नमस्कार मित्रांनो,
मित्रानो आज आम्ही दोन गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्ही स्वतः माता लक्ष्मीला वाहिल्यास सुख , धन , समृद्धी आपोआपच येते. घर नेहमी धनधान्यने भरून राहते. पैसा , गाडी , बंगला सर्व ऐश्वर्य तुमचे होते.
ज्योतिषशास्त्र व तंत्र शास्त्रामध्ये असे अनेक उपाय सांगितले आहेत, ते करून अगदी निर्धन व्यक्ती देखील श्रीमंत बनू शकतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून अत्यंत खास उपाय सांगत आहोत.
महालक्ष्मी ही सर्व चौसष्ट कलांनी पूर्ण आहे असे सांगितले जाते. सर्व प्रकारचे सोळा शृंगार माताराणीला अत्यंत प्रिय आहेत अशी मान्यता आहे आणि एक स्त्री म्हणून तिला सगळ्यात पसंत असते ते म्हणजे मंगळसूत्र.
होय मित्रांनो मंगळसूत्र आणि पतीची निशाणी सिंदूर सगळ्यात जास्त प्रिय असते माता लक्ष्मीला. हा उपाय तुम्ही आपल्या जवळच्या कोणत्याही महालक्ष्मीच्या मंदिरात जाऊन करायचा आहे.
यासाठी तुम्ही एक छोटे मंगळसूत्र व थोडेसे कुंकू घेऊन जवळील लक्ष्मी मंदिरात अथवा आपल्या घरातील महालक्ष्मीच्या मूर्ती पुढे तिच्या चरणी हे समर्पित करा. जर तुम्हाला माता लक्ष्मीचे मंदिर न मिळाल्यास, तुमच्या जवळ असणारे कोणतेही मंदिर अगदी माता सरस्वती, माता दुर्गा अगदी कोणत्याही मातेच्या चरणी हे भेट करू शकता.
परंतु, तुमच्या जवळ माता लक्ष्मीचे मंदिर मिळणार नाही असे होणारच नाही. किंवा प्रत्येक हिंदू घरामध्ये माता लक्ष्मी चे फोटो अथवा मूर्ती असतेच..घरात माता लक्ष्मीची मूर्ती अथवा फोटो नसल्यास तो आणून मग हा उपाय देखील तुम्ही करू शकता.
बस या दोन गोष्टी माता लक्ष्मीच्या चरणी वाहताना आपल्या मनात ज्या पण गोष्टींचे विघ्न आहे, धन समस्या, कुटुंब कलह, स्वास्थ्य कोणतीही समस्या असूदेत त्या बोलून मातेला त्या दूर करण्याची प्रार्थना करा.
नंतर या दोन्ही गोष्टी भेट स्वरूप मातेच्या चरणी वहा. बघता बघता स्वतः माता राणी तुमच्या सर्व संकटांचे निवारण करेल आणि तुमची मनोकामना पूर्ण करेल. हा उपाय खास करून स्त्रीयांद्वारे केला जातो. धन संबंधित सर्व प्रकारच्या समस्यांवर हा उत्तम तोडगा मानला जातो.
जर तुम्ही देखील आपल्या घरी धन आणू इच्छित असाल तर तुमच्यासाठी हा उपाय कोणत्या रामबाण तोडग्याशिवाय कमी नाही. आजसाठी इतकेच! हा उपाय तुम्ही नक्की करून बघा आणि स्वतः फरक अनुभवा. माता लक्ष्मी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो. शुभं भवतु ||
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.