नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो आपल्या हातून काही गोष्टी रोजच्या जीवनात घडत असतात. जर त्या गोष्टी चांगल्या असतील तर काही हरकत होत नाही. पण त्याच जर अचानक पणे आपल्यासमोर अनपेक्षितपणे जर घडल्या तर मनात शंकेची पाल चुकचुकते.
अशा घटना घडल्यामुळे मनात गोंधळ निर्माण होतो, मनात संभ्रम होतो व विनाकारण त्या गोष्टी जिव्हारी लागतात.
मित्रांनो अशीच रोजच्या जीवनातील गोष्ट म्हणजे दूध उतू जाणे.
जवळपास सर्वच गृहिणी या परिस्थितीला रोजच सामोऱ्या जातात. आपल्या हिंदू धर्म परंपरा, शास्त्र यांचा बराच संबंध जीवनाच्या जवळपास सर्व गोष्टींशी निगडित आहे.
मित्रांनो आपल्या हातून कळत नकळत दररोज गडबडीत अनेक चुका होत असतात. त्यामध्ये आपल्या हातुन कधी आरसा फुटतो किंवा कधी दुध जमीनीवर सांडते. घरातील महिलांकडून कधी गॅसवर किंवा चुलीवर दुध ऊतू जाते.
एखाद्या महत्त्वाच्या कामाला जाताना नेमके मांजर आडवे जाते. या घटना घडल्यावर मनात शंका येते की या घटना शुभ की अशुभ आहेत.
काही वेळेस असंही वाटते की ही येणाऱ्या संकटांची चाहूल अथवा संकेत तर नाही ना.
मित्रांनो आपल्या शास्त्रानुसार या घटना आपल्या भविष्यात होणाऱ्या गोष्टींची पूर्व सूचना देत असतात. गॅसवर किंवा चुलीवर ऊतू गेलेलं दुध शुभ की अशुभ ही शंका बऱ्याच लोकांच्या मनात असते.
तसे पाहायला गेले तर दूध ऊतू जाणे हा संकेत हिंदु आणि ज्योतिष शास्त्रानुसार अत्यंत शुभ मानला जातो. त्याने तुमच्या नजीकच्या भविष्यात अनेक गोष्टी, कार्ये शुभ घटना होणार आहेत. म्हणून नवीन वास्तू किंवा घरात प्रवेश केल्यावर आधी एक दिवस रिकाम्या घरात दूध ऊतू घालवले जाते.
मित्रांनो ही एक शुभ गोष्ट असून ते वास्तूमध्ये तुम्ही पूर्ण स्नेहाने, आपुलकीने राहता व घरात सुख समृद्धी येते आणि म्हणून दूध ऊतू जाणे हे शुभ मानले जाते. पण काही वेळा दुध ऊतू गेल्याने घरातील स्त्रीला नको ते बोलणे ऐकावे लागते.
मित्रांनो असे केल्यास स्त्रीचा अपमान होतो व घरात उदासी नता येते. कारण घरातील स्त्री म्हणजे माता लक्ष्मी असते. बरेचजण या शुभ गोष्टीचा फायदा घेण्यासाठी मुद्दामून दूध ऊतू घालवतात. याने कोणत्याही गोष्टीचा फायदा होत नाही.
ज्याचा धार्मिक गोष्टी व ज्योतिष विधी वर विश्वास आहे त्यांनीच या गोष्टीवर विश्वास ठेवावा, पण मुद्दामून दूध ऊतू घालवू नये
मित्रांनो तसेच काही वेळेस आपल्या हातून दूध सांडते ते हाताने किंवा पाय लागून सांडू शकते. हा अशुभ संकेत मानला जातो. नजीकच्या काळात तुमच्या बाबतीत किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याबाबत काही तरी अशुभ होण्याचे हा संकेत असतो.
या घटना कोणत्याही असू शकतात, एखादा अपघात होण्याची शक्यता असते पण हा अपघात रस्त्यावर वर होईल असे सांगता येत नाही, घरीही एखाद्या धोक्याच्या कामात तुमचे शारीरिक नुकसान होऊ शकते.
तुमचे एखादे काम बंद होऊ शकते, परिणामी तुमचा तोटा होण्याचा हा महत्वाचा संकेत असतो. यासाठी हा पर्याय आहे की तुम्ही आधीपासूनच सावध राहणे गरजेचे असते.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.
अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेजचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.