नमस्कार मित्रांनो,
आठवड्यातील ज्या त्या वारांचे जसे तसे महत्व असते, ते त्यानुसार शुभ, अशुभ फळ देतात. जर त्या त्या दिवशी ज्या गोष्टी करायला हव्यात त्या गोष्टी केल्यास लाभ होतो याउलट जर त्या गोष्टी करण्याऐवजी इतर गोष्टी कराल तर त्याचे वाईट, गंभीर परिणाम आपल्या आयुष्यावरती होतात.
गुरु ग्रहाचा प्रभाव हा गुरुवारी जास्त असतो त्यामुळे गुरुची उपास ना ही गुरुवारी केल्याने आपल्याला लवकर लाभ मिळतो. जेव्हा गुरू हा अशुभ स्थानी असतो तेव्हा त्या व्यक्तीचं मन हे देव धर्मातून बाजूला होते, त्याला देवध्यान आवडेनासे होते.
काही गोष्टी ज्या चुकूनही गुरुवारी बाहेर काढू नका किंवा काही कामे करू नका जेणेकरून तुमच्या घरात वाद होतील, धन संपेल, काही विपरीत घडेल.
याचे कारण म्हणजे गुरू ग्रह ईशान्य दिशेचा स्वामी आहे आणि या दिशेचा थेट संबंध लहान मुलांशी येतो, त्यामुळे गुरुवारी घरातील भं गार गोष्टी बाहेर काढू नका त्याचा परिणाम मुलांच्या अभ्यासावर, आरो ग्यावर होतो व घरातील स्त्रिया देवध्यान करण्यास तयार होत नाही.
महिलांनी गुरुवारी केस धुवू नयेत, कोणतेही जड कपडे धुवू नयेत, तसेच नखे कापणे, फेसि एल करणे यांसारख्या गोष्टी टाळाव्यात. महिलांनी केस कापल्याने त्याचा थेट परिणाम त्यांच्या पतीवर व मुलांवर होतो.
सफाई जी कधीतरी करतो ती गुरुवारी करणे टाळावे. या दिवशी घरातील फरशी पुसून काढणे टाळावे, तसेच घरातील मोठे अंथरूण यादिवशी चुकूनही स्वच्छ करू नका, धुवायला घेऊ नका त्याचा परिणाम मुलांच्या अभ्यासावर, आरो ग्यावर होतो.
गुरू ग्रहाचा प्रभाव या साऱ्या गोष्टी केल्याने कमी होतो. घरात जर लक्ष्मी टिकत नसेल तर प्रत्येक गुरुवारी हा उपाय नक्की करा.
गुरू जेव्हा कमजोर असतो तेव्हा नोकरी व्यवसायात अडचणी येतात, येणारे पैसे विनाकारण विलंब करतात तसेच पती पत्नीचे भेद होतात.
लक्ष्मी नारायणाची एकत्र असणारी मूर्ती किंवा प्रतिमा तुम्ही गुरुवारी पूजा करा, सर्व गोष्टी पूर्ववत होऊन घरी आनंद येतो.
गुरुग्रह, गुरुदत्त यांची कृपा व्हावी यासाठी गुरुवारचा उपवा स करावा, गुरू दत्ताचे नामस्म रण करावे. व्रत करत असताना मिठाचे सेवन करू नका.
अगदी सोपा उपाय म्हणजे पिवळ्या रंगाचे कपडे तुम्ही या दिवशी परिधान करा. पिवळे पदार्थ जसे की बेसनाचे लाडू, आंबे यासारखे पदार्थ खाऊ शकता. तसेच एका महामंत्राचा जप तुम्ही गुरुवारी केल्याने अधिक प्रभाव जाणवेल, कारण गुरुवारी गुरू ग्रहाचा प्रभाव जास्त असतो.
ओम बृम बृहस्पतये नमः
या मंत्राचा जास्तीत जास्त जप करा तुम्हाला प्रभाव नक्की जाणवेल. तसेच
ओम नमो भगवते वासुदेवाय
असा मंत्र जप सुद्धा फळ देतो. यादिवशी भगवान शंकराची सुद्धा पूजा केली जाते व पिवळ्या रंगाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो.
जर तुमच्या घरी बृहस्पती म्हणजेच गुरू ग्रहाची प्रतिमा असेल तर हळदीचे अक्षता व केसरी चंदन तसेच स्वतः पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करून पूजा केल्याने त्याचा प्रभाव अधिक होतो व घरात ऐश्वर्य वाढते.
केळीच्या झाडाखाली गुरुवारी सायंकाळी दिवा लावा तसेच आई वडिलांचे आशीर्वाद घ्या त्यामुळे गुरू मजबूत होतो.
आपला गुरू कमजोर आहे हे कसे समजेल? पोटदुखी असेल सततची, अपचनाचा त्रास होत असेल, सारखा आळस, स्ना यू सारखे दुखत असतील, कमरे खालचा भाग, पाय सतत वेदनांनी भरलेले असतील, अपत्य प्राप्तीसाठी काही अडचणी येत असतील, काही गोष्टी विनाकारण उशिरा घडत असतील तर समजून जा की तुमच्या कुंडलीत गुरू ग्रह कमजोर आहे त्यासाठी वरील छोटे उपाय नक्की करू शकता.
अशाच मनोरंजक आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.
मराठी धिंगाणा पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.