नमस्कार मित्रानो
आचार्य चाणक्यांची धोरणे आणि विचार तुम्हाला थोडे कठोर वाटतील, पण ही कठोरताच यशस्वी जीवनाचे सत्य आहे. धावपळीच्या जीवनात आपण या विचारांकडे दुर्लक्ष करू शकतो, परंतु हीच कठोरता आपल्याला जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत मदत करते. आचार्य चाणक्यानी अशाच काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
आचार्य चाणक्य म्हणतात की खोट्या व्यक्तीला कधीही आपला मित्र बनवू नका. जी व्यक्ती खोटे बोलते, ती व्यक्ती आपला दृष्टिकोन सिद्ध करण्यासाठी काहीही करू शकते . खोटे बोलणारा व्यक्ती जगात कोणाशी जोडलेला नसतो तो फक्त जोडलेला आहे असे समाजाजला दाखवत असतो.
आचार्य चाणक्यांच्या मते मैत्री करताना विचारपूर्वक विचार करावा. खरा मित्र तोच असतो जो नेहमी तुम्हाला सत्य सांगतो. सत्य त्याच्या विरोधात असो किंवा तुमच्या अपेक्षांच्या विरोधात असो. कारण सत्य ही अशी गोष्ट आहे ज्यावर नाते दीर्घकाळ टिकते. त्याला कोणत्याही पुराव्याची गरज नसते.
कित्येकदा असे घडते की माणूस मैत्रीमध्ये खोटे बोलतो. हे खोटे त्याच्या नजरेत खरे असू शकते पण हे आवश्यक नाही की समोरच्या व्यक्तीलाही हे समजेल. जेव्हा नात्यामध्ये खोटेपणा येतो तेव्हा ते नाते कोणतेही असो तुटायला वेळ लागत नाही.
मित्रानो खोटे बोलणाऱ्या व्यक्तीचा पाया नेहमीच कच्चा असतो. असे नटे कोणत्याही वाऱ्याच्या झोतासह कोसळू शकते. म्हणूनच व्यक्तीने खोटेपणा अजिबात करू नये, मग ते मैत्रीमध्ये असो किंवा कोणत्याही नात्यात असो.
असत्य तुम्हाला क्षणभर आनंद देऊ शकते, पण सत्यासमोर उभे राहणे कठीण आहे. म्हणूनच आचार्य चाणक्य यांनी म्हटले आहे की, खोट्या व्यक्तीला कधीही आपला मित्र बनवू नका.
खोटे बोलणारी व्यक्ती आपला दृष्टिकोन सिद्ध करण्यासाठी काहीही करू शकते. खोटे बोलणारा कधीही जगात कोणाशीही गुंतलेला नसतो आणि कधीच नसेल.
मित्रानो माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहितीपूर्ण पोस्ट रोज वाचण्यासाठी खाली दिलेले फेसबुक लाईक बटन वर क्लिक करायला विसरू नका.