अशा स्त्रीकडे चुकून सुद्धा मदत मागू नका. आयुष्भर पश्चाताप करत बसाल…शुक्रनीती

0
221

नमस्कार मित्रानो

मित्रांनो महान आचार्य शुक्राचार्य यांनी आपल्या नीतीमध्ये अशा स्त्री व पुरुषांविषयी सांगितले आहे की, त्यांच्याकडे मदत मागण्यासाठी तुम्ही कधीही गेले नाही पाहिजे. कारण अशा लोकांकडून मदत घेतल्यानंतर मनुष्य स्वतःहून संकटात सापडतो.

काही परिस्थितीमध्ये तर त्या व्यक्तीच्या प्राणांवर बेतते. आपल्यावर कोणतेही संकट आले असता आपण दुसऱ्याकडे मदत मागायला जातो ही साधारण गोष्ट आहे. स्वतः प्रयत्न करून झाल्यानंतर दुसऱ्यांकडे मदतीच्या अपेक्षेने पाहणे हा मनुष्य स्वभावच आहे.

दुसऱ्यांकडे मदत मागण्या मध्ये काहीही वाईट नाही. परंतु मनुष्याने तोवर मदत मागितली नाही पाहिजे जोवर तो लाचार किंवा अक्षम होत नाही. आचार्य शुक्र देव यांनी मनुष्याला साफ चेतावनी देत सांगितले आहे की, दुसर्‍यांकडून मदत मागण्या आधी हा विचार अवश्य केला पाहिजे की दुसर्‍यांकडून मदत घेतल्या बिगर मनुष्य जीवन जगू शकतो.

परंतु मदत घेतल्यानंतर तो मदतीचे ओझे आपल्या डोक्यावर बाळगतो. ते त्याला आयुष्यभर बाळगावे लागते. म्हणून शक्यतो माणसाला जेवढे होईल तेवढे हा प्रयत्न केला पाहिजे की तो आपल्या जीवनात कधीच कोणाला मदत मागायची वेळ येऊ नये.

स्वतःला एवढे सक्षम बनवले पाहिजे की दुसऱ्याकडे मदतीची भीक मागायला जाऊ लागू नये. कोणाकडे ही मदत मागायला जाताना तुम्हाला शुक्राचार्य यांनी सांगितलेल्या या तीन गोष्टी चे ध्यान अवश्य केले पाहिजे.

मदत कोणाकडून घेतली पाहिजे आणि कोणाकडून नाही हे तपासले पाहिजे. बऱ्याचदा लोक दुसऱ्यांना मदत करून त्यांच्यावर आपला अधिकार गाजवू लागतात.मदत करून जसं त्या व्यक्तीला विकतच घेतले आहे. आपलं गुलाम बनवले आहे. असं वागणूक देतात.

जेव्हा तुम्ही कोणालाही मदत मागायला जाता, तेव्हा त्या व्यक्तीच्या वागणुकीची पारख अवश्य करा. नाहीतर ती मदत तुम्हाला खूप महागात पडेल. अथवा प्राण देऊनच तुम्हाला ती मदत परतफेड करावी लागेल.

मी तुमचं काम करेल

आश्वासन देऊन कोण व्यक्ती जर तुमच्या कामात उशीर करत असेल किंवा जाणून बुजून तुमचे काम टाळत असेल तर अशा व्यक्तीकडे दुसऱ्यांदा मदत मागायला जाणे मूर्खपणा आहे.

कारण अशी व्यक्ती तुम्हाला मदत करण्यास स्वतःच अक्षम असून तुमचा वेळ वाया घालवत असते. अशी व्यक्ती तुमचे काम करण्यास वेळ लावेल किंवा काम करणार हि नाही आणि शेवटी याचा दोष तुमच्यावरच ठेवून अपमान करेल. म्हणून अशा व्यक्तीकडे मदत मागण्यास कधीही जाऊ नका.

वाईट काम करणारा

शुक्राचार्य सांगतात एक बुद्धिमान माणूस कितीही संकटात जरी सापडला तरीही त्याला कधीही वाईट काम करणाऱ्या व्यक्तीकडे मदत मागण्यासाठी गेले नाही पाहिजे. कारण अशा व्यक्ती कडून मदत घेतल्यास त्याची परतफेड म्हणून ती व्यक्ती तुम्हाला कोणतेही वाईट काम करण्यास भाग पाडते. किंवा तुम्हाला कोणत्या मोठ्या संकटात फसवू शकते. अशा व्यक्तीकडून पैशांची मदत तर कधीच घेऊ नये तुमच्या जीवावर बेतू शकते.

दुष्ट स्त्री

शुक्र देवांच्या मते, एका पुरुषाने कधीही एका स्त्री कडून मदत मागता कामा नये. दुष्ट स्त्री निस्वार्थीपणे कधीही कोणाची मदत करू शकत नाही. जर तुम्ही अशा कोणत्या स्त्री कडून मदत घेत असाल तर ती तुमचा सर्वनाश करेल.

त्याची परतफेड म्हणून नंतर कधीही ती तुमच्याकडून अशा मदतीची अपेक्षा करेल की ज्यामुळे तुम्ही मोठ्या संकटात अडकाल. याप्रकारे कैकयीने रामाला वनवासात पाठवण्यासाठी दशरथ यांना विवश केले होते, त्याचप्रकारे दुष्ट स्त्री तुमचे जीवन बरबाद करण्यासाठी एका क्षणाचाही विचार करणार नाही.

चरित्रहीन व्यक्ती

शुक्र देव सांगतात की कोणत्याही ज्ञानी व्यक्तीने धनवान चरित्रहीन माणसाकडे कधीच मदत मागू नये. असा नीच व्यक्ती धनाची परतफेड न केल्यावर तुमच्या घरातील स्त्रियांवर वाईट नजर टाकू शकतो. अशा व्यक्तीच्या सान्निध्यापासून अनेक कोस दूर रहावे. अशा नीच व्यक्तींच्या नीचपणा ची कोणतीही सीमा नसते.

मित्रांनो हे होते ते चार लोक ज्यांच्याकडून तुम्ही कधीही मदत मागू नका. आशा आहे तुम्हाला दिलेली ही माहिती आवडली असेल.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here