना आवड असते. या व्यक्ती सिनेमा, अभिनय, इतिहास, संशोधन, गायन, वादन, नृत्य, संगीत अशा क्षेत्रात यांना आवड असते आणि या क्षेत्रात त्या यशस्वी सुद्धा होतात.
त्याचप्रमाणे या व्यक्ती ब्यु टी पार्लर सारख्या क्षेत्रात उत्तमरीत्या यश प्राप्त करू शकतात. या व्यक्तीना जेव्हा राग येतो तेव्हा त्यांना रागावर कंट्रोल राहत नाही. इतका राग येतो कि स्वतःवरचा ताबा हरवून बसतात. तर मित्रांनो अशा व्यक्तींनी रागावर थोडा कंट्रोल ठेवणे गरजेचे आहे. अनेकदा या व्यक्ती मित्रांच्या जास्त आहारी जातात व त्यांना मित्र फस वतात. त्यामुळे या व्यक्तींनी या काही गोष्टींवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
सोबतच महागड्या वस्तूंवर खर्च करणे टाळावे. या व्यक्तींना मोठं मोठ्या गाड्यांमधून प्रवास करण्याची आवड असते. त्याचप्रमाणे सिनेमा पाहणे, नवीन गाणी ऐकणे, मोठा आवाज करून गाणी ऐकणं असे यांच्या स्वभावात दिसून येत.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. जेणेकरून तुमच्या बाकीच्या मित्र मैत्रिणींना आणि नातेवाईकांना सुद्धा वाचता येईल.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी तुम्ही ज्योतिष तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.