नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो आषाढी एकादशी हिंदू धर्मशास्त्रातील सर्वात मोठी एकादशी. या एकादशीस देवशयनी एकादशी असेही म्हटले जाते. कारण या एकादशीस भगवान श्रीहरी श्री विष्णू की जय जगाचे पार्लर हार आहेत पालन कर्ता आहेत ते क्षीरसागरात शेषनागाच्या वर योगनिद्रिस्त होतात म्हणजेच योग निद्रेत जातात.
मित्रांनो तब्बल चार महिने म्हणजेच कार्तिकी एकादशी पर्यंत भगवान श्रीहरी श्रीविष्णु योगनिद्रेत असतात. म्हणूनच या चार महिन्यांच्या काळास चातुर्मास असे म्हणतात. चार महिन्यानंतर कार्तिकी एकादशीस भगवान श्रीहरी श्रीविष्णु योगनिद्रेतुन बाहेर येतात. या 4 महिन्यात संपूर्ण संसाराचा सारा भार हा भोलेनाथ यांवर असतो.
मित्रांनो म्हणूनच या एकादशीच खूप मोठ महत्त्व आहे आणि महाराष्ट्रातील घराघरातील प्रत्येक व्यक्ती अगदी लहान मुलांपासून थोरांपर्यंत प्रत्येक जण या आषाढी एकादशीचा उपवास आणि व्रत करताना दिसतात.
या दिवशी मनोभावे श्रीहरी विष्णुच्या कोणत्याही रुपाची मग त्यामध्ये विठ्ठल माऊली, भगवान श्रीकृष्ण, बालाजी, बाळकृष्ण अशा भगवान श्री हरी श्री विष्णूंच्या रूपांची मनोभावे पूजा केली जाते. मित्रानो आपण व्रत उपवास करत आहात तर या दिवशी काही गोष्टींचं पालन आवश्य करा.
काही गोष्टी अशा असतात ज्या एकादशी तिथीस, आषाढी एकादशीस, देवशयनी एकादशीस आपण चुकूनही करू नयेत. या गोष्टी केल्याने त्या व्रताचं फळ आपल्याला प्राप्त होत नाही. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या गोष्टी ज्याचे कटाक्षाने पालन करणे गरजेचे आहे.
हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढी एकादशीस देवपूजा करताना किंवा विठ्ठल माऊलीची पूजा करताना निळ्या किंवा काळ्या वस्त्रांचा वापर करू नये. म्हणेजच निळे किंवा काळ्या रंगाचे कपडे परिधान करून आपण देवपूजा करू नका. सोबतच घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने तामसिक पदार्थांपासून दूर रहावं.
तामसिक पदार्थ म्हणेज कांदा, लसूण, मसालेदार पदार्थ, मांस, म दिरा किंवा कोणत्याही प्रकारची व्य सन या पदार्थांचं सेवन आपण चुकूनही करू नका. मित्रानो आषाढी एकादशीचा दिवस हा भगवंताच्या चरणी लिन होण्याचा दिवस असतो. काही मंत्रांचा जप देखील आपण या दिवशी करू शकता.
मंत्र जप करण्यासाठी किंवा भगवंताच्या चरणी तल्लीन होण्यासाठी जी एकाग्रता लागते जे पूर्ण ध्यान आवश्यक असत हि एकाग्रता अशा तामसिक पदार्थांचं सेवन केल्याने साध्य होत नाही. आणि आपण भगवंतांशी एकरूप होऊ शकत नाही. म्हणूनच अशा पदार्थांच्या सेवनापासून आपण शक्य तितके लांब राहणे फायदेशीर ठरेल.
मित्रानो प्रत्येक मनुष्यात देव वसलेला आहे. आणि म्हणूनच या देवशयनी तिथीस आपण कोणत्याही व्यक्तीचा अपमान करू नका. आपल्या तोंडून अपशब्द निघणार नाही, आपल्याकडून कोणाचे मन दुखावनार नाही याची काळजी घ्या. जेव्हा जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीचा अशा विशिष्ट तिथीस अपमान करतो आपल्याला त्या व्रताचं पूर्ण फळ प्राप्त होत नाही.
मित्रानो देवशयनी एकादशीच व्रत किंवा उपवास ज्या ज्या लोकांनी ठेवला आहे त्यांनी शांत आणि संयमी राहणे गरजेचे असते. कोणावरही क्रोध करू नये. कारण क्रोध केल्याने, राग राग केल्याने भगवान श्री हरी श्री विष्णूंची पूजा हि अपूर्ण राहते असं म्हटलं जात. त्या पूजेचं पूर्ण फळ आपल्याला मिळत नाही.
मित्रानो देवशयनी एकादशीस आपण कॉ ट किंवा गादीवर शक्यतो झोपू नका. जमिनीवर चटई किंवा चादर टाकून त्यावर झोपावं. फक्त शयनीय नाही तर कोणत्याही एकादशीस तांदळाचे सेवन करू नये. या दिवशी भात वर्ज मानला जातो.
या दिवशी तुळशीच्या पानांचे अनेक तोडगे सांगितले जातात. मात्र मित्रानो एकादशी तिथीस चुकूनही तुळशी मातेची पाने तोडू नका. या दिवशी पाने तोडल्याने खूप मोठ मोठे भोग आपल्याला भोगावे लागू शकतात. जर आपल्याला तुळशीच्या पानांचा वापर करायचा असेल तर आधल्या दिवशी ती तोडून घेऊ शकता.
आषाढी एकादशीस आपल्या तोंडून खोटं बोललं जाणार नाही याची काळजी घ्या. कोणासोबत सुद्धा खोटे बोलू नका, खोटे वर्तन करू नका त्यामुळे सुद्धा व्रताचं फळ आपल्याला पूर्ण रूपाने प्राप्त होणार नाही. हिंदू धर्म शास्त्र असेही मानते कि या दिवशी कोणत्याही झाडाच्या फांद्या आपण तोडू नयेत.
आपण जर काही विशिष्ट प्रयोग करणार असाल किंवा देवाला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करणार असाल तर हा नियम त्या ठिकाणी वर्ज आहे. मात्र विनाकारण झाडांच्या फांद्या तोंडन या गोष्टींपासून लांब राहावं. एकादशीच्या आधल्या दिवसापासून ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी ब्रम्हचर्याचं पालन करा.
तर मित्रानो आषाढी एकादशीस या काही गोष्टींपासून आपण दूर राहिलो आणि भगवंतांची मनोभावे सेवा केली, पूजा अर्चा केली तर भगवंतांची अपार कृपा आपल्यावरती नक्कीच बरसेल यात जराही शंका नाही. जय हरी विठ्ठल.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत नक्की शेयर करा. अशाच माहितीपूर्ण लेखांसाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.