नमस्कार मित्रानो,
मित्रानो मर ण हे आयुष्यातील अंतिम सत्य आहे. ते कोणाला टाळता आले नाहीये. जिथे ज न्म आहे तिथे मृ त्यू हा ठरलेलाच आहे आणि मृ त्यू आहे म्हणजे पुन्हा ज न्म आहे. असे हे ज न्म मरणाचे चक्र अविरत चालू असते.
मनुष्याला त्याच्या कर्मानुसार पुढील ज न्म कशाचा मिळेल हे ठरते. आज आपण हीच माहिती जाणून घेणार आहोत कि कोणते कर्म केल्याने मनुष्याला कुत्र्याचा ज न्म प्राप्त होतो ते.
एकदा प्रभू श्री राम आपल्या दरबारात बसलेले होते. तेवढ्यात एक कुत्रा त्यांच्या दारावर येऊन रडू लागला. श्री रामांनी दूताला पाठवून त्या कुत्र्याला हाकलून लावले. दुसऱ्या दिवशी कुत्रा पुन्हा दारात येऊ रडू लागला. पुन्हा श्री रामांनी दूताला पाठवून त्या कुत्र्याला हाकलून लावले. मित्रानो असे सलग 3 दिवस घडले. आता मात्र प्रभू श्री रामांनी त्या कुत्र्याला बोलवून आणायला सांगितले.
दूत कुत्र्याकडे गेला व कुत्र्याला म्हणाला तुला प्रभूंनी आत बोलावले आहे. त्यावर कुत्रा बोलला कि माझा जन्म नि च्च यो नीत झाला आहे. मी मंदिर, यज्ञ, होम हवनाची जागा, तुळशीची बाग, सभा, मठ, राजभवन, गोशाळा, पवित्र तीर्थस्थान, स्वयंपाक घर, स्री स्थान, रति स्थान तसेच स्ना नसंध्या करण्याच्या ठिकाणी मी जाऊ शकत नाही. म्हणून तुम्ही जाऊन भगवंतांना सांगा कि तुम्ही स्वतः येऊन मला भेटावे.
मी माझे गाऱ्हाणे त्यांच्या समोरच मांडू इच्छितो. दूतांनी सुद्धा बाहेर दरवाजाजवळ जे घडले ते श्री रामांपुढे मांडले. दूतांचे बोलणे ऐकून भगवंत स्वतः कुत्र्याजवळ आले व त्याला का रडतोस म्हणून विचारले? कुत्रा बोलला कि मी काहीच केले नाही तरी त्या संन्याशाने मला दगड फेकून मारला परिणामी माझा पाय मोडला. हे प्रभू राम आता तुम्हीच न्याय करा असे बोलून कुत्रा न्याय मागू लागला.
पुढे भगवंतांनी त्या संन्यासी व्यक्तीला बोलवून घेतले व कुत्र्याला दगड मारण्याचे कारण विचारले. संन्यासी उत्तरला कि मी माझी भिक्षा मागून परतत होतो. दुपारची वेळ होती मला भूक सुद्धा खूप लागली होती. मी भिक्षा ग्रहण करणारच होतो तेवढ्यात या कुत्र्याने माझ्या भिक्षेला स्पर्श केला. म्हणून मी त्याला भीती दाखवावी म्हणून त्याच्या दिशेने दगड फेकून मारला व त्याच्या पायाला दगड लागून त्याचा पाय मोडला.त्यात माझी काय चूक?
भगवंत म्हणाले तो अज्ञानी जीव आहे, अन्न पाहून खाण्याची इच्छा त्याची सुद्धा झाली आणि तो खाण्याकडे आकर्षित झाला. त्यात त्याचे तरी काय चुकले? खरी चूक तर तुमचीच आहे कारण तो अज्ञानी आहे परंतु तुम्ही तर ज्ञानी आहात ना. आणि तुम्ही जाणूनबुजून त्याला दगड फेकून मारला परिणामी त्याला दुखापत झाली म्हणून तुम्ही दंडास पात्र आहात.
पुढे भगवंत बोलले कि तुम्ही माझे काही वाईट केलेले नाही त्यामुळे मी तुम्हाला शिक्षा देऊ शकत नाही. तुम्हाला या कर्माची शिक्षा हा कुत्राच देईल. भगवंत कुत्र्याला बोलले कि तू काय संन्याशाला काय शिक्षा देऊ इच्छितो? कुत्रा बोलला हे प्रभू या संन्याशाला एखाद्या शिव मंदिराचा महंत करा. भगवंतांनी त्याचे म्हणणे ऐकले व त्या संन्याशाला सुंदर वस्त्रे नेसायला दिली.
त्याच्या गळ्यात चंदनाच्या माळा घातल्या.त्याला पालखीत बसवून वाजत गाजत एका महादेवाच्या मंदिरात नेऊन त्या मंदिराचे महंत पद दिले. त्यावेळी संन्याशाला वाटले कि मला किती छान शिक्षा मिळाली आहे. त्या कुत्र्याने तर मला शिव मंदिराचा महंत करून टाकले. याच विचारात तो स्वतःच्या भाग्यावर आनंदी होऊ लागला. भगवंत आपल्या दरबारात परत आले.
दूतांनी भगवंतांना प्रश्न केला कि त्या कुत्र्याने संन्याशाला शिक्षा न देता शिव मंदिराचा महंत केले हि कुठल्या प्रकारची शिक्षा आहे? याला शिक्षा नाही तर सौभाग्याची गोष्ट म्हणावे लागेल. त्यावर भगवंत म्हणाले याचे कारण तुम्ही त्या कुत्र्यालाच का नाही विचारत? दूत लगेच त्या कुत्र्याकडे गेले व त्या कुत्र्याला बोलले कि त्याने तर तुझा पाय मोडला मग त्याला त्रास होईल अशी शिक्षा द्यायची सोडून त्याला आनंद होईल अशी शिक्षा दिलीस.
त्यावेळी कुत्रा बोलला कि शेतीत उत्पन्न झालेल्या अन्न धान्याची रखवाली करणारा, महादेवाचे मठ, मंदिर, उद्यान या स्थानांचा अधिपती. अ नाथ स्त्रीचा व बालकांच्या धनाचे हर ण करणारा, शिव्या शाप करणारे, गाय, ब्राम्हण तसेच महादेवाना अर्पण केलेल्या धनाचे अपह रण करणारे, अन्याय करणारे, राजाच्या महालात आलेल्याला हाकलुन लावणारे आणि इतरांचे धन लुबाडणारे, वाईट काम करून अधिक धन जोडणारे हे सर्व मे ल्यानंतर कुत्र्याच्याच रूपात ज न्म घेतात.
कुत्र्याने सांगितले कि मी सुद्धा या जन्मी म्हणूनच कुत्रा झालो आहे. मी सुद्धा मागच्या जन्मी एका मठाचा महंत होतो. मी त्या संन्याशाला त्याच्या कर्माचे फळ मिळावे म्हणूनच हे पद दिले आहे. आता तो महंत शिव मंदिरात बसून जे काही पाप करेल त्याच्या कर्माचे फळ त्याला पुढील जन्मात कुत्रा बनवेल. कर्म गती विचित्र आहे. कुठे तो कुत्रा पशु यो नीत राहूनही मुक्त झाला आणि कुठे तो संन्याशी तो संन्याशी असून देखील कुत्रा बनला.
माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.