नमस्कार मित्रानो
मित्रांनो, असं कोण असेल ज्यांना माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी असं वाटत नसेल. आजवर तुम्ही देखील माता लक्ष्मीची कृपा रहावी यासाठी अनेक उपाय केले असतील.
जेव्हां कोणाच्या घरातील लेकीचे लग्न होते, तेव्हा सगळ्यात जास्त तिच्या विरहाचे दुःख हे तिच्या आई-वडिलांना होतं. मनापासून इच्छा नसताना देखील पोटच्या पोरीची सासरी पाठवणी केली जाते. आई वडिलांचा हाच एक हेतू असतो कि आपली लेक सुखी रहावी तिचा संसार फुलावा.
नुकतच लग्न झालेली मुलगी माहेरी येते, कोणती प्रथा असेल किंवा नसेल, सण असेल किंवा फिरून आल्यावर आपल्या आई-वडिलांना भेटायला ती माहेरी येते. त्यावेळी आई-वडील अगदी मोठ्या मनाने उपहार स्वरूप भेटवस्तू म्हणून स्वखुशीने आपल्या मुलीला काही वस्तू देतात.
परंतु मित्रांनो इथे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, हे जरुरी नाहीये की मनापासून दिलेली प्रत्येक वस्तू तिच्या संसारात फलदायी ठरेल, किंवा तुमच्यासाठीही शुभ असेल जरुरी नाही. कधीकधी अशा काही वस्तू असतात की ज्या घरात बरबादी आणतात.
जगात असे कोणतेच आई-वडील नसतील की ज्यांना स्वतःचे आणि आपल्या लेकी चे घर उध्वस्त व्हावे असे वाटते. त्यासाठी आम्ही तुम्हाला आज एक अशी वस्तू सांगणार आहोत ज्यामुळे तुमचे घर बरबाद होऊ शकते. हे तुम्ही तुमच्या लेकीस देऊ नये.
सनातन धर्मामध्ये, लेकींना माता लक्ष्मीचा दर्जा दिला आहे. असं म्हणतात.. माता लक्ष्मी, माता सरस्वतीच्या रूपामध्ये मुलगी जन्म घेते. मुली आपल्या घरी लाडक्या राजकुमारी असतात. परंतु मुलगी हे परक्याचे धन असतं त्यामुळे एक ना एक दिवस तिची पाठवणी आई-वडील करतातच.
प्रत्येक आई-वडील आपल्या मुलीची आपापल्यापरीने जबाबदारी निभावतात. त्या मुलीचे पालन , पोषण , संगोपन पासून लग्न करेपर्यंत सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडतात. एखाद्या मुलीचे लग्न करणे हे त्या मुलीच्या आईवडिलांसाठी सगळ्यात मोठी जबाबदारी असते.
त्यावेळी तिच्या सोबत तिला काही उपहार भेटवस्तू देत असतात. यामध्ये अनेकदा गणपतीची मूर्ती किंवा फोटो फ्रेम उपहार स्वरूप मुलीला दिली जाते. हिंदू धर्मामध्ये गणपतीला विघ्नहर्ता म्हटले जाते. मनामध्ये या प्रकारची भावना ठेवूनच ही भेटवस्तू मुलीला दिली जाते.
केवळ लग्ना मध्येच नाही तर अन्य कोणत्याही वेळी आपण आपल्या मुलीला अशा प्रकारची भेटवस्तू देऊ इच्छित असाल तर आपला विचार बदला. याचं कारण मुलीला आपण लक्ष्मी म्हणतो, आणि तिच्या सोबत गणपतीही देतो.
अशावेळी तुमच्या घरातून लक्ष्मी आणि गणपती सोबत जाऊन तुमच्या घरातील सौभाग्य, धनसंपत्तीचा ऱ्हास होतो. त्यामुळे मुलीच्या माहेरकडील लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अनेक लोकांनी आधीच गणपतीचे मूर्ती किंवा फोटो फ्रेम उपहार स्वरूपात दिली असेल ते आत्ता गरिबीचा सामना करत असतील.
अशात त्यांनी काय करावे? यासाठी तुम्ही तुमच्या मुलीकडून दुसरी गणपतीची मूर्ती किंवा फोटो घ्या. तुम्ही दिलेलाच फोटो किंवा मूर्ती परत घेऊ नये. त्या बदल्यात मुलीला काही दान दक्षिणा द्या…
असं करणं अत्यंत शुभ आणि फलदायी असत. कारण माता लक्ष्मी स्वतःहून तुम्हाला उपहार स्वरूप विघ्नहर्ता गणेश जी देत असेल त्यापेक्षा अत्यंत शुभ काहीच असू शकत नाही. शुभं भवतु!!
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.