मित्रांनो जेव्हा शनीची कृपा बरसते तेव्हा भाग्य चमकण्यास वेळ लागत नाही. आपल्या जीवनात कितीही वाईट परिस्थिती असुद्या जेव्हा शनीची कृपा बरसते तेव्हा परिस्थिती मध्ये बदल घडून यायला वेळ लागत नाही.
मित्रांनो भगवान शनिदेव हे ग्रहांचे न्यायाधीश असून कर्म फलाचे दाता आहेत. ते व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ प्रदान करत असतात.
ज्योतिषशास्त्रा नुसार व्यक्तीच्या जीवनात जे काही बरे वाईट घडत असते त्याला एक तर व्यक्तीचे स्वतःचे कर्म जबाबदार असतात किंवा बदलती ग्रहदशा.
ज्यांची कर्म चांगली आहेत अशा लोकांना शनीला घाबरण्याचे काही कारण नाही. व्यक्तीची कर्म चांगली असतील तर शनिदेव त्यांना श्रीमंत बनवल्याशिवाय राहणार नाही आणि ज्यांची कर्म वाईट आहेत त्यांना राजापासून रं क केल्याशिवाय सोडणार नाही.
मित्रांनो अशा तीन राशीविषयी माहिती ज्योतिषशास्त्रात सांगितली गेली आहे ज्यांच्यावर शनिदेवाची नेहमीच चांगली दृष्टी असते. अशी मान्यता आहे कि यांना शनिदेव विशेष आशीर्वाद प्रदान करतात.
चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या 3 राशी ज्यांच्यावर शनी देव असतात नेहमीच प्रसन्न.
कुंभ रास
मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ हि शनिदेवाची राशी असून शनिदेवांना हि राशी अत्यंत प्रिय आहे. या राशीचे लोक प्रत्येक कामात प्रामाणिकपणा दाखवतात. स्वतःसोबतच दुसर्यांचा देखील हे विचार करतात.
स्वतःचे कल्याण आणि दुसऱ्याचे नुक सान असा विचार ते कधीच करत नाहीत. या राशीच्या लोकांनी शनिदेवाची नित्यनियमाने उपासना करावी. शनिदेवाने सांगितलेल्या मार्गाने चालले तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही.
मकर रास
मित्रानो मकर राशी देखील शनिदेवांना अत्यंत प्रिय आहे. या राशीचे लोक जि द्दी, मेहनती, निष्ठावान असतात. या राशीवर शनिदेवाची विशेष कृपा असल्यामुळे हे लोक जे काही करतात त्यात यांना नक्कीच यश प्राप्त होते.
मकर राशीच्या लोकांनी पाकिटात मोरपंख जरूर ठेवावा जेणेकरून राहू आणि केतूच्या दुष्परिणा मांपासून तुमचे रक्षण होईल.
तूळ रास
या राशीचे लोक शनिदेवांना अत्यंत प्रिय असतात. यांच्यात खरेपणा आणि प्रामाणिकपणा ठासून भरलेला असतो. या राशीच्या लोकांनी शनिदेवाची पूजा अर्चा नित्यनियमाने केली पाहिजे.
तूळ राशीच्या लोकांनी दर शनिवारी काळ्या कु त्र्याला तेल लावलेली भाकरी खायला द्यावी. लक्षात असुद्या कु त्रा काळ्या रंगाचाच असावा. सोबतच गरजूंना मदत करावी. अशाने शनिदेवाची विषेश कृपा सदैव तुमच्यावर राहील आणि प्रत्येक कामात तुम्हाला यश येईल.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.
सूचना : आपल्या कुंडली आणि राशीच्या ग्रहांच्या आधारावर आपल्या जीवना मध्ये घडणाऱ्या घटना वर उल्लेख केलेल्या घटनांच्या पेक्षा वेगळ्या होऊ शकतात. संपूर्ण माहितीसाठी आपण कोणत्याही तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.