नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो आज आम्ही तुम्हाला डायबेटिज असलेल्या लोकांनी कोणत्या ५ वस्तूंचे सेवन करू नये हे सांगणार आहोत. मित्रानो बहुतेक लोक मधुमेहाचे शिकार झालेले आहेत. आजकाल डायबेटिज हा सामान्य आजार झालेला आहे.
मित्रांनो तुम्ही जर बारीक पाहिले तर प्रत्येक घरात एक तरी व्यक्ती असा असतो कि जो मधुमेहाशी लढा देत असतो. व्यक्तीच्या जीवनशैली मुळे डायबेटिजची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. हा आजार ऐकण्यास साधारण वाटत असला तरी अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे.
डायबेटिजने पीडित व्यक्तींच्या ब्लड शुगरच्या स्तराच्या आधारावर या आजाराचा अनुमान लावला जाऊ शकतो. आयुर्वेदात असे काही उपाय आहेत ज्यामुळे मधुमेह नियंत्रणात आणायला मदत होते.
मित्रांनो आपण जर आहारामध्ये परिवर्तन केले तर बऱ्याच प्रमाणात मधुमेह नियंत्रणात येतो. जर व्यक्तीच्या ब्लड शुगरचा स्तर वाढला आहे तर ज्या वास्तूमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते त्या वस्तूंचे सेवन करणे फायदेशीर ठरते.
असे अनेक संतुलित आहार आहेत ज्यामुळे डायबेटिजने पीडित व्यक्तीला नुकसान पोहचू शकते. अशा आहारामुळे ब्लड शुगर लेव्हल वर वाईट प्रभाव पडत असतो. काही आहार सामान्य व्यक्तींसाठी फायदेशीर असतात परंतु डायबेटिज असलेल्या रुग्णांनी या पदार्थांपासून दूरच राहिलेले बरे असते.
जे व्यक्ती मधुमेहाने पीडित आहेत त्यांनी ड्रायफ्रूट्स पासून दूर राहिले पाहिजे. कारण हे ताज्या फळांपासून बनवलेले असतात. यांत फ्रुट्सचे प्रमाणात भरपूर असते. एक कप द्राक्षामध्ये 27 ग्रॅम कार्बोहायड्रेड असतात. तर एक कप मनुके ज्याला आपण किसमिस म्हणतो त्यात कार्बोहायड्रेडचे प्रमाण 115 ग्रॅम असते.
आणि म्हणून डायबेटिज रुग्णांनी ड्रायफ्रूट्सचे सेवन अजिबात करू नये. डायबेटिज रुग्णांनी टरबूजचे सेवन करणे टाळले पाहिजे. त्यांच्या आरोगासाठी टरबूज हे धोकादायक ठरू शकते.रक्तामध्ये शुगरचे प्रमाण वाढण्याची दाट शक्यता असते.
शुगर वाढून हाय ब्लड प्रेशरचा त्रास उदभवू शकतो. आणि म्हणून डायबेटिज रुग्णांनी टरबूजचे सेवन करणे कटाक्षाने टाळावे. मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल बटाटा हा कोणत्याही भाजी मध्ये मिक्स करून त्याची भाजी बनवली जाते.
बटाट्यामध्ये व्हिटॅमिन सी, बी, कॉपर आणि मॅगनीज अधीक प्रमाणात असते. बटाट्यामध्ये एवढे गुणधर्म असून सुद्धा डायबेटिज रुग्णांसाठी बटाटा हानिकारक आहे. यामुळे जेवढे शक्य असेल तेवढे बटाट्याचे सेवन करणे टाळावे.
डायबेटिज रुग्णांनी चिक्कूचे सेवन करणे टाळले पाहिजे. कारण चिक्के हे अत्यंत गोड चवीचे फळ आहे. आणि म्हणून शुगर असलेल्या रुग्णांनी चिक्कूचे सेवन करू नये. सामान्य लोकांसाठी नेहमी दूध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.
दुधामध्ये भरपूर पोषक तत्वे असतात जे आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात. दुधात कॅल्शियम अधिक प्रमाणात असते त्यामुळे आपल्या हाडांसाठी दूध चांगले असते.
मित्रांनो डायबेटिज रुग्णांनी हाय फॅट मिल्क सेवन करणे टाळले पाहिजे. ज्या दुधामध्ये लो फॅट असेल तेच दूध आपण वापरले पाहिजे. तर अशा प्रकारे दूध सेवन करणे सुद्धा डायबेटिज रुग्णांनी टाळावे.
तर मित्रांनो या आहेत त्या 5 वस्तू ज्या डायबेटिज रुग्णांनी चुकून सुद्धा सेवन करू नये. याचे सेवन न केल्याने तुमची जी डायबेटिजची समस्या आहे ती सुद्धा कमी होऊ शकते.
मित्रानो माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज मराठी धिंगाणा लाइक करा.
सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.