घरात हत्तीची मूर्ती ठेवल्याने काय घडते? काय सांगते वास्तुशास्त्र?

0
1164

नमस्कार मित्रांनो,

हत्तीला हिंदू संस्कृतीत खूप शक्तीशाली व पवित्र प्राणी मानले जाते. हत्तीला दीर्घायुष्याचे प्रतीकही मानतात. वास्तुशास्त्रानुसार घरात हत्तीची मूर्ती ठेवल्याने खूप फायदे होतात.

वास्तुशास्त्रात घर असो, दुकान असो किंवा फॅक्टरी असो हत्तीची मूर्ती ठेवणे खूपच लाभदायक मानले गेले आहे. घरात किंवा दुकानात उत्तरेकडे वरती सोंड केलेला हत्ती ठेवल्याने त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो.

प्राचीन धर्म ग्रंथानुसार चांदीचा भरीव हत्ती बनवून घरात ठेवल्याने घरातील ग्रहांचा वाईट प्रभाव कमी होऊन चांगल्या प्रभावात रूपांतर होते. तसे तर हत्तीकडे गणपती बाप्पांचे रूप म्हणून देखील पाहिले जाते.

घराच्या मुख्य द्वारावर वरती सोंड केलेले दोन हत्ती दोन्ही बाजूला लावल्यास घरात प्रेम व आनंदी वातावरणाची निर्मिती होते. सोबतच कोणत्याची प्रकारची नजर किंवा दोष देखील लागत नाही.

कुटुंबातील भांडण मिटवण्यासाठी 3 हत्ती पूर्व दिशेला ठेवणे खूप शुभ मानले जाते. परंतु असे हत्तीचे कळप घरात ठेवताना या गोष्टीकडे विशेष लक्ष दयावे कि घरात ठेवताना सर्वात मोठा हत्ती पुढे असायला हवा व त्यामागे उतरत्या क्रमानुसार हत्ती ठेवावेत.

आपल्या बेडरूम मध्ये जर पांढऱ्या रंगाच्या हत्तीची मूर्ती ठेवल्यास पती पत्नी मधील प्रेम वाढीस लागते. आपले पूर्वज असे सांगत कि कर्जापासून मुक्ती मिळवायची असेल तर खऱ्या हत्तीच्या खालून निघावे व त्याच्या पायाखालची थोडी माती उचलून ती विहरीत टाकावी.

असे केल्याने आपल्यावर जर कर्ज असेल तर ते लवकरच फिटेल. आपल्याला शत्रू त्रास देत असतील, शत्रूंचे भय वाटत असेल तर शनिवारी एक अंकुश हत्तीच्या माहुताला दान करावे. यामुळे आपल्या शत्रूंचा नाश होईल व होणारा त्रास कमी होईल.

लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न व्हावी, घरात पैशाची आवक वाढावी, धनलाभ व्हावा यासाठी चांदीचा एक भरीव हत्ती तो छोटा असला तरी चालेल पण भरीव असावा असा हत्ती आपल्या पैशांच्या तिजोरीत ठेवावा.

लक्षात असुद्या हा हत्ती सुद्धा वरती सोंड केलेलाच असावा. असे केल्याने आपल्या पैशांची आवक वाढेल व देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर होईल. आपल्या आर्थिक स्थिती मध्ये खूप फरक पडलेला आपल्याला जाणवेल.

जर उंच सोंडेचा हत्ती आपण आपल्या ऑफिसच्या टेबलवर ठेवला तर आपल्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होते सोबतच निर्णय क्षमतेमध्ये प्रभावी बदल पाहायला मिळतो.

चांदीचा हत्ती बनवून ठेवणे शक्य नसेल तर दगडी सफेद मारबलचा हत्ती बनवून देखील तुम्ही घरात किंवा ऑफिस मध्ये ठेवू शकता.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here