नमस्कार मित्रानो
मित्रानो आपण एखादे शुभ कार्य करण्यासाठी बाहेर जात असाल जसे कि लग्न जमवणे , बारसे , ओटी भरणाच्या कार्यक्रमासाठी जात असताना रस्त्यात मध्येच तुम्हाला एखादी अंतयात्रा जाताना दिसली तर आपल्या मनात शंकेची पाल चुकचुकते.
आपण ज्या कामासाठी चाललो आहोत त्यात काही विघ्न तर येणार नाही ना अशी शंका बऱ्याच लोकांना येते. मनात एक प्रकारची भीती आणि तणाव आपल्याला वाटतो. बरेच लोक अंतयात्रा दिसताच प्लॅन रद्द करून दुसऱ्या दिवशी कार्यक्रम ठरवतात.
जर शक्य असेल तर दुसऱ्या दिवशी कार्यक्रम ठेवतात किंवा कार्यक्रमाला जाणेच टाळतात. खरच अशी अंतयात्रा आपल्या समोरून गेल्याने शुभ कार्यात विघ्न येतात का ?
अंतयात्रा दिसताच हाती घेतलेली कामे पूर्ण होत नाहीत का ? मित्रांनो असं अजिबात नाहीये. जन्म असो किंवा मृत्यू असो हे सर्वस्वी त्या विधात्याच्या हातात आहे. कोणाच्या येण्याने किंवा कोणाच्या जाण्याने आपल्या कोणत्याही कार्यात कोणताही बदल होत नाही.
यामध्ये शुभ अशुभ असं काहीही नसत. फक्त आपल्याला जर अशा अंतयात्रेस रस्त्यात सामोरे जावं लागलं तर फक्त एक गोष्ट करायची आहे. आपण एक मिनिट बाजूला उभे राहून त्या अंत्ययात्रेला पुढे जाऊ द्यायचं आहे.
या अशुभ किंवा गैर असे काहीच नाही. जर तुम्ही गाडी मध्ये बसलेले असाल तर अशा वेळी आपल्या देवतांच समरण या वेळी करायचं आहे. हा एक शिष्टाचार आहे.
जाणाऱ्या माणसाला एक प्रकारचा आदर , सन्मान म्हणून आपण अशी अंतयात्रा समोरून जात असेल तर थोडा वेळ कडेला शांत उभं राहायचं आहे. त्यांना अगोदर जाऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण ज्या कामासाठी जात आहोत त्या कामासाठी जायचं आहे.
रस्त्याच्या कडेला उभे राहून किंवा गाडीत असाल तर गाडी मधून देवांचे स्मरण करत ” हे परमेश्वरा मृतात्म्यास शांती लाभो ” अशी प्रार्थना करायची आहे.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.