चेहरा इतका गोरा होईल की लोक वळून वळून बघतील… काळे डाग, वांग, मुरूम होतील गायब…

0
803

नमस्कार मित्रांनो,

सुंदर दिसणं कोणाला आवडत नाही. सुंदरता सर्वांना हवीशी असते. प्रत्येकाला वाटतं आपण सुंदर दिसावं.

आपल्या चेहऱ्यावर काळे डाग असतील, मुरुमाचे फोड असतील किंवा ब्लॅक हेड अथवा व्हाईट हेड असतील, डोळ्याखाली काळी वर्तुळे असतील, चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या असतील तर आपल्या चेहऱ्याची नैसर्गिक सुंदरता दिसत नाही.

आजकाल बाजारात विविध प्रकारच्या क्रीम मिळतात. त्यामध्ये स्टिरॉइ ड्स चे प्रमाण जास्त असते. आणि सुरुवातीला अशा क्रीम चे फायदे दिसले तरी या क्रीमचे साईड इफेक्ट सुद्धा जास्त असतात.

या क्रीम्स मुळे साईड इफेक्ट मुळे त्वचा जी आहे ती ड्राय म्हणजेच कोरडी व्हायला लागेल. आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडतील. चेहऱ्यावर असलेली त्वचा पातळ दिसू लागेल, लालसर दिसू लागेल.

काही मुलींच्या चेहऱ्यावर बारीक हलके केस उगवण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे चेहऱ्यावर असलेले डाग, ब्लॅक हेड, व्हाईट हेड, काळी वर्तुळे काढण्यासाठी आपण कोणत्याही क्रीम्स न वापरता नैसर्गिक उपायांचा वापर केला पाहिजे.

आज आपण असाच एक नैसर्गिक उपाय पाहणार आहोत ज्यामुळे आपली त्वचा जी आहे ती सुंदर दिसेल, चेहऱ्यावर एक प्रकारचा चमकदार पणा येईल. या उपाया मुळे ब्लॅक हेड, व्हाईट हेड निघून जातील. डोळ्याच्या खाली असलेले काळे वर्तुळे सुद्धा पूर्णपणे निघून जातील.

तुमचा मूळ रंग जरी सावळा असला तरी हा एक साधा आणि सोपा उपाय केल्याने तुमचा चेहरा खुलून दिसेल. एक प्रकारचा गोरेपणा येईल.

मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त 3 गोष्टी लागणार आहेत. या वस्तू आपल्याला सहज रित्या उपलब्ध होतात.

आपल्याला लागणारे घटक आहेत काजू, दूध आणि तुळशीची पाने.

मित्रांनो हे काजू आपल्याला एका वाटी मध्ये दूध घेऊन रात्रभर भिजत ठेवायचे आहेत. काजू मध्ये 3 प्रकारचे स्निग्ध आ म्ल असतं.

सॅच्यु रेटेड, मोनो अन सॅच्यु रेटेड आणि पोली अन सॅच्यु रेटेड. हे तीन प्रकारचे स्निग्धआ म्ल काजू मध्ये असतं. त्वचे साठी अत्यंत पोषण असणारे हे स्निग्धआम्ल काजू मध्ये आढळत.

मित्रांनो हे काजू दुधात भिजवल्या मुळे याचे जे फायदे आहेत ते अनेक पटींनी वाढतात. काजू मध्ये तांब्याचे प्रमाण सुद्धा भरपूर असतं. तांब्याचा उपयोग तुमच्या पेशींची झीज भरून काढण्यासाठी होतो.

वयोमानानुसार रक्तवा हिन्या, त्वचा, शिथिल होत असतात त्यांना सुस्थितीत आणण्यासाठी काजू मध्ये असलेले अनेक घटक उपयुक्त ठरतात.

आपल्याला लागणारा पुढचा घटक जो आहे तो म्हणजे तुळशीची पाने. मित्रांनो तुळशीची पाने आपल्याला आपल्या प्रत्येकाच्या घराच्या अंगणात सहज मिळतात.

मित्रांनो तुळस जंतुनाशक आहे, सौंदर्य वर्धक आहे. तुळशीची पाने चेहऱ्यावर असलेले काळे डाग, कमी करण्यासाठी, त्वचा चमकदार करण्यासाठी उपयोगी ठरते. त्वचा स्वच्छ, मुलायम आणि तेजस्वी दिसण्यासाठी तुळशीची पाने अत्यंत उपयुक्त ठरतात.

काजू आणि तुळस या दोन्हीचा एकत्र वापर केला तर आपला चेहरा सुंदर दिसेल, चार चौघात आपलं व्यक्तिमत्त्व त्यामुळे उठून दिसेल. लोक तुमच्या कडे वळून वळून बघतील.

चेहऱ्यावर असलेले काळे डाग, ब्लॅक हेड, व्हाईट हेड, पिंपल्स, काळे वर्तुळ हे सर्व या उपायाने कमी होईल.

उपाय कसा करायचा जाणून घेऊया.

मित्रांनो आपल्याला रात्री एका वाटीत दूध घेऊन त्या वाटीत 3 ते 4 काजू भिजत टाकायचे आहेत. रात्रभर भिजवल्या नंतर ते सकाळी थोडे फुगलेले दिसतील.

तर हे असे दुधात भिजलेले 3 ते 4 काजू आणि 5 ते 6 तुळशीची पाने, त्याच दुधाच्या वाटीत एकत्र बारीक करायचं आहे. वाटून त्याची पेस्ट बनवायची आहे. वारल्यानंतर त्याची एक पेस्ट बनेल, क्रीम बनेल.

मित्रांनो तयार झालेली क्रीम, पेस्ट आपल्याला सकाळी अंघोळीपूर्वी 10 ते 15 मिनिटे अगोदर चेहऱ्यावर लावायची आहे. ही जी क्रीम बनेल ती आपल्या चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

आपल्या चेहऱ्यावर ही क्रीम लावल्यानंतर पहिल्याच दिवसा पासून तुम्हाला याचा फरक दिसून येईल. पहिल्या वापरा पासूनच तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर एक प्रकारची चमक दिसून येईल.

या उपयाचा कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही. या मुळे आपले पिंपल्स, मुरूम सुद्धा कमी होण्यास मदत होईल.

चेहऱ्यावर लावल्यानंतर 10 ते 15 मिनिट सुकू द्या. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या. क्रीम लावताना हलक्या हाताने त्वचेला मालिश आणि स्क्र ब करून घ्या.

आपण लावलेली क्रीम धुवत असताना साबण वापरू नका. फक्त पाण्याचा वापर करून चेहरा, त्वचा धुवुन घ्या. आपण चेहरा धुण्या साठी कोमट पाण्याचा पण वापर करू शकता.

हा उपाय आपण सलग 5 ते 6 दिवस केलात तर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यामध्ये कमालीचा फरक दिसून येईल. तुमची त्वचा सुंदर, मुलायम, चमकदार होईल. चेहऱ्यावर असलेले सगळे डाग निघून जातील.

ही क्रीम लावून धुतल्यानंतर डोळ्याच्या खाली थोडं बदाम तेलाने मालिश करायची आहे. तुमची काळी वर्तुळे सुद्धा निघून जातील.

मित्रांनो उपाय सोपे आहेत एकदा करून पहा. आयुर्वेदिक उपाय असल्या मुळे कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट होत नाहीत.

मित्रांनो हे उपाय आवडले असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज मराठी धिंगाणा लाइक करा.

सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here