मुलींच्या ‘या’ भागा वरचा तीळ असतो खूपच फायदेशीर…जाणून घ्या काय सांगतो तुमच्या शरीरावरचा प्रत्येक तीळ… 3 री गोष्ट खूप महत्त्वाची आहे…

0
374

तुमच्या शरीराच्या विविध भागांवर असलेले तिळंही तुमच्या स्वभावाची काही वैशिष्ट्ये कथन करतातच सोबत तुम्हाला शुभ-अशुभाचे संकेतदेखील मिळतात…

शरीराच्या विविध भागांवर तीळ असतात. काही तीळ हे जन्मापासून असतात तर काही तीळ वयासोबत दिसू लागतात. या तिळांच्या मागेही एक कहाणी आहे.

हे तीळ शरीराच्या काही खास भागांवर असल्यास ते भविष्य तसेच आपल्या व्यक्तिमत्वाबाबत बरीच माहिती देतात. समुद्रशास्त्रच नव्हे तर ज्योतिष शास्त्रही या तिळांबाबत बरीच माहिती दर्शवतात. अनेकदा हे तीळ आपले सौंदर्य वाढवण्यास मदत करतात. चेहरा, डोळे, नाक अथवा मानेवर तसेच अन्य भागांवर तीळ असल्यास काय होते घ्या जाणून…

काळ्या रंगाचा तीळ गालावर किंवा ओठांवर असेल तर तर क्या बात है… तुमच्या सुंदरतेला चार चाँद लावण्यासाठी हा एकच तीळ पुरेसा ठरतो. या तिळांमुळेही व्यक्तीच्या सुंदरतेत आणि आकर्षणात भर पडते. पण हाच तीळ ओठांच्या खालच्या बाजुला असेल तर मात्र दरिद्र्याची सूचना देतो.

जाणून घेऊयात… शरीरावर कोणत्या भागावर असणारा तीळ काय सांगतो…

कपाळाच्या उजव्या भागावर असणारा तीळ समाजात व्यक्तीला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारा असतो.

कपाळाच्या मध्यभागी दिसणारा तीळ व्यक्तीच्या भक्कम आर्थिक परिस्थिती व्यक्त करतो.

दोन भुवयांच्या मध्ये असलेला तीळ व्यक्ती परोपकारी, उदार आणि दिर्घायुषी असल्याचं सांगतो.

गालांवर असलेला तीळ आर्थिक दृष्टी भरभक्कम पण व्यक्ती दुर्व्यसनी असल्याचं सूचित करतो.

नाकाच्या उजव्या भागावर असलेला तीळ सुख आणि धनाकडे तर नाकाच्या डाव्या बाजुला असला तीळ कठिण परिश्रण आणि सफलतेकडे निर्देश करतो.

नाकाच्या मध्यावरच तीळ असेल तर व्यक्ती स्थिर वृत्तीची नसून इकडे तिकडे भटकताना दिसते.

नाकावर तीळ असण्याचा अर्थ अशा व्यक्ती थोड्या गर्विष्ठ अशतात. मात्र तुम्ही खूप प्रवास करणारे असाल. तुम्ही परदेश प्रवास करतील. ज्या महिलांच्या नाकावर तीळ असतो अशा महिला सौभाग्यशाली मानल्या जातात.

उजव्या गालावर असलेला तीळ प्रगतीशील असल्याचं सांगतो.

डाव्या गालावर असलेला तीळ अशुभ मानला जातो. असा तीळ गृहस्थ जीवनात धनाची कमतरता सांगतो.

हनुवटीवर आढळणारा तीळ व्यक्ती स्वार्थी, व्यक्तिवादी, केवळ स्वत:च हित पाहणारा आणि समाजापासून लांबच असलेला असा दिसतो.

कंठावर तीळ असेल तर ती व्यक्ती बुद्धिजीवी, सफल आणि स्वावलंबी असलेली आढळते.

डाव्या हातावर असलेला तीळ शुभ चिन्हं व्यक्त करतो तर उजव्या हातावर तीळ कर्जाची चिन्हं दाखवून देतो.

पोटाच्या खालच्या भागावर तीळ असेल तर अशी व्यक्ती का मूक असते. अनेक स्त्री पुरुषांच्या शरीरावर अशा प्रकारचे तीळ आढळून येतात.

जर तुमच्या कमरेवर तीळ आहे तर याचा अर्थ तुमच्या जीवनात मोठ्या संघर्षाला तोंड द्यावे लागेल. कोणतेही काम पूर्ण करताना मोठे कष्ट घ्यावे लागतील.

जर तुमच्या पायाच्या तळव्यावर तीळ आहे अथवा अंगठ्याच्या खाली तीळ असल्यास तुम्ही सतत चालणार असाल. म्हणजेच तुमच्या आयुष्यात केवळ देशातच नव्हे तर परदेशातील प्रवासाचेही अनेक योग आहेत.

ज्या व्यक्तींच्या डोळ्यामध्ये तीळ असतो अशा व्यक्ती खूप भावनात्मक असतात. उजव्या डोळ्यामध्ये तीळ असणे उच्च विचारांचे असल्याचे संकेत देतात.

ओठांवर ज्यांचा तीळ असतो त्या व्यक्ती प्रेमळ स्वभावाच्या असतात. मात्र तीळ ओठांच्या खाली असेल तर यामुळे खिसा खाली होण्याचे संकेत असतात.

एखाद्या व्यक्तीच्या पाठीवर तीळ असल्यास ती व्यक्ती एका ठिकाणी न टिकणारी असते. या व्यक्ती भरपूर प्रवास करतात.

पोस्ट आवडली असेल तर मित्रांसोबत जरूर शेयर करा…

अशाच नवीन पोस्ट मिळवण्यासाठी आताच आपले पेज लाइक करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here