नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो अनेकदा आपल्याला शत्रूपिडा असते. शत्रूपिडा याचा अर्थ अनेकांना समजत नाही. आपल्या आयुष्यात येणारे काही लोक चांगले असतात, काही लोक स्वभावाने दुष्ट असतात.
मुळातच दुष्ट असणाऱ्या लोकांशी आपण कितीही चांगलं वागलं तरी ते आपल्या सोबत वाईटच वागतात. अशा लोकांमुळे आपला त्रास वाढतो. याचा इतका त्रास होतो की जगणं मुश्किल होतं.
मित्रांनो तुमचे शत्रू खूप बलवान असतील, ते आपल्याला खूपच त्रास देत असतील तर तंत्र मंत्र शास्त्रात असे काही उपाय सांगितलेले आहेत ज्याचा वापर करून आपण त्यांच्या पासून मुक्ती मिळवू शकता.
आपण आज जो उपाय पाहणार आहोत त्या उपायाने आपल्या शत्रूची ताकत कमी होईल. ज्या बळाने आपला शत्रू आपल्याला त्रास देतो ते बळच नष्ट करण्याचं काम आपला आजचा उपाय करेल.
मित्रांनो आपल्या कुंडली मध्ये काही दोष असतात, अशावेळी काही विशिष्ट परिस्थितीत काही उपाय आपल्याला लागू पडत नाहीत. अशा वेळी हार न मानता दुसरा उपाय करणं हे आपल्या हातात असतं.
आपला आजचा उपाय आहे तो आपल्याला आपल्या शत्रू पासून होणाऱ्या त्रासापासून नक्की मुक्ती देईल.
चला तर जाणून घेऊया शत्रूपिडा पासून कशी मुक्ती मिळवावी.
मित्रांनो आपल्याला एक सफेद कागद लागेल. सफेद म्हणजे पांढरा. ज्यावर काहीही लिहलेल नसेल, रेषा नसतील असा.
हा उपाय अमावस्या तिथीला केला तर अतिउत्तम आहे. नसेल तर आपण कोणत्याही दिवशी करू शकता. पण हा उपाय करण्यासाठी वेळ रात्रीचीच निवडावी. रात्रीच्या वेळी नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात कार्यरत झालेल्या असतात.
रात्री 10, 11 किंवा 12 वाजता कधीही आपण हा उपाय करू शकता. उपाय गुप्तपणे करावा. कोणालाही सांगू नका. उपाय करण्यापूर्वी सुद्धा आणि केल्यानंतर सुद्धा कोणाला सांगू नका.
मित्रांनो 3 टी प नेहमी लक्षात ठेवा. हे उपाय, तोटके करण्यापूर्वी कोणाला तरी गुरू माना. स्वामी समर्थ, गजानन महाराज किंवा आणखी कोणी संत असतील त्यांना गुरू माना. तुमच्या अर्ध्या समस्या इकडे कमी होतील.
आपल्या कुलदैवताचे स्मरण करा. कुलदैवताची पूजा अर्चना करत चला, आशीर्वाद घेत चला. आपल्या घरातील समस्या कमी होतील.
आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे उपाय आम्ही सांगतो ते अगदी मनापासून, श्रद्धेने करत चला. मनात कोणत्याही प्रकारची शंका ठेऊ नका. आपल्या घरातील महिलांचा आदर करा.
मित्रांनो आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला पांढरा कागद सोबतच आपल्याला दुसरी वस्तू जी लागणार आहे ती आहे काळ्या शाईचे पेन.
आपण घेतलेल्या सफेद रंगाच्या कागदावर आपल्या शत्रूचे नाव लिहा. पूर्ण नाव लिहा किंवा पहिले नाव लिहलं तरी चालेल. नाव लिहून दक्षिण दिशेकडे तोंड करा. आणि एक मंत्र जाप आपल्याला करायचा आहे.
मित्रांनो तो मंत्र आहे क्रीम क्रीम शत्रूनाशिनी क्रीम क्रीम भट. 11 वेळा या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे.
मित्रांनो आपण ज्या कागदावर नाव लिहलं आहे त्या लिहलेल्या नावाकडे पाहत या मंत्राचा जप करायचा आहे. आपल्या मनातील सर्व राग त्या कागदात उतरत आहे अशी कल्पना करायची आहे.
11 वेळा जप करून झाल्यानंतर काळ्या पेनाने हाच मंत्र त्या कागदावर शत्रूच्या नावाखाली लिहा. मंत्र लिहुन झाल्यानंतर तो कागद आपण ताबडतोब जाळायचा आहे. जाळल्यानंतर जी राख आहे ती बाहेर फेकून द्या.
मित्रांनो या उपायाने तुमच्या जीवनात असलेली शत्रुपीडा कमी होईल. शत्रू तुम्हाला कधीही त्रास देणार नाही.
पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने हा उपाय करा याचा तुम्हाला नक्की फायदा होईल.
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.
माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो.
अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.