आपला धंदा, व्यापार, दुकानात तेजी येण्यासाठी करा हा जबरदस्त उपाय…

0
679

नमस्कार मित्रांनो,

आपण मोठ्या उत्साहात आपल स्वतःच दुकान सुरू करतो, एखादा व्यवसाय उभा करतो, सर्व आखणी, गोळाबेरीज करतो, सुरुवातीला बराच प्रतिसाद दिसून येतो. नवीन दुकान, नवीन व्यवहार काहीतरी वेगळं म्हणून ग्राहक आकर्षित होतात.

परंतु काही दिवसांनी वेगळंच चित्र दिसू लागते, ग्राहक प्रतिसाद कमी होतो, भरपूर पैसे गुंतवणूक करून भरपूर माल भरलेला असतो व पण तो खपत नसतो. अशा वेळी मानसि क अशांती निर्माण होते, गोंधळ होतो, भीती वाटते.

काही व्यक्तींचा व्यवसाय खूप तेजीत चालतो तर काहींचा व्यवसाय अजिबातच चालत नाही. काही व्यक्तींचा व्यवसाय चांगला चालता चालता अचानक कमी होतो. मग त्या दुकानदाराला काय करायचे समजत नाही. त्याला वाटते की माझ्या दुकानाला कोणाची तरी दृष्ट लागली आहे म्हणूनच असे होते तर यासाठी एक खास उपाय आज आपण जाणून घेऊया.

मित्रांनो हा उपाय अगदी साधा व सोपा आहे. शिवाय यात फक्त एकाच वस्तूची आपल्याला गरज पडणार आहे. हा उपाय केल्याने फक्त चोवीस तासात तुम्हाला तुमच्या व्यवसायात वाढ झालेली दिसून येईल. ज्यांचा व्यवसाय बंद पडला आहे किंवा ज्यांना आपला व्यवसाय वाढवायचा असेल त्या सर्वांनी हा उपाय नक्की करावा.

आपल्या दुकानात किंवा ऑ फि स मध्ये ज्या इतरांना संपर्क करण्याच्या वस्तु जसे टेलिफोन, मोबाईल, कॉम्पुटर इ. वस्तु असतील ज्याद्वारे आपण ग्राहकांशी कनेक्टेड राहतो व नेहमी संपर्कात असतो. अशा वस्तू नेहमी दुकानाच्या किंवा ऑफिसच्या वायव्य दिशेला म्हणजेच पश्चिम दिशा व उत्तर दिशा ज्या एकत्र येतात त्या कोनात ठेवाव्यात.

आपल्या व्यवसायासाठी किंवा ऑफिसला घराबाहेर पडण्यापूर्वी घरातील झाडुला एकदा नमस्कार करावा मगच घराबाहेर पडावे. कारण आपण मानत नसलो तरीही आपल्या धर्म ग्रंथात झाडुला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. जेव्हा आपण झाडूला नमस्कार करतो तेव्हा साक्षात देवी लक्ष्मीला आपण नमस्कार करतो. यामुळे आपला व्यवसाय नक्कीच वाढेल.

मित्रांनो त्याशिवाय शनिवारी किंवा अमावस्येच्या दिवशी एक लिंबू घ्यावे. लिंबू अगदी स्वच्छ व डागविरहित म्हणजेच त्यावर कोणत्याही प्रकारचा डाग किंवा रेषा नसावी. लिंबू ताजे व रसभरीत असावे. त्या लिंबावर काळया स्केचपेनने किंवा काळया मार्करने मोठ्या अक्षरात 370 हा आकडा काढावा.

दुकानाच्या किंवा ऑफिसच्या मुख्य दाराजवळ जाऊन डाव्या बाजूच्या भिंतीला लिंबुचा स्पर्श करीत करीत पुढे जावे व पुढे दुकानाला आतून त्या लिंबाचा स्पर्श करीत करीत परत दुकानाच्या मुख्य दाराजवळ उजवीकडून भिंतिकडून बाहेर पडावे.

हा उपाय करताना लिंबू उचलू नये तो दुकानाला स्पर्श करीत करीतच बाहेर काढावा. आधीच बाहेर एक सूरी काढून ठेवावी व लगेचच त्या लिंबाचे मधोमध चार भाग करावेत. परंतु वरूनच चार भाग करावेत ते झाली चारही भाग जोडलेले असावेत. अशाप्रकारे तो लिंबू कापावा व लगेचच चार रस्त्यावर नेऊन ते लिंबू टाकून द्यावे. लिंबू टाकायला जाताना व येताना रस्त्याने कोणाशी काहीही बोलू नये. परत येताना मागे वळून पाहू नये.

मित्रांनो या उपायाने जर तुमच्या धंद्याला कोणाची नजर लागली असेल, ग्राहक येऊन जर काहीही न घेता परत जात असतील, सर्व माल असूनही ग्राहक दुकानाकडे फिरकत नसतील तर ते सर्व निघून जाईल. तुमच्या ग्राहकांमध्ये वाढ होईल व पर्यायाने उत्पन्नात वाढ होईल.

तुमचा व्यवसाय व्यवस्थित चालू लागला की वरचेवर हा उपाय एखाद्या शनिवारी करीत राहावे त्यामुळे आपल्या धंद्याला कोणाची वाईट नजर लागणार नाही व ऑफिसचे कामही वेगाने होईल. अशा प्रकारे आपला उद्योग अविरत सुरू राहील व उत्पन्न भरपूर वाढेल. ज्यामुळे घरातील वातावरण, सदस्य सुखी राहतील. हा उपाय सर्व दोष, बाधा, करणी दूर होतील. म्हणून हा उपाय नक्की करून पहा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here