नमस्कार मित्रानो
मित्रानो ज्योतिषशास्त्रात जसे तारीख आणि वेळेला महत्व दिले गेले आहे त्याप्रमाणे ज्या महिन्यात आपला जन्म झाला त्या महिन्याला सुद्धा तितकेच महत्व आहे. मित्रानो डिसेंबर महिन्यात जन्म झालेल्या व्यक्तींमध्ये जबरदस्त आकर्षण शक्ती असते. तसेच यांची ग्रहण शक्ती खूपच पॉवरफुल असते.
या व्यक्ती देशप्रेमी असतात. यांचा स्वभाव शांत असतो त्यामुळे यांचा मित्र परिवार खूप मोठा असतो. या व्यक्ती क्षणात दुखी , क्षणात आनंदी होतात. या व्यक्ती सर्वात लवकर भावनिक होतात. यांचा वीक पॉईंट म्हणजे हे लोक पटकन समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवतात. सोबतच यांना राग सुद्धा लगेच येतो.
डिसेंबर महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती बुद्धीने खूपच तीक्ष्ण असतात. या व्यक्तींना कल्पना विश्वात रमायला खूप आवडते. हे लोक नेहमीच ऊर्जात्मक असतात. या महिन्यात १ ते १४ तारखे पर्यंत ज्यांचा जन्म झालाय हे लोक थोड्या फार प्रमाणात आळशी असतात.
तसेच पुढील १५ ते ३१ तारखे पर्यंत ज्यांचा जन्म झालाय अशा व्यक्ती जबरदस्त कलागुणांनी भरलेल्या असतात. परंतु आजचे काम उद्यावर ढकलण्यात यांचा जास्त कल असतो. १५ ते ३१ तारखेच्या दरम्यान जन्मलेले व्यक्ती थोड्या फार प्रमाणात अहंकारी मानल्या जातात.
समोरच्या व्यक्तीने नेहमीच आपली प्रशंसा करावी , रिस्पेक्ट करावा अशी यांची अपेक्षा असते. या व्यक्तींनी नोकरीपेक्षा व्यवसाय केला तर त्यात त्यांना जास्त यश मिळत. या महिन्यात जन्मणारे लोक मित्र मैत्रिणींवर , खाण्यापिण्यावर मनसोक्त पैसा खर्च करतात.
पैसे कमावण्याच्या नव नवीन संधी यांच्याकडे येतात पण फारच कमी लोक या संधीला ओळखून त्याचा फायदा घेतात. या व्यक्तींना आपल्या आसपास नेहमीच साफसफाई आवडते. परिवाराची काळजी करणारे हे लोक असतात.
करियर किंवा कामाच्या बाबतीत या व्यक्ती नेहमीच सिरीयस आणि सतर्क असतात. यांच्या अंगी विलक्षण प्रतिभा असते त्यामुळे हे लोक कोणत्याही क्षेत्रात सहज यशस्वी होतात. यांनी जर आपले करियर डॉक्टर , लेखक , शिक्षक , चित्रकार , संगणक या क्षेत्रांत केले तर यांना उत्तम फळ मिळते.
या महिन्यात जन्म झालेल्या मुली या मधुर आणि गोड बोलून समोरच्यांकडून कामे करवून घेतात. तसेच या मुली अत्यंत हुशार आणि चलाख असतात.
डिसेंबर महिन्यात जन्म झालेल्या व्यक्तींना सल्ला असा आहे कि त्यांनी अनोळखी व्यक्तींवर लगेच विश्वास ठेवू नये. स्वतःवरचा आत्मविश्वास कधीही कमी होऊ देऊ नये. कल्पना विश्वास कमी आणि प्रॅक्टिकल लाईफ मध्ये जास्त जगावे.
या व्यक्तींनी जर पक्षांना दाणे खायला दिले किंवा गोरगरिबांना धार्मिक पुस्तकांचे दान केले तर त्याचे फळ या व्यक्तींना उत्तम मिळते.
मित्रानो तुमचा जन्म कोणत्याही वर्षातील डिसेंबर महिन्यात झाला असेल तर तुमचा लकी नंबर आहे १ , ३ आणि ८. तुमचा लकी कलर लाल , चॉकलेटी आणि जांभळा आहे . तुमचा लकी दिवस आहे रविवार , शनिवार आणि बुधवार.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.