नमस्कार मित्रानो
प्रत्येक व्यक्तीची हीच मनोकामना असते कि घरात सुख शांती नांदावी.. पैसा अडका येतच रहावा. धनाचे आगमन व्हावे यासाठी अनेक प्रयत्न देखील केले जातात. अनेकदा केलेल्या मेहनतीच्या तुलनेत लाभ होत नाही.
मित्रांनो काही नकारात्मक शक्ती अशा असतात कि ज्या घरात ठाण मांडून बसतात. या शक्ती तुम्हाला बाहेरूनच तुमची संगत पकडून तुमच्या सोबतच घरात प्रवेश करतात. आणि बघता बघता सर्वच बिघडायला सुरु करतात.
जेवढ्या नकारात्मक शक्ती आहेत त्यांचा आहार म्हणजे चिंता , समस्या आणि ताणच असते. ह्या गोष्टीला तुम्ही स्वतः देखील तपासुन बघा, ज्या व्यक्तीच्या जीवनात त्रास , चिंता आणि ताण आहे दिवसेंदिवस त्यांच्या समस्यांमध्ये वाढच होत राहते.
अशा व्यक्तीने कितीही प्रयत्न मेहनत केली तरी देखील त्याला कोणताही लाभ होत नाही. दुःखाची सुरुवात छोट्याच गोष्टीने होते. अशा दुःखी अंतःकरणाने जेंव्हा कधीही तुम्ही बाहेर जाता, त्यावेळी अशा नकारात्मक शक्ती बाहेर सर्वत्र हजर असतात.
त्यावेळी तुम्हाला दुःखी बघून त्यांना त्यांचा आहार मिळतो आणि त्या शक्ती तुमची संगत पकडतात. अनेकदा तुकम्हे आपल्याच घरात मन रमत नाहीये असाही अनुभव घेतला असेल. घरात असूनदेखील जास्त चिंता त्रास होऊ लागतो.
अकारण मनात खूप सारे विचार दाटून येतात. याचं कारण म्हणजे त्या वास्तूत घरात नकारात्मक शक्तींचा वास आणि प्रभाव असतो. त्यामुळे घरातील लोकांना शिकार बनवून त्यांना अजून दुःख देऊ लागतात या नकारात्मक शक्ती.
बऱ्याचदा अकारण भिती वाटत असल्याचे देखील तुम्हाला जाणवले असेल. त्यामागेही हेच कारण आहे. घरात ज्या भागात रोज साफसफाई होत नाही त्या भागात जास्त धूळ , माती , जाळं असते तिथेच त्यांचे मुख्य स्थान असते.
मित्रानो जवळपास सगळ्यांच्याच घरात पायपुसणी असते. उपाय करण्यासाठी एक तुरटीचा खडा घेऊन त्याची बारीक पावडर बनवा. कागदात बांधून त्याच्या छोट्या छोट्या पुड्या बनवा. या पुड्या घरातील पायपुसणी खाली ठेवून द्या.
बाहेरील वापरायच्या चप्पला बूट घरात आणू नका. कारण याच माध्यमातून या शक्ती आपल्या घरात प्रवेश करतात. शिवाय असं केल्यामुळे बाहेरून ज्या नकारात्मक शक्ती येतात त्या तुमच्या सोबत आत येणार नाही कारण तुरटी मध्ये नकारात्मक शक्ती रोखण्याची पॉवर असते. म्हणूनच तुरटीचा उपयोग नजर उतारण्यासाठी देखील केला जातो.
रोज घरात ज्या ठिकाणी साफसफाई होऊ शकत नाही त्या ठिकाणी देखील अशी तुरटी पावडरीची पुडी ठेवावी. यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात असेल तर निकामी होऊन निघून जाईल आणि परत कधीच घरात येणार नाही.
प्रत्येक महिन्यात तुम्हाला जुनी पुडी काढून परत नवीन पुडी ठेवावी लागेल. कारण तुरटीचा प्रभाव एका महिन्या पर्यंतच असतो. जुन्या पुड्या या पाण्यात सोडाव्या किंवा कचऱ्यात टाका, कचऱ्यात पुड्या टाकल्या नंतर हात स्वच्छ धुवा.
खिडकीत देखील तुम्ही अशी पुडी ठेवू शकता ज्यामुळे कोणतीही नकारात्मक ऊर्जा घरात येणार नाही. घरात नकारात्मक ऊर्जाच नसेल तर अशा घरातील वातावरण प्रसन्न राहते. सुख शांती समाधान आपोआपच येते. माता लक्ष्मीला केवळ सुख आणि शांतीचेच वातावरण आवडते.
मग ती अशाच व्यक्तीच्या घरात येईल जिकडे सुख समाधान आहे. अशीच व्यक्ती धनवान बनू शकते. सूर्यास्तावेळी घरात नियमित दिवाबत्ती पूजा केल्याने तुमच्या नशिबात धन येण्याचे सर्व मार्ग खुले होतात आणि स्थायी धन लाभते. अकारण होणारे खर्च देखील थांबतील… शुभम भवतु…
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.