नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो हिंदू धर्म शास्त्र आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवतं, जीवन जगताना येणाऱ्या अडचणी कशा सर करायच्या हे शास्त्र सांगत. ईश्वरी संकेत, भक्ती खूपच महत्वाचं काम आपल्या जीवनात करत असतात.
हिंदू धर्म शास्त्रानुसार दिवसाचे 24 तास, त्यातले दिवस, रात्र, मध्यान्ही असे कालखंड व त्यामध्ये सुद्धा काही दैवी व काही अशुभ ऊर्जेचे वर्गीकरण केले आहे. मित्रांनो सकाळच्या वेळी कोणती कामे करावीत व सायंकाळी कोणती कामे करावी व कोणती कामे केल्यास त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात याचंही स्पष्टीकरण सांगितले आहे.
प्रत्येक हिंदू धर्मियांच्या घरी अंगणात तुळस असतेच, देवपूजा, तुलसी पूजन हे सकाळी केलं जातं व सायंकाळी देवघरात, तुळशीत दिवा लावला जातो व प्रार्थना केली जाते. अशा प्रकारे तुम्ही रोज सायंकाळी हे काम केलं तर माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते, कारण सायंकाळी माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करत असते व तिच्या भक्तांना आशीर्वाद देते.
धर्मशास्त्र असे मानते की शास्त्रानुसार तुळशीला विनाकारण स्पर्श करू नये, शास्त्र पध्दतीने कोणता उपाय, पूजा विधीसाठी जर तुळशीची पाने लागणार असतील तरच ती तोडावीत व तुळशीला स्पर्श करावा अन्यथा करू नये, माता तुळशी अप्रसन्न होते.
तसेच जर तुम्ही विनाकारण तुळशीची पाने तोडत असाल, मंजुळा तोडत असाल तर माता तुमच्या वरती रुष्ट होते. यामुळे तुमचं भाग्य दुर्भाग्य बनते. आपल्या कामात अडथळे येतात व माता लक्ष्मीचा तो अपमान समजला जातो.
मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे सायंकाळी दिवे लागणीच्या वेळी जेव्हा सूर्यास्त होत असतो. देवी माता लक्ष्मी सर्वांच्या घरी प्रवेश करत असते यावेळी काही आळशी महिला घरी झाडू मारतात. यावेळी स्वच्छता केल्यास लक्ष्मी ऐवजी अलक्ष्मी घरात वास करते. त्यासाठी लवकर झाडू मारावा.
अलक्ष्मी म्हणजे अमंगल, अरिष्ट, दुःख, दारिद्र्य, गरिबी घरी येते, झाडू ला प्रत्यक्ष माता लक्ष्मीचे रूप मानले जाते त्यामुळे हा तिचा अवमान समजला जातो म्हणून सायंकाळी झाडू मारण्याचे काम चुकूनही करू नये. यामुळे माता लक्ष्मी रुष्ट होते.
तिसरी महत्वाची गोष्ट, काही कारणाने आपण घरातील व्यक्तींशी वाद घालतो, भांडण, आक्रोश करतो, तर काही घरांमध्ये स्त्रीयांचा वारंवार अपमान होतो, स्त्रियांना तुच्छतेने वागवले जाते, स्त्री ही घरची लक्ष्मी असते, घराचं सौख्य असते, जर तुम्ही स्त्रियांना हीन वागणूक दिली तर माता लक्ष्मी अप्रसन्न होते व घरातून निघून जाते.
लक्ष्मी निघूज जाते त्यामुळे अलक्ष्मी घरात येते, घरातील स्त्री असमाधानी, चिंतीत, अस्वस्थ राहते, परिणामी घरातील सुख नष्ट होते, त्यामुळे स्त्रियांना त्यांचा आदर सन्मान देणे आवश्यक आहे. ज्यामुळे घरात शांतता राहील, समृद्धी येईल व घरी सुख येईल. त्यामुळे या 3 गोष्टी चुकूनही करू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.