आज 25 मार्च… एकादशीच्या रात्री तांदळाच्या डब्यात टाका ‘ही’ एक वस्तू… रात्रीत बदलेल भाग्य…

0
501

नमस्कार मित्रांनो,

वर्षभरात 24 एकादशी येतात. या 24 पैकी कोणत्याही एकादशीला आपण आपला आजचा हा उपाय करू शकता. खरं तर एकादशी च्या रात्री तांदळाच्या डब्यात आपल्याला एक वस्तू टाकायची आहे.

मित्रांनो या एका वस्तूच्या प्रभावाने आपल्या घरात माता लक्ष्मी ची कृपा बरसते. धन, सुख, ऐश्वर्य निर्माण होते. हा उपाय कसा करायचा आहे, त्याचे नियम आणि पद्धत आपण आज जाणून घेणार आहोत.

एकादशी तिथी ही भगवान श्री हरी श्री विष्णूंची अत्यंत प्रिय तिथी मानली जाते. हिंदू धर्म शास्त्रात सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ व्रत हे एकादशी चे मानले जाते.

आणि भगवान विष्णूंची प्रिय तिथी असल्यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा अवश्य करा. आपण रोज जशी देवपूजा करतो अगदी तशीच पूजा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एका पाटावर विधिवत करावी.

ही पूजा आपण सकाळी किंवा सुर्यास्ता नंतर, संध्याकाळी, रात्री सुद्धा करू शकता. ही पूजा करत असताना आपण एक छोटीशी गोष्ट करायची आहे.

माता लक्ष्मी ला काही गोष्टी या अत्यंत प्रिय असतात. अक्षत म्हणजेच न तुटलेले, फुटलेले तांदूळ, कुंकू, चांदी, विलायची, केशर आणि लवंग. या वस्तू माता लक्ष्मी ला अत्यंत प्रिय आहेत.

मित्रांनो खरं तर एकादशीला अक्षत चे सेवन करू नये. अक्षत म्हणजे तांदूळ. न तुटलेले, फुटलेले तांदूळ. हिंदू धर्म शास्त्रात असं सुद्धा मानलं आहे की एकादशीला वांगी, मांसाहार, मसूर डाळ सुद्धा वर्ज्य करावी.

आज आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी उपाय करत आहोत, त्यामुळे या नियमांचे पालन अवश्य करा. एकादशी ला भात, म्हणजेच तांदूळ खाऊ नका.

या दिवशी आपण तांदूळ खाणार नसलो तरी तांदळाचे उपाय मात्र आपण करू शकतो. माता लक्ष्मी ला अक्षत अत्यंत प्रिय असतात. आपण नक्की काय करायचं आहे. माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी श्री विष्णू यांची पूजा करायची आहे.

पूजा करताना एक चांदीचा सिक्का घ्या. घरी अगोदर पासून असलेला सिक्का सुद्धा वापरू शकता. नसेल तर नवीन खरेदी केला तरी चालेल.

या पूजेमध्ये एक चांदीचा सिक्का घेऊन तो माता लक्ष्मीच्या चरणी ठेवायचा आहे. ठेवण्यापूर्वी तो सिक्का गंगाजलाने धुवून घ्या. गंगाजल नसेल तर साध्या पाण्याने सुद्धा आपण धुवू शकता.

सिक्का धुवून घेतल्यानंतर एखाद्या पात्रामध्ये, वाटी मध्ये घेऊन तो माता लक्ष्मीच्या चरणी ठेवावा. थेट जमिनीवर, पाटावर ठेऊ नका. त्याखाली काहीतरी आसन ठेवा. फुलांच्या पाकळ्या, झाडाचे एखादे पान ठेऊ शकता. काही नसेल तर एखादी वाटी घेऊन त्यात तो चांदीचा सिक्का ठेवा.

सिक्का ठेवल्यानंतर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची विधिवत पूजा करावी. या चांदीच्या सिक्क्यावर सुद्धा थोडं हळद कुंकू वहा.

मित्रांनो ही पूजा संपन्न झाल्यानंतर एकादशी च्या रात्री हा चांदीचा सिक्का आपण आपल्या घरातील तांदळाच्या डब्यात टाकायचा आहे.

सिक्का टाकण्यापूर्वी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची मनोभावे प्रार्थना करावी. आपल्या घरातील धनाच्या समस्या, पैशाच्या समस्या दूर करण्यासाठी, घरी पैसा येण्यासाठी प्रार्थना करावी.

आपल्या घरात धन, धान्य, ऐश्वर्य, वैभव, बरकत निर्माण व्हावे यासाठी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्याकडे प्रार्थना करायची आहे.

त्यानंतर तो सिक्का माता लक्ष्मी च्या चरणापासून उचलून तांदळाच्या डब्यात टाकावा. मित्रांनो हा सिक्का पूर्ण वर्षभर त्याच डब्यात ठेवा.

जेव्हा जेव्हा दिवाळी येईल, माता लक्ष्मीचे पूजन कराल, लक्ष्मी पूजन असेल त्यावेळी हा सिक्का काढून वाटी मध्ये ठेवून माता लक्ष्मीच्या चरणी ठेवावा. पूजा झाल्यानंतर त्याच रात्री पुन्हा हा सिक्का तांदळाच्या डब्यात टाका.

मित्रांनो या उपायाने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू प्रसन्न होऊन आपल्या घरातील पैशांच्या सगळ्या समस्या दूर होतील.

आपण पूर्ण श्रद्धेने, मनात कोणत्याही शंका न ठेवता हा उपाय केला आहे. त्यामुळे आपल्याला दुसऱ्या दिवसापासून याचे परिणाम दिसू लागतील.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रीणीं सोबत, नातेवाईक यांच्यासोबत नक्की शेयर करा.

अशाच मनोरंजक आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.

मराठी धिंगाणा कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here