नमस्कार मित्रांनो,
धनु राशीवाल्यांनो सोडून द्या त्यांना ज्यांना तुमची कदर नाही, जो तुमचा आदर करु शकत नाही. धनु रास ही सर्वात सुंदर रास आहे. आपल्या दुनियेत मस्त राहणारे बिनधास्त लोक.
ना कोणासोबत वैर ना कोणासोबत दुष्मनी. हे लोक स्वतःच्या अटींवर आपले जीवन जगतात. हे लोक थोडे मुफट असतात. लोकांना अस वाटत की हे लोक कडू बोलतात पण खरं तर हे लोक जे सत्य असेल तेच बोलतात आणि लोकांना ते कडू वाटत.
धनु राशीच्या व्यक्ती या खूप सात्विक असतात. यांचे विचार हे नेहमी दुसऱ्याचं भल करण्यासाठी असतात. हे लोक चांगला विचार करणारे आणि प्रेमात विश्वास ठेवण्या योग्य असतात.
हे लोक कोणतीच गोष्ट मनात दाबून ठेवत नाहीत. छळ कपट याना आवडत नाही. बारा राशींपैकी धनु राशीचे वेगळेच महत्व आहे. तुमच्या जीवनात अनेक समस्या असतील , तुम्हाला धोका मिळाला असेल तर तुम्ही स्वतःला महत्व दिले तर आणखी सफलता प्राप्त होईल.
मित्रानो हि राशी अग्नितत्वाची राशी आहे. क्षत्रिय वर्णाची राशी असल्यामुळे कडक शिस्त आणि उच्च शिक्षणाची आवड असलेली हि राशी आहे. या राशीचे लोक शिक्षणाला अधिक जास्त प्राधान्य देतात. राशीचा स्वामी ग्रह सुद्धा गुरु म्हणजे संस्कार आणि सुबत्तेचा कारक ग्रह. अनेक गोष्टींची आवड असलेला ग्रह.
समाजकारण , राजकारण यात सक्रिय राहायला याना मनापासून आवडत असत. समाजातील अडलेल्या नडलेल्या लोकांना मदत करायला त्यांचा नेहमीच खारीचा वाटा नाही तर शेर का वाटा असतो असे म्हणायला हरकत नाही. शिक्षण आणि शासकीय क्षेत्रात वरिष्ठ पदावर काम करायला यांची नेहमीच पसंती राहते.
तुम्हाला जर कोणावर प्रेम असेल तर इथे थोडं सावध व्हा कारण तुम्हाला प्रेमात धोका मिळू शकतो. प्रेम हा एक पवित्र शब्द आहे पण धनु राशीचे लोक ज्यांच्यावर सर्वात जास्त प्रेम करतात तेच लोक पाठीमागे धोका देतात.
तेव्हा धनु राशीच्या लोकांना असे वाटते की हे आपण काय केलं, आपल्याकडून काय चूक झाली. तुमच्या जीवनात तुम्हाला ज्याची इच्छा असते ते सर्व मिळते पण काही वेळा तुम्ही स्वतःच्या म्हणजेच आपल्या जवळच्या लोकांशीच पराभूत होता.
या राशीचे लोक दुसर्यांसाठी काहीतरी करायचं असेल तर पूर्ण जीव ओतून देतात पण हे लक्षात ठेवा की स्वतःसाठी ही वेळ काढणे खूप महत्वाचे आहे. स्वतःसाठी जीवन जगायला शिका.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.