नमस्कार मित्रांनो,
जर तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडत नसतील, प्रत्येक कामांमध्ये काही ना काही अडथळे येत असतील तर अपयश आणि कामातील अडथळे दूर करणारा अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्ही नक्की करून पहा.
मित्रांनो प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडू लागतील. कामात येणाऱ्या अडचणी दूर होतील. आज आम्ही तीन उपाय सांगणार आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी तीनही उपाय करून पहा किंवा तीन पैकी कोणताही एक उपाय नक्की करून पहा.
पहिला उपाय
प्राचीन काळापासून हिंदू धर्मात मंत्रांचे महत्त्व सांगितले जाते. मनाप्रमाणे गोष्टी घडण्यासाठी आणि कार्यातील अडचणी दूर करण्यासाठी एक मंत्र आपण दररोज सकाळी उठल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून रोज कमीत कमी एक हजार वेळा जप करावा. असे केल्यास आपल्याला कोणत्याही कार्यात यश नक्की मिळते. हा मंत्र आहे ॐ ह्रीम सूर्याय नमः
उपाय दुसरा
कोणत्याही कामासाठी घरातून निघताना एक मुठ गहू किंवा अन्य कोणतेही धान्य सोबत घ्यावे. आणि कामासाठी जात असताना रस्त्याच्या दुतर्फा किंवा कोणत्याही एक बाजूस पेरीत जावे. मूठभर धान्य घेऊन जात असताना रस्त्याच्या कडेने फेकत जायचं आहे. ते अशा पद्धतीने फेकायचे आहे की हे जे धान्य बीज आहेत ते उगवले जातील.
उपाय तिसरा
दररोज सूर्यदेवाला काही वस्तू आपण अर्पण करा. या जीवसृष्टी मध्ये सूर्याचे महत्त्व अत्यंत वरिष्ठ स्थानी आहे. दररोज अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करून आपण सुर्यदेवांना एक लाल रंगाचे फूल, चिमुटभर कुंकू, अक्षत म्हणजेच न तुटलेले फुटलेले तांदूळ अर्पण करायचे आहेत.
अर्पण करायची पद्धत पुढीलप्रमाणे आहे. एक तांब्याभर पाणी घ्या. त्यात आंब्यामध्ये लाल रंगाचे फूल टाका. चिमुटभर कुंकू आणि काही अक्षता टाका. असे सर्व एकत्र करून सूर्य देवांकडे पाहात
ॐ सूर्याय नमः ॐ भास्कराय नमः ॐ आदित्याय नमः
असा कोणताही सूर्य देवाचा मंत्र जप करून ते तांब्यातले जल आपण सूर्य देवास अर्घ्य म्हणून अर्पण करायचे आहे.
हे तीनही उपाय अपयश दूर करतात कामात येणारे अडथळे दूर करतात आणि स्वतःवरील आत्मविश्वास वाढवतात. वरील उपाय करून तुमच्या ही जीवनातील सर्व अडथळे दूर होऊन तुमच्या मनाप्रमाणे इच्छा पूर्ण होवोत.
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.
माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.