धोनीबद्दल ह्या गोष्टी माहित नसतील तर स्वतःला धोनीचे फॅन म्हणू नका…

0
379

नमस्कार मित्रानो,

मित्रानो महेंद्र सिंग धोनी भारतीय क्रिकेट इतिहासातील एक नावाजलेलं नाव. भारतीय संघाचा आज पर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून त्याची ओळख आहे. धोनी तरुण पिढीत आजही तेवढाच प्रसिद्द आहे जेवढा सुरवातीच्या काळात होता.

मात्र जेव्हा भारत विश्वकप जिंकला तेव्हा पासून धोनीच्या प्रसिद्धीस आणखीनच भर पडली. सर्वांनाच माहित आहे कि धोनी भारतातीलच नव्हे तर जगातील अनेक नावाजलेल्या क्रिकेटपट्टू पैकी एक आहे. धोनीने आपल्या करियरची सुरवात एका छोट्याश्या गावातून केली होती.

धोनी त्याच्या शांत स्वभावामुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या याच स्वभावामुळे त्याने करोडो लोकांच्या मनात त्याची जागा निर्माण केली आहे. आज आम्ही तुम्हाला असेच धोनी बद्दल तुम्हाला माहित नसलेले काही किस्से सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया सविस्तर.

जेव्हा धोनी इंडिया A टीम साठी खेळत असे तेव्हा त्याच्या सोबत आकाश चोपडा हा खेळाडू सुद्धा खेळत होता. तेव्हा आकाश चोपडाने धोनीला सल्ला दिला होता कि तुला जर भारतीय क्रिकेट संघाकडून खेळायचे असेल तर तू तुझे मोठे केस कमी कर.

त्यावर धोनी बोलला कि काय माहित उद्या मी भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवेन सुद्धा आणि माझी हीच केसांची स्टाईल संपूर्ण तरुणाईला वेड लावेल. आणि त्यानंतरचा इतिहास तुम्हाला वेगळा सांगायची गरज नाही.

धोनीने आपले पहिले शकत पाकिस्तान विरुद्ध खेळताना बनवले होते. त्यावेळी त्याने 128 बॉल मध्ये 148 धावांची खेळी केली होती. हा एक विश्व रेकॉर्ड होता. कारण त्यावेळी कुठल्याच फलंदाजाने पहिल्याच शतकाच्या वेळी 148 धावा केल्या नव्हत्या.

धोनीने एका मुलाखतीदरम्यान असे म्हटले कि त्याला असे कधीच वाटले नव्हते कि तो भारतीय संघासाठी क्रिकेट खेळेल. त्याला असेच वाटायचे कि एक राज्यस्तरीय क्रिकेट पटू म्हणून करियर संपेल. परंतु मित्रानो तो एव्हढ्यावरही खुश राहिला असता असे सुद्धा धोनीने सांगितले होते.

मित्रानो आपण सर्वानीच पाहिले असेल कि 2011 च्या फायनल मध्ये जेव्हा विराट कोहलीची विकेट गेली तेव्हा युवराज सिंगचे खेळायला येणे अपेक्षित होते. पण असे काही झाले नाही. कारण विराट नंतर धोनी स्वतः फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता.

याबद्दल धोनीला मुलाखती मध्ये विचारले असता धोनीने असे म्हटले कि जेव्हा विराटची विकेट गेली तेव्हा मुथय्या मुरलीधरन गोलंदाजी करत होता. आणि धोनीने आय पी एल मध्ये मुथय्या सोबत अनेक सामने एकत्र खेळले होते. त्यामुळेच धोनी युवराजच्या आधी खेळायला मैदानात उतरला.

धोनीला जेव्हा मुलगी झाली तेव्हा तो कुटुंबियांसोबत थांबू शकला नाही. कारण त्यावेळी विश्वचषकाची तयारी चालू होती. आणि धोनीला कुटुंबापेक्षा संघाला वेळ देणे अधिक महत्वाचे वाटले. धोनी नेहमीच अनेक संस्थांना आर्थिक मदत करत असतो. पण त्यातून तो कधीच प्रसिद्धी मिळवायचा प्रयत्न करत नाही. कारण त्याचे असे म्हणणे आहे कि अशा गोष्टींतून प्रसिद्धी कधीही मिळवू नये.

मित्रानो आपण सर्वानी धोनीचा चित्रपट पाहिलाच असेल. त्यामध्ये जो मित्र धोनीला हे लि कॉ प्ट र शॉ ट शिकवतो त्या मित्रा बद्दल प्रत्येकाला माहिती आहेच. जेव्हा तो मित्र आ जारी होता तेव्हा धोनीने त्याच्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली होती. त्याच्या उपचारासाठी त्याने हे लि कॉ प्ट र सुद्धा देऊ केले होते. मित्रांसाठी धोनी शक्य तेवढी मदत करायला नेहमीच तयार असतो.

तुम्हाला माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेयर करा. अशाच रोजच्या राशिभविष्य विषयक पोस्ट मिळवण्यासाठी आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here