नमस्कार मित्रानो
मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीला अस वाटत असतं की त्याचे आयुष्य हे अनेक आनंददायी गोष्टींनी भरलेले असावे. परंतु, व्यक्तीला जीवनात जेव्हा कष्ट करावे लागतात किंवा कोणतेही दुःख त्या व्यक्तीच्या समोर उभे राहते, त्यावेळी त्या व्यक्तीचे मन हे विचलित होते आणि ती व्यक्ती विचारात अडकते की हे सगळं अस का होत आहे?
आपल्या हिंदू धर्म शास्त्रात, मनुष्याच्या कल्याणासाठी काही नियम सांगितले आहेत. ज्यांच पालन केल्याने आपल्या आयुष्यात सुख , समृद्धी आणि शांती टिकून राहते. आणि त्या नियमांच्या अंतर्गत, व्यक्तीच्या खाण्या- पिण्यापासून ते त्याच्या कपडे परिधान करण्यापर्यंत, अनेक नियमांचा उल्लेख केलेला आहे.
त्याचबरोबर, अशीही एक गोष्ट सांगितली आहे, ती म्हणजे काही कामं आपल्याला नग्न अवस्थेत अजिबात केले नाही पाहिजे. कारण त्या गोष्टीचा आपल्या आयुष्यावर विपरीत परिणाम दिसून येतो. चला तर मग, जाणून घेऊया ती कोणती कामे आहेत जे आपल्याला नग्न अवस्थेत नाही केले पाहिजे.
निर्वस्त्र होऊन स्नान करणे
विष्णू पुराणानुसार, कोणत्याही व्यक्तीने कधीही संपूर्ण निर्वस्त्र होऊन स्नान नाही केले पाहिजे. मित्रांनो, हिंदू मान्यतेनुसार पाण्याला देवाची उपमा दिली गेली आहे, आणि त्यामुळे पूर्णतः निर्वस्त्र होऊन स्नान करणे, ह्या गोष्टीला देवाचा अपमान करण्यासारखे मानण्यात आले आहे.
निर्वस्त्र होऊन झोपणे
मित्रांनो, बरीच माणसं निर्वस्त्र होऊन झोपणे पसंद करत असतात. परंतु विष्णू पुराणानुसार, मनुष्याने कधीही निर्वस्त्र होऊन झोपले नाही पाहिजे, कारण असे करणे हे चंद्र देवाला क्रोधित करण्याचे कारण बनते.
एवढच नाही, तर रात्री पूर्णतः निर्वस्त्र होऊन झोपलयाने आपल्यावर नकारात्मक शक्तींचा देखील प्रभाव पडण्याची शक्यता असते.
निर्वस्त्र होऊन पूजा-पाठ करणे
मित्रांनो, काही व्यक्ती अशा असतात, ज्यांना निर्वस्त्र होऊन पूजा करण्याची सवय असते. कारण त्यांना अस वाटत असतं की, त्यांनी परिधान केलेले कपडे हे त्यांना अशुभ किंवा अपवित्र करतात.
परंतु, त्यांना हे माहीत नसत की, अस करण्याने त्यांना पूजा करण्याचे सफल फळ मिळत नाही, त्याऐवजी अस करण्याने ते पापाचे भागीदार होतात. हे खरं आहे की, पूजा करताना न शिवलेले कपडे परिधान करण्याची प्रथा आहे, कारण शिवलेले कपडे हे संसारिक मोहाचे प्रतीक आहे.
मित्रांनो, जर तुम्ही देखील वरील गोष्टींचे आचरण करत असाल, तर त्या गोष्टी करणं तुम्ही थांबवलं पाहिजे. आणि तुम्हाला जर वरील माहिती आवडली असेल, तर ही माहिती तुमच्या मित्र-परिवारासोबत शेअर करायला विसरू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.