नवरात्रीत देवीला चुकूनही या 3 वस्तू अर्पण करू नका, हाताने गरिबी ओढवून घ्याल.

0
236

नमस्कार मित्रांनो

मित्रानो देवीच्या आगमनाची ओढ सर्वांनाच लागलेली असते. आश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्रीला शारदीय नवरात्र म्हटले जाते . नवरात्रीचा काळ हा देवी आईची उपासना , व्रत व पूजन करण्यासाठी खूपच महत्त्वाचा मानला जातो. असे मानले जाते की देवी नवरात्र काळात साक्षात पृथ्वीवर प्रकट झालेली असते.

म्हणून जर नवरात्र काळात आपण देवी आईचे मनोभावे पूजन केले तर देवीची कृपा आपल्यावर खूप लवकर होते. देवीचे पूजन आणि उपासना करण्याचे काही नियम आहेत. आपण देवीचे पूजन करतो परंतु आपल्याला देवी आईच्या पूजनाची विशिष्ट पद्धत माहीत नसल्याने आपल्या पूजनाचे पूर्ण फळ आपल्याला मिळत नाही.

तसेच अशा काही वस्तू आहेत ज्यांचा वापर देवी आईच्या पूजना दरम्यान अजिबात करू नये , नाहीतर देवी आईचा आशीर्वाद न मिळता आपल्याला देवी आईच्या क्रोधाचा सामना करावा लागू शकतो.

नवरात्र काळात आईच्या नऊ वेगवेगळ्या स्वरूपाचे पूजन केले जाते आणि देवीच्या स्वरूपाप्रमाणे देवीला नैवेद्य अर्पण केला जातो. देवी आई साक्षात भक्ताच्या घरी प्रगट झालेली असते म्हणून आपण देवी आईला प्रसन्न करून घेण्यासाठी विविध उपाय करीत असतो.

देवी आईला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण विविध प्रकारच्या वस्तू देवी आईला अर्पण करतो. परंतु काही अशा वस्तू आहेत त्या देवीला अजिबात अर्पण करू नयेत. नाहीतर देवी आईच्या कृपे ऐवजी देवी आईच्या क्रोधाचा सामना आपल्याला करावा लागू शकतो. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या वस्तू.

मित्रांनो सर्वात पहिली वस्तू म्हणजे नारळ. हिंदू धर्मात नारळाला खूप महत्त्व आहे. नारळाला शुभता व समृद्धीचे प्रतीक मानले जाते. नारळाला श्रीफळ असेही म्हणले जाते . प्रत्येक शुभ कार्यात नारळाचा आवर्जून वापर केला जातो.

मंगल समयी कलश मांडला जातो . कोणतेही शुभ मंगल कार्य नारळाशिवाय पूर्ण होत नाही . देवीच्या पूजनात सुद्धा नारळाचे फार महत्त्व आहे . परंतु नवरात्र दरम्यान नारळाचा वापर करताना आपण काही चुका करून बसतो . मित्रानो नारळ हे तीन प्रकारचे असतात.

एक ओले हिरवे नारळ ज्याचा वापर नारळ पाणी पिण्यासाठी केला जातो. दुसरे म्हणजे तेच नारळ पक्के झाले की त्यात खोबरे तयार होते व आता पाणी देखील राहते. जे पूजनासाठी वापरले जाते आणि तिसरे म्हणजे कोरडे नारळ जे घरात वापरासाठी खोबरे म्हणून वापरले जाते. देवी आईच्या पूजना दरम्यान नारळाचा वापर करताना पक्के झालेले परंतु त्यात पाणी असलेले व भरपूर जटा असलेले घ्यावे. कोरडे नारळ पूजनात कधीही वापरू नये.

तसेच तडा गेलेले , चिरलेले नारळही देवी आईच्या पूजनात वापरू नये. कलशावर नारळ ठेवताना नारळाची शेंडी वरच्या बाजूला येईल याची काळजी घ्यावी. देवी आई समोर कधीही स्त्रियांनी नारळ फोडू नये , कारण नारळ हे बीजरूप आहे आणि स्त्री ही बीज रूपातूनच बाळाला जन्म देत असते.

