नमस्कार मित्रानो
मित्रानो लक्ष्मीला नजर लागतेच. अगदी आपली सुद्धा, स्वतःची सुद्धा नजर ही लागतेच. कधी कधी चार पैसे जास्त आले, नफा जरा बऱ्यापैकी झाला, तर आपल्याच मनात असे काही विचार येतात की, आपल्या पैशांना आपलीच नजर लागते.
शेजारी पाजारी मित्र मंडळी तर आहेतच, ज्यांना आपला भल बघवत नाही, त्यांची नजर बऱ्याचदा लागते आणि मग प्रगती होता होता थांबते. पैसा भरपूर आला, एका महिन्यात भरपूर आला मात्र दुसऱ्या महिन्यात तितकासा आला नाही.
याला केवळ नजर दोष हाच कारणीभूत नसतो, तर कधी कधी अनेक लोक बाधा उत्पन्न करतात. अनेक प्रकारचे तंत्र मंत्र तोटके केले जातात. अशा वेळी बऱ्याचदा आपण तांत्रिककाकडे जातो आणि यातील ९९% लोकं फसवेगिरी करतात, त्यांना त्यातील ज्ञान नसतं आणि पैसे उकळले जातात.
मित्रांनो, जर तुमच्याही बाबतीत या गोष्टी घडत असतील, आणि त्याला जोडून शनि दोष तर आहेतच, शिवाय शनीची साडेसाती ही आहे. महादशा अंतर्दशा किंवा राहू-केतू चे दोष आहेत. आणि या सर्वांवरती एक रामबाण उपाय आहे की ज्याला तंत्र-मंत्र शास्त्रात खूप मोठी मान्यता आहे.
प्रत्यक्ष महाकाल यांचे जे एक रूप आहे, एक वृक्ष, एक झाड, ते म्हणजे धोतरा. हे धोतर्याच झाड प्रत्यक्ष महाकाल स्वरूप आहे , आणि म्हणूनच महाशिवरात्रीला किंवा श्रावण महिन्यात हा धोतरा शिवलिंगाला अर्पण करत असतो.
मित्रांनो, ह्या धोतर्याचा एक भाग, एक अवयव आपण जर आपल्या घरात, दुकानात किंवा जिथे आपण काम करता तिथे जर आणून ठेवला, तर वरील सर्व प्रकारचे जे दोष आहेत, ते जर कुणी केले असतील तर त्यापासून मुक्ती मिळते.
परंतु, आपल्याला या धोतर्याच फळ आणायचं नाहीये , त्याऐवजी या धोतर्याच मुळ आपल्याला विधिपूर्वक आपल्या घरात किंवा कामाच्या ठिकाणी आणायचं आहे. आणि त्यासाठीचा सर्वोत्तम दिवस आहे रविवार.
मात्र, त्या आधी एक दिवस म्हणजेच शनिवारी आपल्याला हे झाड शोधून ठेवायचे आहे. हे झाड रस्त्याच्या कडेला तुम्हाला कुठेही दिसून येईल. शनिवारी सूर्यास्ताच्या वेळी या झाडाच्या ठिकाणी जाताना, आपल्याला घरातील तांब्या भरून पाणी, दोन अगरबत्ती घेऊन जायचं आहे.
तिथे गेल्यानंतर आपल्याला दोन अगरबत्ती लावायच्या आहेत, पाणी वाहायचे आहे, एखाद फुल सुद्धा आपण त्या ठिकाणी अर्पण करू शकता. त्यानंतर या वृक्षाला मनोभावे हात जोडून आपण प्रार्थना करायची आहे, उद्या रविवारी सकाळी आम्ही आपल्याला घेऊन जाण्यासाठी येत आहोत, कृपया आपण आमच्या घरात यावं.
त्यानंतर तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या बोलायच्या आहेत आणि तिथून निघून जायचे आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण स्नान वगैरे करून ह्या झाडाकडे जायचे आहे आणि या झाडाचे मूळ म्हणजेच या झाडाच्या मुळाचा छोटासा तुकडा सोबत घ्यायचा आहे.
तुमच्या घरात जर एखाद्या व्यक्तीला वारंवार नजर लागते, ती व्यक्ती आजारी पडते, तर यासाठी बाजारात उपलब्ध असणाऱ्या ताबिज मधे या झाडाच्या मुळाचा तुकडा टाकून ते आपण परिधान करू शकता.
तो मुळाचा तुकडा घेऊन घरात आल्यानंतर आपण तो व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचा आहे. त्यावर थोडं गंगाजल शिंपडले तरीही चालेल. आणि जर गंगाजल नसेल तर साधे पाणी वापरले तरी चालेल.
त्यानंतर आपण हा मुळाचा तुकडा आपल्या देवघरामध्ये ठेऊ शकता, किंवा तुम्ही जिथे काम करता तिथेही हा तुकडा तुम्ही ठेऊ शकता. या तुकड्याला दररोज धूप दीप दाखवत चला. त्यानंतर तुम्हाला ज्या काही अडचणी आहेत त्या हात जोडून सांगा.
मित्रांनो, जोपर्यंत हा तुकडा तुमच्या जवळ असेल तोपर्यंत कोणत्याही प्रकारची नकारात्मक शक्ती तुमच्याजवळ भटकणार सुद्धा नाही. तुमच्या वास्तूला खूप मोठ्या प्रमाणात बाधा उत्पन्न झाली असेल तर थोडस गंगाजल घ्या.त्या गंगाजलात ते मूळ बुडवून संपूर्ण घरात शिंपडा.
घरातून नकारात्मकता निघून जाईल , कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह शक्ती घरात नावाला सुद्धा राहणार नाही.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.