नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, आपलं घर वास्तुशास्त्रानुसार रचना केलेलं असावं. तसेच घरातील वस्तू, जागा, खोल्या या जर ज्या त्या ठिकाणी असल्या तरच त्या दिशेचा, वस्तूचा आपल्याला लाभ होतो.
एखाद्या दिशेची, वस्तूची स्वतःची ऊर्जा असते. जर त्या दिशेला ती वस्तू ठेवली नाही तर त्याचे विपरीत परिणाम होतात. त्यामुळे घरात अडचणी येतात, अचानक संकटे येतात व आपल्याला कळत नाही की आपण काय करावे.
काही वाईट घटना झाली की, त्याचे कारण काय, पैसा येऊनही तो कुठे नाहक खर्च होतो समजत नाही, आजा रपण सुटत नाही, घरातील लोक सतत चिडचिड करतात तसेच जीवन खूपच हताश मार्गावर येऊन ठेपते.
मित्रांनो असे होऊ नये यासाठी या काही गोष्टींचे, छोट्या छोट्या गोष्टींचे पालन केले तर आपल्या जीवनात यश, सुख, समृद्धी येते.
बऱ्याचदा घरातील अनेक गोष्टींची दिशा चुकते, जसे की घरातील दिवा लावण्याची दिशा, मूर्ती ठेवण्याची दिशा कोणती असते हे काही जणांना माहिती नसते.
मित्रांनो घरातील देवाच्या मूर्तींची दिशा ही दक्षिण दिशा सोडून कोणतीही असल्यास चालते कारण दक्षिण ही मृत्यूची दिशा आहे, यम या दिशेला असतो. त्यामुळे शक्यतो आपलं मुख पूर्वेला होईल असग रीतीने ईशान्य दिशेत देवघर बनवावे.
मित्रांनो तसेच देवघरात तुम्ही जर 2 शिवलिंग ठेवले असतील तरी चालतात, 2 शालीग्राम चालतात, 2 सूर्यकांत असतील तरी चालतात, लक्ष्मीच्या मूर्ती 3 असाव्यात तसेच गणेशाच्या देखील विषम संख्येत असाव्यात, 1 किंवा 3 चालतील.
त्याच बरोबर शंख असतील तर ते 2 चालतील. घरात, देवघरात जर भ ग्न झालेल्या मूर्ती असतील तर त्यांचे विधिवत विस र्जन करावे, नंतर त्यांची विधिवत पुन्हा स्थापना करावी.
मित्रांनो देवतांची पूजा करताना, तिलक लावताना आपण करंगळी जवळच्या बोटाचा वापर करावा व स्वतःला तिलक करताना सर्वात मोठं मधलं बोट आपण वापरावं.
त्याच बरोबर घरातील दिवा लावण्याची जागा, देवघरात कुठे व कोणत्या दिशेला दिवा लावावा याचे सुद्धा शास्त्रात वर्णन आहे.
मित्रांनो दिवा हा देवघरात उत्तरेकडे ज्योत होईल अशा प्रकारे लावावा ज्यामुळे तुमची प्रगती उत्तरोत्तर होईल.
घरातील समई प्र ज्व लित करताना त्यातील ज्योती 1, 3, 5 अशा विषम संख्येत लावाव्यात, त्यामुळे आपली भरभराट होते व आपल्या आयुष्यात प्रकाश येतो.
मित्रांनो नारळ वाढवताना, श्रीफळ वाहताना या गोष्टी अवश्य ध्यानात घ्या. श्रीफळ वाढवताना त्याची शेंडी अवश्य राखा व ती देवाकडे करून फोडा म्हणजेच नारळ वाढवा. कारण शास्त्रा प्रमाणे हीच योग्य पध्दत आहे.
मित्रांनो समईतील ज्योती या फुंकून कधीही विझवू नका, त्यामुळे निराशा पदरी पडते. जरी या ज्योती काही कारणास्तव विझल्या तर वाईट वाटून घेऊ नका, कोणतीही शंका न घेता पुन्हा प्रज्वलित करा.
तसेच ओले कपडे घालून कधीही देवपूजा करी नये असा शास्त्रात उल्लेख आहे. अंधारात मूर्तींना स्पर्श करू नये किंबहुना दिवा लावल्याशिवाय वंदन ही करू नये.
मित्रांनो देवघरातील जो शंख असतो त्याला कधीही अक्षता वाहू नका. देवाला वंदन, नमस्कार करताना डोक्यावर टोपी घालू नका, कारण पूर्ण श्रद्धेने देवासमोर नतमस्तक व्हावे.
या गोष्टी आपल्याला आपल्या पूर्वजांनी तसेच शास्त्रात सांगितल्या आहेत ज्या आपल्या सुखी जीवनासाठी खूप महत्वाच्या आहेत.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.
अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.