हे एक फुल करेल तुमचं घराचं स्वप्न पूर्ण…

0
509

नमस्कार मित्रांनो,

आपण जिथे राहतो ती आपली वास्तू, आपलं घर हे एक प्रत्येकाचं स्वप्न असते. जर घर जुने असेल तर नवीन घराच स्वप्न आपण पाहतो, जर घर दुरुस्त करायचे असेल, मध्येच काम अर्ध राहिले असेल तर घराला विविध मार्गांनी सजवण्यासाठी प्रयत्न करतो.

मित्रांनो यामध्ये बऱ्याचदा अनेक अडचणी येतात. तुमचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी भरपूर समस्या येतात. या समस्यांचं निराकरण करण्यासाठी आपल्याकडे भरपूर उपाय आहेत. ते जर केले तर तुमची चिंता मिटू शकते, कारण यामुळे तुम्हाला ईश्वराचा आशिर्वाद मिळेल.

घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमचे सर्व अडथळे दूर करेल हे एक फुल.

मित्रांनो घरासाठी जागा, प्लॉ ट शोधायला प्रॉ ब्ले म येत असतील, प्लॉ ट खरेदी त्रास करत असेल, व्यवहार लांबणीवर पडत असतील, अशा प्रकारच्या अनेक समस्या निर्माण झालेल्या असतील तर काळजी करू नका, हा एक उपाय तुमची समस्या दूर करेल.

आपला आजचा हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या पाठीमागे असणारे प्रॉ ब्ले म दूर होतील व तुमचं घराच स्वप्न साकार करण्यासाठी सर्व रस्ते मोकळे होतील.

जर घराचं बांधकाम अपूर्ण असेल तरीही तुम्ही हे उपाय करू शकता. हे सर्व उपाय किंवा यातील एक उपाय तुम्ही मनापासून श्रद्धेने करायचा आहे.

मित्रांनो तुम्ही चालत बोलत, उठता बसता किंवा तुळशीची जपमाळ सोडून इतर कोणत्याही जपमालेने हा जप करू शकता जास्तीत जास्त वेळा हा जप करायचा आहे त्यासाठी मंत्र आहे

ओम गजानन , जय गजानन

मित्रांनो या मंत्राचा सतत जप करा यामुळे तुमचे स्वप्न लवकरच फळाला येईल.

मित्रांनो गणपतीची पूजा करायची आहे, ज्यामध्ये तुम्हाला 21 संकष्टी करायच्या आहेत किंवा ते जर खूप वाटत असेल तर 21 मंगळवार तुम्ही उपास करू शकता.

एकवेळ जेवून तुम्हाला हा उपास करायचा आहे व त्यादिवशी गणपतीला दुर्वा आणि एक जास्वंदी चे  फुल वाहायचे आहे आणि तुमच्या वास्तू पूर्तीसाठी प्रार्थना करायची आहे.

गणपती अथर्वशीर्ष पठण तुम्ही दररोज करायचं आहे. त्यामुळे तुमच्या मनात सकारात्मक विचार येऊन तुमच्या कामात स्फूर्ती मिळते.

जरी तुमचे घर पूर्णत्वास येत असेल तरीही हे उपाय करण्यात खंड पाडायचा नाही.

जर तुमच्या गृहक र्जाला मान्यता मिळण्यासाठी विलंब होत असेल, हो म लो न चे काम अपूर्ण राहून रखडलेले असेल तर तुम्ही हा एक प्रभावी उपाय करायचा आहे.

प्रत्येक मंगळवारी तुम्ही एक वाटी लाल मसुरीची डाळ व त्यामध्ये 100-150 ग्रॅम गुळ मिक्स करून तांबड्या रंगाच्या देशी गाईला भरवायचा आहे.

जर अशी गोमाता नसेल तर इतर कोणत्याही गोमातेला तुम्ही भरवू शकता व प्रार्थना करा की तुमचं काम लवकर फळास येऊ देत.

अशा प्रकारे हे उपाय खंडित न पाडता जरी काम झाले तरी चालू ठेवायचे आहेत. पूर्ण श्रद्धेने व विश्वास ठेवून हे उपाय करायचे आहेत.

मित्रांनो या उपायांनी तुमचं घराचं स्वप्न लवकरच पूर्ण व्हावं ही सदिच्छा.

अशाच मनोरंजक आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.

मराठी धिंगाणा पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here