तुम्ही भाग्यवान असाल तर देवघरात दिसतील या गोष्टी…

नमस्कार मित्रानो

मित्रांनो प्रत्येक हिंदू धर्मियांच्या घराला छोटंसं का होईना देवघर असतं. आपण सकाळ संध्याकाळ या देवघरातील देवदेवतांच्या मूर्तींची पूजा करत असतो आराधना करत असतो.

परंतु मित्रानो काही अशा गोष्टी आहेत , काही असे संकेत आहेत कि ज्यामुळे आपल्याला कळू शकत कि आपल्या घरात साक्षात देवी देवतांचा वास आहे कि नाही.

जर तुमच्याही देवघरात अशाही गोष्टी घडत असतील असे काही संकेत जर तुमच्या देवघरात मिळत असतील तर समजून जा कि साक्षात तुमची इष्ट देवता , तुमची कुलदेवता तुमच्या घरामध्ये वास करत आहे.

आता हे संकेत कोणते ते आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घ्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ,असे कोणते संकेत आहेत ज्या आपल्या घरात पडल्यावर समजावं आपल्या घरात साक्षात देवी देवतांचा वास आहे.

मित्रांनो सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आपण देवघरात बसून नामस्मरण करत आहोत किंवा तुमच्या कुलदेवकडे पाहून नामस्मरण करत आहेत किंवा मंत्र जप करताय अशा वेळी त्या देवतेला अर्पण केले फुल जर खाली पडलं तर समजून जा साक्षात देवी देवता तुमच्या घरात वास करत आहेत.

तुमच्या घरात दैवी शक्तींचा वास आहे. तुम्ही खूप भाग्यवान आहात. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जो देवघरात कलश स्थापन केलेला आहे , या कलशावर जो नारळ आहे त्या नारळाला जर कोंब फुटलेला असेल तर समजून जा कि तुमची कुलदेवता तुमच्यावर प्रसन्न आहे.

तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर कुलदेवतेचा आशीर्वाद आहे. त्यानंतर पुढचा संकेत म्हणजे जर आपण देवघरात अगरबत्ती लावलेली नसेल किंवा कोणत्याही प्रकारचे धूप घरात लावलेले नसेल तरी सुद्धा आपल्या घरात , देव घरात एक विशिष्ट प्रकारचा सुगंध दरवळत असेल तर समजून जा कि साक्षात देवी देवता घरात वास करत आहेत.

तुमच्या घरात दैवी शक्तींचा संचार आहे. मित्रानो आपण देवांना सकाळ संध्याकाळ नैवैद्य दाखवत असतो. या नैवेद्यावर जर हाताचे ठसे जाणवत असतील , किंवा स्पर्श जाणवत असेल.

चपाती किंवा भाकरी जो तुम्ही नैवेद्य दाखवाल त्याचा तुकडा जर आपोआप तुटलेला असेल तर हा सुद्धा एक संकेत आहे कि तुमच्या घरात दैवी शक्ती वास करतात.

तुमची इष्ट देवता , तुमची कुलदेवता तुमच्यावर प्रसन्न आहे. तुमच्याही देवघरात जर तुम्हाला असे काही संकेत जाणवत असतील तर कमेंट करून नक्की सांगा. ओम नमः शिवाय…श्री स्वामी समर्थ… धन्यवाद…

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *