फेब्रुवारी महिन्यात जन्मणारे लोक असे असतात…

0
642

नमस्कार मित्रांनो,

आज आपण पाहणार आहोत कि फेब्रुवारी महिन्यामध्ये जे लोक जन्माला आले आहेत त्यांचा स्वभाव, त्यांचं करियर हे कस असत. कुठल्याही वर्षातील फेब्रुवारी मध्ये जे लोक जन्म घेतात त्यांचा लकी नंबर आहे चार, सात आणि नऊ.

त्यांचा आवडता रंग आहे पांढरा आणि गुलाबी. मित्रांनो ऍस्ट्रोलॉजी नुसार ज्यांचा जन्म फेब्रुवारी मध्ये झाला आहे त्यांच्यामध्ये कमालीची आकर्षण शक्ती असते. सोबतच त्यांच्यात अंतरबोध क्षमता आणि ग्रहण करण्याची क्षमता जास्त असते.

या सर्वांमुळे बाकीचे लोक तुमच्याकडे आकर्षित होतात. मित्रांनो तुमच्यात मध्ये एक सद्गुण असा आहे कि लहान लहान गोष्टींमध्ये देखील तुम्ही समाधान मानता. तुमचा आनंद गगनात मावत नाही. उलट पक्षी जेव्हा तुमच्यावर दुःखाचा प्रसंग येतो तेव्हा तुम्ही खूप जास्त दुखी होता.

मित्रांनो समाजातील तुमचं वागणं हे रहस्यमयी असत. तुम्हाला समजणे कठीण नाही पण तितकेच सोप्प्पे पण नाही. कधी कुठल्या गोष्टीवर तुमचा मूड खराब होईल, कधी राग येईल हे सांगता येत नाही.

प्रत्येक वयोगटातील वेगवेगळ्या कार्यक्षेत्रातील लोक तुमचे मित्र असतात. मनाने सरळ पण स्वभावाने कठीण अशी तुमची साधी व्याख्या आहे.

पैसे खर्च करत असताना तुम्ही अजिबात विचार करत नाहीत. बचन करणे तुम्हाला कधीच जमत नाही. तुम्ही इतके भोळे असता कि कधी तुम्ही थोडी जरी बचत केली तर ते सगळ्यांना सांगत सुटता.

या महिन्यात जन्माला येणाऱ्या लोकांमध्ये कमालीचे वक्तृत्व असते. या कौशल्यानेच ते सर्वांची मने जिंकून घेतात. पण यांच्या मध्ये धैर्य थोडे कमी असते. जर या लोकांनी थोडासा धीर ठेवला तर त्यांची कामे बिना अडचणीची दूर होतील.

पण होत अस कि या लोकांना धीर धरवत नाही. सर्व जण यांची इमानदारी आणि स्पष्ट व्यवहार यांचे कौतुक करतात. तसेच हे लोक नेहमी दुसऱ्यांना मदत करण्यास तत्पर असतात. लोकांनी पुन्हा आपल्याला मदत करावी अशी त्यांची बिलकुल अपेक्षा नसते.

सामान्यपणे फेब्रुवारी महिन्यात जन्मणारे लोक डॉक्टर, लेखक, शिक्षक आयटी विशेषज्ञ बनतात. हे लोक भाग्या पेक्षा आपल्या कर्मावर विश्वास ठेवतात. कष्ट करून सफलता प्राप्त करतात. मित्रानो हे लोक खूपच भावुक असतात त्यामुळे कोणावरही लगेच विश्वास ठेवतात.

या महिन्यात जन्म घेणारे लोक रोमँटिक असतात कारण हे लोक वेलेन्टाइन दिवस असणाऱ्या महिन्यात जन्मलेले आहेत. हे लोक आपल्या पार्टनर प्रति खुपच इमानदार असतात. आपल्या जोडीदारावर निस्वार्थपणे प्रेम करतात.

बाहेरील सौंदर्य त्यांना आकर्षित करत नाही. मनाने सरळ आणि सुंदर असणारे लोक यांना आवडतात. बऱ्याचदा हे लोक प्रेमामध्ये मैत्री आणि मैत्री मध्ये प्रेम शोधत असतात. आणि यामध्ये ते दोघांनाही ओळखत नाही.

तसे तर हे लोक बोलण्यात खूपच पटाईत असतात पण प्रेमाच्या बाबतीत मार खातात. आपल्या मनातील प्रेम ते सर्वांना सांगतात पण ज्या व्यक्तीला सांगायला हवं त्याला मात्र बिनधास्त पणे सांगत नाहीत.

मित्रांनो तुमचा जन्म फेब्रुवारी मध्ये झाला असेल तर कोणत्याही परिस्थितीत आपला आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. काळानुसार तुमच्या विचारसरणीत बदल करा. असं केले तर तुमच्यासारखी परफेक्ट व्यक्ती कोणी नाही.

तर मित्रांनो तुमचा किंवा तुमच्या मित्र परिवारामध्ये कोणाचा जन्म फेब्रुवारी मध्ये झाला असेल तर हि माहिती अवश्य शेयर करा.

अशाच माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.

मराठी धिंगाणा कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here