नमस्कार मित्रांनो,
मित्रानो तुमचे डोळे दुखत असतील, डोळ्यांची दृष्टी कमी झाली असेल, डोळ्यांची जळज ळ होत असेल तर आजचा हा उपाय अत्यंत सोप्पा आहे. तुम्हाला सुद्धा डोळ्यांच्या समस्या असतील तर हा उपाय एकवेळ नक्की करून बघा. मित्रानो सध्या संगणक, टीव्ही, मोबाईल यांचा ऑफिस कामासाठी किंवा ऑनलाईन शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात वापर होत आहे.
या सर्वांचा ताण नकळतपणे आपल्या डोळ्यांवर पडत असतो. मग कालांतराने डोळे दुखू लागतात, डोळ्यांतून पाणी येते किंवा डोळे जळज ळ करू लागतात. डोळ्यांच्या अशा समस्यांकडे वेळीच लक्ष दिले गेले नाही तर हळू हळू दृष्टी कमी होऊन मोठ्या मोठ्या भिंगाचे चष्मे लागतात. म्हणूनच आपल्या डोळ्यांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी एक सोपा असा घरगुती उपाय पाहणार आहोत.
दृष्टी वाढवणारा आजचा हा घरगुती उपाय बनवण्यासाठी आपल्याला फक्त तीन घटक आवश्यक आहेत. त्यापैकी पहिला घटक म्हणजे त्रिफळा चूर्ण किंवा पावडर. मित्रानो त्रिफळा चूर्ण हे आयुर्वेदिक उपायांसाठी वेगवेगळ्या आजरांवर सर्रास वापरले जाते. हिरडा, बेहडा आणि आवळा या औष धी ठराविक प्रमाणात घेऊन बनवले जाणारे हे त्रिफळा चूर्ण अगदी कोणत्याही आयुर्वेदिक मेडिकल मध्ये उपलब्ध होते.
डोळ्यांच्या एकंदरीत सर्वच समस्यांसाठी हे त्रिफळा चूर्ण अत्यंत उपयुक्त असते. आजच्या उपायासाठी आपल्याला एक चमचा त्रिफळा चूर्ण घ्यायचे आहे. यानंतरचा दुसरा घटक म्हणजे मध. डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी मध देखील खूप उपयुक्त आहे. मित्रांनो लहानपणी आजी आजोबा मधमाशीच्या पोळ्यातून मध काढल्यानंतर त्यातील एक एक थेंब प्रत्येकाच्या डोळ्यात टाकायचे.
यामुळे काही वेळ डोळ्यांची आग व्हायची पण मित्रांनो त्यांना आज पर्यंत नंबरच्या चष्म्याची गरज भासली नाही. उपायासाठी आपल्याला एक चमचा मध घ्यायचे आहे. यानंतरचा शेवटचा घटक म्हणजे तूप. मित्रानो आयुर्वेदात तूप आणि मध हे नेहमी विषम प्रमाणात सेवन करण्यात सांगितले जाते. आपण मधाच्या विषम प्रमाणात म्हणजे अर्धा चमचा तूप उपायासाठी घ्यायचे आहे.
घेतलेले तूप घरगुती पद्धतीने बनवले असेल तर अतिउत्तम. आता हे तिन्ही घटक व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहेत. मित्रानो कॉम्पुटर, मोबाईल, लॅपटॉप वर काम करत असताना ठराविक वेळाने पापण्यांची उघडझाप करणे अत्यंत गरजेचे असते. सकाळी उठल्यानंतर आपले तळहात एकमेकांवर घासून डोळ्यांवर ठेवून त्याची उब डोळ्यांना द्यावी.
डोळ्यांची ठराविक व्यायाम केल्याने डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहते. आता हे तयार झालेलं मिश्रण सकाळी उपाशीपोटी हळू हळू चाटून खायचे आहे. याच्या 7 ते 8 दिवसाच्या वापराने तुम्हाला फरक दिसून येईल. डोळ्यांची जळजळ , डोळे दुखणे, डोळ्यांतून पाणी येणे यासारख्या समस्या 7 ते 8 दिवसात नष्ट होतील. आणि 3 महिन्या पर्यंत हा उपाय केलात तर डोळ्यांचा नंबर कमी झाल्याचा तुम्हाला अनुभव येईल.
मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.