रविवार 23 मे 2021, भागवत एकादशी… गुपचूप ठेवा तुळशीची 2 पाने… पैसा, सुख, शांती भरभरून मिळेल…

0
347

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो हिंदु धर्मात जसे प्रत्येक सणाला खूप महत्त्व आहे तसेच प्रत्येक महिन्यातील संकष्टी, अमावस्या, पौर्णिमा, एकादशी यांनाही तितकेच महत्त्व आहे.

हिंदु धर्मात प्रत्येक महिन्यामध्ये एक तर सण असतोच. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षात येण्याऱ्या एकादशीस भागवत एकादशी असे म्हणतात. या एकादशीस काही उपाय जर आपण केले तर  जीवनातील अनेक समस्यातुन आपल्याला मुक्ती मिळते.

मित्रांनो या उपायांमुळे आपल्या वरील कर्ज असेल तर त्यातुन मुक्तता होते. घरामध्ये सुख शांती नसेल तर आत्मिक शांती सुद्धा मिळते. घरातील व्यक्तींना आरोग्य प्राप्त होण्यास मदत होते. मुले हुशार होतात.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तुम्ही या एकादशीचा उप वास नक्की करा. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची   विधिवत पूजा करा. या एकादशीच्या सकाळी आपण भगवान विष्णूचा केसरयुक्त दुधाने अभिषेक करावा. याने जीवनात सुख आणि समृद्धीची प्राप्ती होते.

मित्रांनो ज्यांना धनलाभची अपेक्षा आहे त्यांनी भागवत एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू सोबत माता लक्ष्मीची पूजा करावी. याने धनाबरोबर सौभाग्य सुध्दा प्राप्त होते.

या एकादशीला जर आपल्या घरामध्ये तुळशीची माळ असेल तर या माळेवरती

ओम नमो भगवते वासूदेवाय

या महाविष्णू मंत्राचा सातत्याने 108 वेळा जप करावा, ज्यामुळे आपलं कल्याण होते.

मित्रांनो भगवान विष्णूना पिवळ्या रंगाची फुले खुप आवडतात. म्हणून आपण त्यांच्या पुजेमध्ये आपल्या  इच्छापुर्तीसाठी ही फुले अर्पण करावीत. पिवळ्या रंगाचे वस्त्र  परिधान करावे आणि दुसऱ्या दिवशी या सर्व वस्तुचे आपण दान करू शकता.

मित्रांनो जर गोरगरिबांना दान केलं तर ते अतिशय चांगले पुण्याचे काम आहे असे आपले हिंदू धर्म शास्त्र सांगते.

ज्या व्यक्तींवर कर्जाचा डोंगर आहे त्यांनी या एकादशीला पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे. ते अर्पण करताना झाडाभोवती 9 किंवा 11 फेऱ्या मारून विष्णूच्या नामाचा जप करावा.

भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्रसाद म्हणून खीर अर्पण केली तर त्यावर दोन तुळशीपत्रे ठेवावीत. ही तुळशीची पाने तुमच्या एकादशी दिवशी चुकूनही तोडू नयेत, आधीच तोडून ठेवावीत. यामुळे घरात सुख शांती निर्माण होते आणि घरत धनलाभ होतो.

मित्रांनो अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे या एकादशी दिवशी चुकुनही तुळशीची पाने तोडू नयेत. एकादशीच्या रात्रीच्या वेळेस माता तुळशीची पूजा करून गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि

ओम वासुदेवाय नमः

हा मंत्रजप करावा. माता तुळशीच्या 11 फेऱ्या माराव्यात व माता तुळशीला तुमच्या प्रयत्नांच्या यशासाठी प्रार्थना करावी.

अशाच मनोरंजक आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.

मराठी धिंगाणा पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here