महिलांनी स्वयंपाक घरात भाकरी किंवा चपाती बनवताना गुपचूप करा हे एक काम…

0
993

नमस्कार मित्रांनो,

किचन मध्ये दोन वस्तू अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. वास्तुशास्त्रानुसार तवा आणि कढई. तव्याशिवाय आपल्या किचनमध्ये भाकरी भाजू शकत नाहीत. थोडक्यात त्याशिवाय किचन हे अपूर्ण असते. या तव्याचे फायदे वास्तुशास्त्रानुसार खुप आहेत, घराची प्रगती होते. या उलट जर तव्यासंबंधी काही चुका झाल्या तर त्यामुळे आपल्या जीवनात राहुदोष उत्पन्न होतो आणि घराची आर्थिक परिस्थिती बिघडते.

मित्रांनो भाकरी करण्यापूर्वी किंवा चपात्या करण्यापूर्वी आपण एक छोटीशी गोष्ट नक्की करायची आहे. त्याने आपल्या घराची बरकत वाढेल. काही वस्तूंचा आपल्या जीवनात खुप मोठा प्रभाव पडत असतो. किचन हे आपल्या घरातील एक श्रेष्ठ स्थान आहे जितकं किचन व्यवस्थित असेल तितका आपले स्वयंपाक घर व्यवस्थित असेल, आपल्या जीवनामध्ये आनंदाची, सुखाची निर्मिती होत असते.

मित्रांनो पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे जो तवा आहे हा तवा कधी उभा ठेवू नका. महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की, आपल्या स्वयंपाक घरातील तवा हा कधीच उभा ठेवू नये यामुळे वास्तुदोष निर्माण होतात. तसेच तुमची शेवटची भाकरी किंवा चपाती असेल ती छोटी बनवा आणि बनवल्यानंतर तव्यावरच काही काळ ठेवायची आहे. याने जेवण करताना जे दोष उत्पन्न होतात हे दोष समाप्त होतात.

स्वयंपाक पूर्ण झाल्यावर जेव्हा तुमच्या चपाती किंवा भाकरी पूर्ण करून झाल्यावर शेगडीवर तवा तसाच ठेवू नका त्यामुळे सुद्धा वास्तुदोष  निर्माण होतात. कारण या दोन्ही वस्तू राहू ग्रहाचे प्रतिनिधित्व करतात. राहू ग्रह हा आपल्याला आकस्मिक धनलाभ करून देत असतो. आपल्या जीवनामध्ये अचानक मोठ्या प्रमाणात पैशांची प्राप्ती होऊ शकते.

मित्रांनो गरम तव्यावर जर आपण पाणी शिंपडले तर यामुळेसुद्धा आपल्या घरात वाद उत्पन्न होतो. घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. म्हणून तुम्ही तवा किंवा कढई स्वच्छ करायला हवी. तुमच्या घरात जर पाहुणे येत असतील किंवा शेजारी येत असतील तर त्यांच्या दृष्टीस तवा किंवा कढई पडता कामा नये, कारण या गोष्टी वास्तुशास्त्राच्या दृष्टीने धनाशी संबंधित आहेत. तवा ठेवण्यासाठी जी सर्वोत्तम जागा आहे ती तुमच्या शेगडीच्या उजव्या बाजुला आहे.

जेव्हा आपला गॅस बंद असेल किंवा तुमची शेगडी बंद असेल तेव्हा त्यावर काहीच ठेवायचं नाही अस वास्तुशास्त्र सांगते. भाकरी करण्यापूर्वी किंवा चपाती करण्यापूर्वी चिमुट्भर मीठ घ्यायच आहे. गॅस सुरू करून त्यावरती  तवा ठेवा आणि चिमूटभर मीठ टाकल्यानंतर तवा स्वच्छ करा आणि नंतर त्यावर  भाकरी किंवा चपाती  करू शकता.

पहिली चपाती शक्य असल्यास गोमातेसाठी अवश्य काढुन ठेवा. तसेच तवा कधीच लटकवून ठेवू नये. आपल्या घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी या गोष्टी नक्कीच मदत करतील.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here