13 एप्रिल नविन वर्ष गुढीपाडवा, चैत्र नवरात्र, कुलदेवीची अशी भरा ओटी…

0
318

नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ,

मित्रांनो 13 एप्रिल हा दिवस खूप पवित्र मानला गेला आहे. कारण या दिवशी मराठी नवीन वर्ष सुरु होत आहे. या दिवशी गुढी पाडवा आहे आणि त्याच दिवशी चैत्र महिन्याचा पहिला दिवस आणि चैत्र नवरात्र सुद्धा सुरु होत आहे.

चैत्र महिन्याचे पहिले 9 दिवस हे देवींसाठी अत्यंत महत्वाचे असतात. कारण हि नवरात्र खूप लाभदायक असते. मित्रांनो तुम्हाला उद्या म्हणजेच नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मातेची ओटी भरायची आहे.

मग ती तुमची कुलदेवी असेल किंवा घरातील माता लक्ष्मी असेल किंवा कोणत्याही देवीची तुमच्या घरात मूर्ती असेल त्या देवीची तुम्ही ओटी भरावी. ज्या देवीला तुम्ही मानता, जिची कृपा दृष्टी तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर आहे त्या देवीची तुम्हाला ओटी भरायची आहे.

मित्रांनो प्रत्येकाच्या घरी लक्ष्मीची मूर्ती असते. तर तुम्ही देवी लक्ष्मी मातेची ओटी भरू शकता. अन्नपूर्णा देवीची मूर्ती असते तिची सुद्धा ओटी तुम्ही भरू शकता. लक्षात असुद्या ओटी फक्त महिलांनी भरायची आहे. महिलांनी म्हणजे फक्त विवाहित महिलांनी.

तर मित्रांनो विवाहित महिलांनी हि ओटी कशी भरावी ? तर त्यासाठी तुम्हाला एक नारळ लागेल, सोबत 11 रुपये दक्षिणा, 1 साडी किंवा ब्लाउज पीस आणि थोडे तांदूळ.

आता आपल्या देवघरात ज्या देवीची तुम्हाला ओटी भरायची आहे तिथे आधी ती साडी देवीच्या पावलाजवळ ठेवून द्यावी. त्यानंतर त्या साडीवर तो नारळ ठेवायचा आहे. लक्षात असुद्या नारळ सोलायचा नाहीये असाच आहे तसा ठेवायचा आहे.

सोबतच 11 रुपये दक्षिणा त्यावर ठेवायची आहे आणि त्यावर 7 किंवा 5 वेळेस तांदूळ टाकायचे आहेत. जसे महिलांची ओटी भरता तशी ओटी भरायची आहे. अशा रीतीने तुम्ही ओटी भरू शकता.

ओटी भरल्यानंतर त्या दिवशी म्हणेजच 13 तारखेला ती ओटी तिथेच देवघरात तशीच राहू दयायची. आणि 14 तारखेला ती ओटी तिथून उचलून घ्यायची. आता ओटीतील साडी किंवा ब्लाउज पीस असेल ज्या महिलेने ओटी भरली ती महिला साडी किंवा ब्लाऊसपिस वापरू शकते.

11 रुपये हे आपण जपून आपल्याजवळ ठेवू शकता. देवीचा आशीर्वाद समजून ते आपण आपल्याजवळ ठेवायचे आहेत. खर्च करायचे नाहीयेत. आणि जे तांदूळ तुम्ही ओटी मध्ये टाकले होते ते तुमच्या धान्यांमध्ये मिक्स करू शकता.

जो नारळ आहे तो फोडून सर्वांनी प्रसाद म्हणून तो खायचा आहे आणि वाटायचा आहे. तर अशा सोप्य्या रीतीने तुम्ही घरच्या घरी देवीची ओटी अवश्य भरावी कारण चैत्र नवरात्र खूप मोठी मानली जाते.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेजचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here