नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो आपली भरभराट व्हावी, घरात अनेकविध धनाचे स्रोत यावेत, घरात नेहमी धन संपदा असावी असे नेहमीच सर्वांना वाटत असते.
आपल्या प्रत्येकाला आपली परिस्थिती चांगली असावी, सर्व सुख समृद्धी घरात असावी असे वाटते, तसे प्रयत्नही खूप जण करतात पण बऱ्याचदा अपयश येते, त्याची कारणे आपल्या वास्तू शास्त्रात, ज्योतिष शास्त्रात, भविष्य शास्त्रात सांगितली आहेत, जर आपण त्याप्रमाणे उपाय केले तर नक्कीच आपली प्रगती होईल व तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील.
माता लक्ष्मीचे वास्तव्य आपल्या घरात नेहमी रहावे, आपल्यावर सदैव तिची कृपा बरसावी यासाठी शुक्रवारी हे छोटे छोटे उपाय नक्की करावेत. घरातील धन, पैसा यांची सफाई आठवड्यातून एकवेळ करावी व शुक्रवारी त्याची पूजा करावी.
मित्रांनो शुक्रवार हा देवी लक्ष्मी चा वार असतो, माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण बरेच उपाय करत असतो. त्यानुसार आपल्याला फलप्राप्ती होते.
सर्व ग्रहांमध्ये शुक्र ग्रह हा सर्वात चमकदार ग्रह आहे. जीवनातील यश, कीर्ती, आकर्षण यांच्याशी फार जवळच संबंध या ग्रहाचा असतो. म्हणून शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करून प्रसन्न करून घेतले जाते व त्यामुळे शुक्र ग्रह मजबूत होतो.
शुक्रवारी लवकर उठुन माता लक्ष्मीची पूजा करा व प्रार्थना करा. तसेच कमळाचे फुल किंवा कोणतेही लाल रंगाचे फुल मातेला अर्पण करा.
घरात धन येत नसेल, बरकत येत नसेल, पैसा टिकत नसेल , नोकरी मध्ये, व्यवसायात पाहिजे तसे काम होत नसेल तर शुक्रवारी काळ्या मुंग्यांना साखर खाऊ घाला, तुम्हाला बढती मिळेल, व्यवसायात एखादी मोठी ऑर्डर मिळेल.
शक्य असल्यास पांढऱ्या रंगाचे वस्त्र धारण करा, पांढऱ्या वस्तू दान करा, जसे की तांदूळ, दूध, दही, पांढरी फुले, पांढरी मिठाई इ.
जमलं तर वैभव लक्ष्मीचं व्रत संकल्प करून करा. माता लक्ष्मी तुमची इच्छा नक्की पूर्ण करेल. तसेच यादिवशी देवघरातील लक्ष्मीच्या मातेची पूजा करा, धने अर्पण करा, श्री सूक्त, लक्ष्मी मंत्र जप करा.
मित्रांनो यामुळे माता लक्ष्मी घरात वास करेल. तसेच सायंकाळी कधीही झोपू नका, घरात वाईट, अपशब्द बोलू नये, आपलं काम प्रामाणिक पणे करा ज्यामुळे माता लक्ष्मी सदैव घरी वास करेल.
अशाच मनोरंजक आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.
मराठी धिंगाणा पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.