आज सोमवारी चुकून सुद्धा करू नका या चूका… महादेव कधीच माफ करणार नाहीत…

0
472

नमस्कार मित्रांनो,

देवांचे देव महादेव हे खूप भोळे आहेत हे सर्वांनाच माहिती आहे आणि त्यांची मनापासून भक्ती जर कोणी केली तर त्यांना महादेव भेदभाव न करता आशीर्वाद देतात.

पण मित्रांनो महादेवाच्या वारी म्हणजे सोमवारी काही कामे केली तर आपल्याला महादेवाच्या क्रोधाचा सामना करावा लागतो.

सोमवारी महादेवाची पूजा, आराधना केली तर महादेव प्रसन्न होतात. ते जितक्या लवकर प्रसन्न होतात तेवढेच लवकर क्रोधीत होतात. म्हणून सोमवारी पुजा करताना ही कामे करू नका. नाहीतर तुम्हाला शिवाच्या क्रोधाचा सामना करावा लागतो.

सोमवारी काळे वस्त्र परिधान करून महादेव मंदिरात जाऊ नये कारण हा रंग शिवाला आवडत नाही. म्हणून पांढरे , आकाशी हिरवे , नारंगी हे कपडे घालून जावे.

काही व्यक्तींचा आहार मां साहारी असल्यास त्यांनी सोमवारी मां साहार करून महादेव मंदिरात जाऊ नये. कारण महादेवाला जनावर खुप प्रिय आहेत.

तसेच सोमवारी किंवा इतरवेळी  तुमच्या कडुन कधी स्त्रीचा अपमान झाला तर  महादेवाच्या क्रोधाचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो.

मित्रांनो भांडणे प्रत्येकाच्या घरात होत असतात,  तुम्ही सोमवारी महादेवाची पुजा करताना घरात शांती ठेवावी. ज्या घरात भांडण तंटा असेल त्या घरी महादेव वास करत नाहीत.

मित्रांनो त्यांना जनावरे खूप प्रिय आहेत त्यामुळे महादेवाच्या पुजेत नंदिला पण पुजावे. सोमवारी सर्प दिसल्यास त्याला मारू नये. सज्जन व्यक्ती, साधु-संत यांचा कधीच अपमान करु नये.

सोमवारी घरी आलेला अतिथी किंवा भिकारी यांना कधीही उपाशी परत पाठवू नये. महादेवांना पांढरा रंग खुप आवडतो त्यामुळे त्यांना पांढरी फुले वाहिली जातात पण केतकीची फुले पांढरी असूनही कधी वाहू नयेत.

शंखाचा वापर पुजेत करू नये कारण महादेवांनी शंकेश्वर नावाच्या राक्षसाचा नाश केला होता. पण तुम्ही त्याचा वापर शंखनाद करण्यासाठी करू शकता.

महादेवांना तुटलेले तांदुळ अर्पण करू नये आणि हळद, कुंकू या स्त्री संबंधित वस्तू कधी वाहू नये. महादेवांना नारळ, वाळलेली फुले कधी अर्पण करू नयेत.

शिवलिंगावरती तुळस वाहू नका किंवा पूजेचे पाणी तुळशीत टाकु नये. प्रत्येक सोमवारी महादेव मंदिरात तुपाचा दिवा लावावा.

मित्रांनो जर मंदिरात जाणे शक्य नसेल तर आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात हा दिवा लावावा. अशा प्रकारे महादेवाची पूजा करावी.

अशाच मनोरंजक आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.

मराठी धिंगाणा पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here