आज महा एकादशी… जया एकादशी तुळशीला अर्पण करा ही एक वस्तू…

0
287

नमस्कार मित्रांनो,

आज मंगळवार 23 फेब्रुवारी एकादशी आहे. माघ शुक्ल एकादशीला जी एकादशी येते त्या एकादशीला जया एकादशी म्हटले जाते. धार्मिक मान्यतेनुसार जया एकादशी व्रत अत्यंत पुण्यवान मानले जाते.

असे मानले जाते कि या दिवशी उपवास ठेवल्यास मानवी आयुष्यातील सर्व पापे दूर होतात. तसेच हा उपवास ठेवणाऱ्यांना वाईट योनी अर्थात भूत, प्रेम, पिशाच्च यातून मुक्ती मिळते. या एकादशीनंतरच राजा हरिश्चंद्र यांना त्यांचे राज्य पुन्हा मिळाले.

जयएकादशीला अन्नदा एकादशी किंवा कामिका एकादशी असेही म्हणतात. नियमानुसार दशमीच्या उपवास ठेवणाऱ्यांनी सात्विक भोजन करावे. कांदा आणि लसूण घालून बनवलेले अन्न खाऊ नये. तसेच डाळ, चणे आणि बेसन पिठापासून बनवलेले अन्न खाऊ नयेत.

एकादशीच्या दिवशी सकाळी आंघोळ केल्यानंतर पूजेच्या ठिकाणी गंगाजल शिंपडावे. नंतर पाटावर पिवळ्या रंगाचे कापड घालून श्री हरी विष्णूंची मूर्ती ठेवावी. नंतर व्रताची कथा वाचून आरती करावी. त्यानंतर दिवसभर उपवास करावा.

रात्री फलाहार करू शकता, पण फक्त गोड फळे खावीत. शक्य असल्यास रात्र भर भजन कीर्तन करून जागरण करावे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला स्नान करून दान करावे. आणि त्यानंतरच अन्न ग्रहण करावे. उपवासाच्या दिवशी कोणाची निंदा करू नये.

मित्रांनो श्री हरी विष्णूंना तुळस अति प्रिय आहे. तुळशीचे पान न ठेवलेले नैवैद्य भगवंत स्वीकारत नाहीत. शास्रात सांगितल्या नुसार एकादशीच्या दिवशी तुळशीचे पूजन केल्यास आपली जन्मजन्मांतरीचा पापे नष्ट होतात.

तुळशीचे पूजन करण्यासाठी एका तांब्यात शुद्ध पाणी घ्यावे. त्यात थोडेसे कच्चे दूध टाकावे, चिमूटभर साखर टाकावी व चिमूटभर हळद टाकावी. एक चमचा गंगाजल टाकून हे पाणी तुळशी मातेला अर्पण करावे.

जल अर्पण करताना श्री हरी विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अखंड जप करत राहावे. पाणी अर्पण केल्यानंतर तुळशीसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावावा. त्यानतंर लाल रंगाची छोटी ओढणी घ्यावी व ती तुळस मातेला अर्पण करावी.

नंतर तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालाव्यात. प्रदक्षिणा घालताना सुद्धा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप सुरु ठेवावा. आपल्या ज्या काही समस्या, अडचणी, स्वप्ने असतील ती बोलून दाखवायची आहेत.

आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करावी. कारण एकादशीच्या दिवशी भगवंत सर्वात आधी तुळस मातेचीच सेवा स्वीकार करतात. आपल्या सर्व इच्छा तुळशीमाते च्या मदतीनेच भगवंता पर्यंत पोहोचतात. त्यामुळे आपली इच्छा व मनोकामना लगेच पूर्ण होते.

शास्त्रात सांगितले गेले आहे कि एकादशीच्या दिवशी तुळशीमातेचे पूजन केल्यास मनुष्याला सुख समृद्धीची प्राप्ती होते. आणि मृत्यू नंतर तो व्यक्ती विष्णू लोकांत जातो. एकादशीला फक्त तुळस मातेचे दर्शन जरी घेतले तरी मनुष्य सर्व पाप मुक्त होतो.

पदमपुराणात सांगितले आहे कि जेथे तुळशीचे एक जरी रोप असेल तिथे त्रिदेव म्हणेजच ब्रह्म विष्णू आणि महेश हे एकत्रित निवास करतात. अशा प्रकारे तुळशीमातेचे पूजन करण्याबरोबरच काही गोष्टींकडे लक्ष देणे सुद्धा आवश्यक आहे.

तुळशीचे पुजण स्नान झाल्यानंतरच करावे. एकादशीच्या दिवशी श्री हरी विष्णूंना तुळशीची पाने जरूर अर्पण करावीत. परंतु एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत. एक दिवस आधीच तुळशीची पाने तोडून मगच ती विष्णूंना अर्पण करावीत.

तुळशीची पाने कधीही शिळी होत नाहीत. तुळशीला संध्याकाळी कधीही पाणी अर्पण करू नये. एकादशीच्या दिवशी सात्विक भोजन करावे. एकादशीच्या दिवशी तांदूळ खाऊ नयेत तसेच पूजनात सुद्धा तांदूळ वापरू नयेत. एकादशीला या सर्व गोष्टी लक्षात ठेवून पूजन करावे.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणाचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here