आज वटपौर्णिमेला रात्री हे एक काम कराच… आयुष्यात काहीच कमी पडणार नाही… मिळेल पैसा, सुख, समृद्धी…

0
2394

नमस्कार मित्रांनो,

वटपौर्णिमेच्या दिवशी बऱ्याच आख्यायिका सांगितल्या जातात. पर्यावरणीय महत्व सुद्धा या दिवसाचे खास सांगितले जाते. या दिवशी आपल्या पतीसाठी, वास्तुसाठी महिला हे विशेष उपाय करतात. या तिथीला हे उपाय केल्यास त्याचा बराच  फायदा आपल्याला होतो.

मित्रांनो विशेषतः या दिवशी स्त्रिया व्रत, उप वास ठेवतात. त्यासाठी पतीने सुद्धा तिला योग्य तो सन्मान द्यायला हवा. हळदी कुंकू एकत्र करू त्यात थोडे केसर घालून थोडं ओलं करून पतीला त्याचा टिळा लावा. त्यावर अक्षता चिकटवा, पतीचे औक्षण करून त्याचा आशीर्वाद घ्या.

शक्य असल्यास पत्नीला पतीने एखादी काठपदराची साडी अथवा दागिना भेट द्यावा ज्यामुळे तुमच्यातील स्नेह वृद्धिंगत होईल. पतीने पत्नीकडून सुटा 1 रुपया घेऊन त्यात स्वतःचा 1 रुपया मिसळा व तो हिरव्या छोट्या कापडात गुंडाळून धन संचय करतो त्या ठिकाणी ठेवा ज्यामुळे तुम्हाला नक्कीच लाभ होईल.

जमल्यास दोघांनी 11 वेळा गायत्री मंत्राचा जप करावा. तसेच रात्री चंद्राला अर्घ्य दोघांनी मिळून दुधाने द्यावे व चंद्राला नमस्कार करावा. रात्रभर चांदीच्या ग्लास मध्ये दूध ठेवून सकाळी दोघांनी हे दूध घ्या.

खूपच अडचणी येत असतील तर घरातील साठवलेल्या पाण्यात 2 चमचे दूध टाका, तसेच जर शक्य असेल तर पौर्णिमेच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात 4 चमचे दूध टाका.

पिंपळाच्या झाडात माता लक्ष्मी व भगवान विष्णू यांचा वास असतो असे म्हणतात तर तुम्ही यासाठी पती पत्नीनं दोघांनी एक कलश शुद्ध जल घेऊन त्यात थोडे कच्चे दूध व बत्ताशे घालून ते पिंपळाच्या झाडाला अर्पण करा. आपल्या घरातील दोष नाहीसे होतात.

मित्रांनो या दिवशी सत्यवान आणि सावित्रीचे स्मरण करावे. तसेच विष्णुसहस्रनामावली किंवा शिवाष्टक जप करावा व हा जप वडाच्या, पिंपळाच्या, औदुंबर च्या कोणत्याही जागी उपलब्ध असलेल्या ठिकाणी करा व 108 वेळा जप करून झाल्यावर पांढरे तीळ व दुध अर्पण करा.

या दिवशी सुवासिक पांढरी फुले देवाला अर्पण करावीत. शक्य असल्यास दीर्घायु साठी तुम्ही 7 वडाची झाडे लावू शकता, जतन करू शकता. पत्नीने पतीच्या उजव्या हाताला लाल रंगाचा धागा सात वेळा गुंडाळावा व त्याचे आशीर्वाद घ्यावेत.

आपल्या सासू सासऱ्यांना नमस्कार करून त्यांना गोड प्रसाद देऊन औक्षण करून काहीतरी भेट द्या जेणेकरून त्यांचा आशीर्वाद मिळेल, तुमचं नातं दृढ होईल व स्नेह वाढेल. तसेच पतीने देखील पत्नीच्या आई वडिलांशी संपर्क करून वरीलप्रमाणे कार्य करावे.

थोरा मोठ्यांचे आशीर्वाद फार गरजेचे असतात. तसेच या दिवशी भूमीला नाक घासून नमस्कार करा व तिचा आशीर्वाद हळदी, कुंकू, अक्षता, फुलं वाहून घ्या, तसेच अष्ट दिशांना प्रदक्षिणा घालण्यासाठी तुम्ही स्वतःभोवती हात जोडून गोल प्रदक्षिणा घालावी. यामुळे सर्व दोष नष्ट होतात व सर्व देवी देवतांचे आशीर्वाद मिळतात.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here