नमस्कार मित्रांनो,
आपल्या हिंदू धर्म शास्त्रात वारकरी संप्रदायाचे अनन्यसाधारण महत्व आहे. यामध्ये अनेक माळकरी, विठ्ठलभक्त एकादशीचे व्रत करतात.
पांडुरंग हे भगवान विष्णूंचाच अवतार होते त्यामुळे यादिवशी पांडुरंग तथा भगवान विष्णू व माता लक्ष्मीची पूजा करण्याची मान्यता आहे.
एकादशी हा हिंदु पंचांगाप्रमाणे प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या पक्षातला अकरावा दिवस आहे. हिंदू पंचांगाप्रमाणे महिन्यातील दोन पंधरवड्यांत प्रत्येकी एक अशा किमान दोन एकादश्या येतात. या एकादशीला उप वास करण्याची प्रथा आहे.
मित्रांनो असा उपा स करणाऱ्यांमध्ये दोन भेद आहेत. स्मार्त आणि भागवत. त्यासाठी दोन प्रकारच्या एकादश्या मानल्या जातात. भागवत धर्म पाळणारे, वारकरी इत्यादी लोक भागवत एकादशी, तर स्मृतींना मानणारे स्मार्त एकादशी पाळतात.
एखाद्या महिन्यात दशमीचा, एकादशीचा वा द्वादशीचा क्षय असेल किंवा द्वादशीची वृद्धी असेल तर त्या महिन्यात बहुधा, स्मार्त आणि भागवत अश्या दोन एकादश्या दोन स्वतंत्र दिवशी येतात.
अशा संपुर्ण वर्षात 24 एकादशी असतात आणि प्रत्येक एकादशीला वेगळे नाव आणि वेगळे महत्व आहे. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला मोहिनी एकादशी म्हणतात.
या एकादशीला पौराणिक महत्व प्राप्त आहे. एकादशी केल्याने सह स्त्र गो दान तसेच अश्र्वमेध यज्ञ केल्यावर जितकं पुण्य लाभतं त्याच्या अधिक पुण्य एकादशीचा उप वास केल्याने लाभतं.
मे महिन्यातील एकादशी रविवार 23 मे रोजी आहे. ही एकादशी केल्याने सर्व पापमुक्त होतात, तसेच दुखाचा विना श होतो. मोह, माया यातून मुक्ती मिळते. जर का मुक भावना, मोह माया, यांपासून दूर रहायचं असेल तर मोहिनी एकादशी व्र त अतीउत्तम आहे.
या एकादशीला उप वास केल्यास सर्वतोपरी लाभ आपल्या जीवनात होतो. त्यामुळे सर्वांनी हा उपाय करावा. तसे जमलेच नाही तर या दिवशी ठराविक पदार्थांचे सेवन करू नये.
या दिवशी आपल्या धर्म शास्त्रा नुसार काही वस्तू, पदार्थांचे सेवन अजिबात करू नये. तांदूळ, भात किंवा तांदळाचे कोणतेही पदार्थ या दिवशी चुकूनही खाऊ नका, खिचडी, भात, तांदळाची खीर, तांदळाचे पापड असे कोणतेही पदार्थ या दिवशी खाणे व र्ज्य मानले आहे त्यामुळे तुम्ही पापाचे भागीदार बनू शकता.
इतकेच नव्हे तर तुम्ही या दिवशी मां साहार देखील करू नका. उलट या दिवशी दिवसभर उप वास करा व श्री विष्णूंचे पूजन, जप करा. खूप मोठ्या पापातून तुमची मुक्ती होते.
अशाच मनोरंजक आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.
मराठी धिंगाणा पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.