बीजरुपाकडून बीज तोडणे चुकीचे आहे म्हणून स्त्रियांनी कधीही नारळ फोडू नये. जर आपल्यावर खूप कर्ज झालेले असेल आपण कर्जबाजारी झाला असाल , आर्थिक समस्यांनी त्रस्त झाला असाल तर एक नारळ घेऊन चमेलीच्या तेलात शेंदूर मिक्स करून त्या मिश्रणाने नारळावर स्वतिकचे चिन्ह बनवावे.

व ते नारळ देवी आईला अर्पण करावे. त्यानंतर नवरात्र काळातच शनिवारी किंवा मंगळवारी ते नारळ उचलून हनुमान मंदिरात नावे व हनुमानांना अर्पण करावे. या उपायामुळे आपल्यावरील कर्ज उतरू लागते. कर्जाचा डोंगर हळूहळू कमी होतो व आपल्याला धनलाभ होतो.

जर धन संबंधित काही अडचणी असतील तर नारळावर कुंकवाने स्वस्तिक काढावे व तो नारळ देवी आईला अर्पण करावा. नवरात्र काळात तो नारळ देवीसमोर तसाच राहू द्यावा व नवरात्र काळ संपला की तो नारळ उचलून आपल्या तिजोरीत ठेवून द्यावा.या उपायामुळे आपल्या घरात धनाचे आगमन वेगाने होते.

जर आपली एखादी इच्छा किंवा मनोकामना पूर्ण करायची असेल तर नवरात्र काळात एक नारळ आणून लाल रंगाच्या कापडात बांधून देवी समोर ठेवावा व देवीकडे आपली इच्छा सांगून मनोकामना पूर्ती साठी प्रार्थना करावी. नवरात्र दरम्यान तो नारळ तसाच राहू द्यावा व त्यानंतर तो नारळ उचलून वाहत्या पाण्यात प्रवाहित करावा.या उपायामुळे आपली इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होते.

दुसरी वस्तू म्हणजे लवंग. देवी आईच्या पूजनात लवंगेचा वापर आवर्जून केला जातो , परंतु पूजनात लवंग वापरताना ती अखंड व संपूर्ण असेल याची खात्री करावी. लवंगीची फुल व दांडी तुटलेली नाही हे बघूनच ती लवंग देवी आईच्या पूजनात वापरावी.

संपूर्ण फुल असलेली लवंगच परिपूर्ण मानली जाते आणि देवी आईच्या पूजनात कोणतीही अपूर्ण वस्तू वापरू नये. देवी आईला दररोज एका विड्याच्या पानावर दोन लवंगा घेऊन तो वेडा अर्पण केल्यास देवी आईची कृपा आपल्यावर नक्कीच होते.

देवी आईच्या पूजनात कधीही तुळशीच्या पानांचा वापर करू नये. तसेच दुर्वांचाही वापर देवीच्या पूजनात करू नये. तसेच मंदारची म्हणजे रुईची फुले ही देवी आईच्या पूजनात वापरू नये. देवी आईला लाल रंग अतिप्रिय आहे म्हणून देवीला लाल रंगाची फुले अर्पण करावीत. शक्यतो देवी आईला कमळाची फुले अर्पण करावीत , हे खूपच शुभ असते.

देवी आईच्या पूजनात कोणत्याही तुटलेल्या फुटलेल्या वस्तूंचा वापर करू नये. जसे चिरलेले , फुटलेले , तुटलेले गळणारे दिवे यांचा वापर देवीच्या पूजनात अजिबात करू नये. घरात देवी आईचे तीन फोटो किंवा मूर्ती असू नये. देवी आईला पूर्ण उमललेले फूलच अर्पण करावे. देवीला कधीही कच्च्या कळ्या , कच्ची फळे अर्पण करू नये.

तसेच कोमेजलेली , सुरकुतलेली , खराब झालेली , वाळलेली फुलेही देवी आईला अर्पण करू नये. देवीला ताजीच फुले अर्पण करावीत. मित्रांनो या काही बाबी आहेत ज्या देवी आईचे पूजन करताना नक्कीच लक्षात ठेवाव्यात.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here